नेरुळ येथील वंडर्स पार्क हे नवी नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण असून करोनापूर्वी या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. परंतु मागील अडीच वर्षापासून वंडर पार्क सर्वांना सामान्यांसाठी बंद आहे. परंतू याच वंडर्स पार्कचे संपूर्ण मेकओव्हर करण्यात येत असून लवकरच हे पार्क खुले करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या वर्षाखेरीस वंडर पार्कमधील गजबज पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
२०१५ रोजी पालिकेचे हे पार्क सुरू करण्यात आले. त्याठिकाणी असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. नव्याने वंडर्स पार्कमध्ये म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित, ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा नविन बसविणे, तलावांची दुरूस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे प्रकार बसवणे, खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे, नवीन विद्द्युत दिवे लावणे, उद्द्यानात आकर्षक कारंजे सुधारणा अशी जवळजवळ २१ कोटीपेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे मेकओव्हर अंतिम टप्प्यात आहे.
नेरुळमधील वंडर्स पार्कला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते.या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे,खारघर,उरण,पनवेल येथुन टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरीक येतात.परंतू आता खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने सुरु होणाऱ्या वंडर्स पार्कची उत्सुकता सर्वांनाचं लागली आहे. नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क बरोबरच रॉक गार्डन निसर्ग उद्यान घनसोली पार्क, संवेदना उद्यान अशी अनेक उद्याने नागरिकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर या वर्षाच्या अखेरीस हे पार्क नव्याने सुरुवात करण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केली आहे.
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
नवी मुंबईतील सीवूड नेरुळ आकर्षणाचे ठिकाण…
सीवूड स्टेशन परिसरातच असलेला मोठा मॉल तर शेवटच्या पूर्व दिशेला असलेले वंडर्स पार्क रॉक गार्डन स्केटिंग पार्क, पारसिक हील, तर सीवूड पश्चिमेला असलेला पाम बीच मार्ग ज्वेल ऑफ नवी मुंबई यासारख्या नयनरम्य ठिकाणांमुळे नेरूळ व सीवूड्स परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे .
चौकट- वंडर्स पार्क येथे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत असून खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे तसेच म्युझिकल शो यांसह या पार्कला अधिक देखणे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात केला आहे वंडर्स पार्क सर्वसामान्यांसाठी डिसेंबर अखेर कुरले करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचे आकर्षण असलेले हे पार्क लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विद्युत विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
हेही वाचा- नवी मुंबई: तुर्भेमध्ये वीज चोरी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई
१५ डिसेंबर २०१५ रोजी वंडर्स पार्क नवी मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून खेळण्यांसोबतच वंडर्स पार्कला नवा लुक देण्यात आलेला आहे. हे पार्क करोनापासून जवळजवळ अडीच वर्ष बंद होते .त्यामुळे प्रशासनाने दिवाळीपर्यंत हे पार्क सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिली.