नवी मुंबई – ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक आधार असणारी शहरातील विरंगुळा केंद्रे, सवलतीत एनएमएमटी बस सुविधा, आरोग्य सेवा अशा विविध बाबींनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी ज्येष्ठांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम राबवित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असते. अशाच प्रकारे या वर्षीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जल्लोषात साजरा झाला.

प्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आमदार रमेश पाटील, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह माजी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक कक्षाचे सदस्य अण्णासाहेब टेकाळे, फेसकॉमचे सचिव सुरेश पोटे व इतर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे चालविणाऱ्या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

हेही वाचा – पनवेल परिसर, उपजिल्हा रुग्णालय आणि सिडको भवनामध्ये स्वच्छता मोहीम

भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नवी मुंबईत सुरु झाले व नंतर भारतातील इतर शहरांनी त्याचे अनुकरण केले याचा अभिमान व्यक्त करीत ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांनी त्याच धर्तीवर प्रत्येक नोडमध्ये ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे असावीत अशी सूचना केली.

बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई ही ज्येष्ठांना चांगल्या सुविधा पुरवित त्यांचा सन्मान करणारी महानगरपालिका असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे ज्येष्ठांच्या सेवेसाठी लवकरात लवकर कार्यान्वित करा अशी सूचना केली.आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत २९ इतक्या मोठया संख्येने असलेली विरंगुळा केंद्रे ही समवयस्क ज्येष्ठ मित्रांना आपल्या मनातले सांगण्याची आपुलकीची ठिकाणे झाली असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठांना अनेक उपयोगी सुविधा उपलब्ध करुन देताना ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र लवकरच सुरु होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्या मुलांना चार पाच दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागल्याने आपल्या वृद्ध आई वडिलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न पडतो, अशी मुले तात्पुरत्या कालावधीसाठी आई वडिलांना या केंद्रात ठेवू शकतील अशी माहिती देत आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – लाखापेक्षा अधिक नवी मुंबईकरांचा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात सहभाग

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री अभिनय, वेशभूषा, काव्यवाचन, गायन, नृत्य, कथाकथन, हास्य, टेलिफोन, टपाल पत्रलेखन, निबंध, कॅरम, बुद्धिबळ, ब्रिझ अशा विविध कला-क्रीडा गुणदर्शन स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिेके व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्या १५ ज्येष्ठ दांम्पत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, त्याचप्रमाणे वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या ७५ ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धांचे परीक्षण माधवी देशमुख, प्रतिक सातपुते, सिंधू नायर रविंद्र पारकर, शुभांगी साळुंके, संजय गडकरी, पल्लवी बुलाखे यांचाही सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या नाट्यगृहातील कार्यक्रमापूर्वी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाअंतर्गत आयोजित विशेष स्वच्छता मोहिमेत शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या समवेत लोकप्रतिनिधी आयुक्त राजेश नार्वेकर आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातील गीत-नृत्याचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांनी हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा विशेष कार्यक्रम उत्साहात व आनंदात साजरा केला.

Story img Loader