उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्ताने उरण शहरातून रविवारी मशाल रॅली काढली होती. यावेळी नगरपालिकेच्या टाऊन हॉलजवळ झालेल्या कार्यक्रमात उरणमधील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या मशाल रॅलीमध्ये उरण परिसरातील कामगार तसेच शेकापचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र दिन झिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांत हातात मशाली घेऊन बोकडवीरा चारफाटा येथून मशाल रॅली काढण्यात आली होती. ही रॅली उरणच्या बाजारातून फिरविण्यात आली. उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीची सांगता राजीव गांधी टाऊन हॉलच्या प्रांगणात झाली. यावेळी शेकापचे तालुका चिटणीस महादेव घरत, एल.बी.पाटील, कामगार नेते रवी घरत, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे नेते संतोष पवार यांचीही भाषणे झाली. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा मानपत्र देऊन विवेक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामगार दिन व महाराष्ट्र दिन संयुक्तरीत्या साजरा करून शेकापने कामगार क्षेत्रातील आपले काम वाढविण्याचे व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढण्याचा निर्धार यावेळी केला. कामगारांचा सत्कार करताना कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्यांने चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचेही आवाहन विवेक पाटील यांनी केले.
शेकापच्या मशाल मोर्चाला कामगारांचा प्रतिसाद
उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्ताने उरण शहरातून रविवारी मशाल रॅली काढली होती.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 10-05-2016 at 03:40 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers respond to pwp torch march