यशश्री शिंदे ( Yashashree Shinde ) हत्या प्रकरण हा महाराष्ट्रातला चर्चेचा विषय ठरला आहे. अत्यंत निर्घृण पद्धतीने यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली. या घटनेने निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली. ज्यानंतर एक महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे. २५ जुलैला यशश्री शिंदेला दाऊद शेखने भेटायला बोलवलं होतं. त्यानंतर एका कारणावरुन या दोघांचं भांडण झालं. भांडणानंतर यशश्रीवर वार करत दाऊदने तिची हत्या केली. दाऊद हत्येच्या उद्देशानेच चाकू बरोबर घेऊन गेला होता अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे.

अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली यशश्रीची हत्या

उरण येथे राहणारी तरुणी यशश्री शिंदेची ( Yashashree Shinde ) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या शरीरावरचे अवयव कापण्यात आले. तिचा छिनविछिन्न मृतदेह पोलिसांना २७ जुलै रोजी आढळून आला. उरण मध्ये राहणारी ही तरुणी यशश्री शिंदे आणि तिची हत्या करणारा दाऊद शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते. यशश्री शिंदे शाळेत असल्यापासून दाऊद शेख तिला ओळखत होता. यशश्री शिंदे हत्या प्रकरणात दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाऊदने यशश्री शिंदेला जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिली.

youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या मुलीचा टाहो; “माझ्या वडिलांना जसं ठार केलं, तशीच कठोर शिक्षा…”
Dhananjay Munde
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं, वाल्मिक कराडविषयीही मांडली भूमिका!
vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?

पोलीस उपायुक्त अमित काळे नेमकं काय म्हणाले?

“२३ जुलैला दाऊद शेख उरणमध्ये आला होता, २४ जुलैला दाऊद शेख आणि यशश्री शिंदे ( Yashashree Shinde ) हे दोघं जुई नगरला भेटले होते असं आरोपी दाऊद शेखचं म्हणणं आहे. मात्र पुन्हा भेटायला त्याच दिवशी यशश्रीने ( Yashashree Shinde ) नकार दिला होता. मात्र तुझे फोटो मी पोस्ट करेन असं दाऊदने तिला सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जुलैला यशश्री दाऊदला भेटली. दाऊद त्यावेळी आधीच बरोबर चाकू घेऊन आला होता. त्याने कट रचला होता, त्याने बरोबर चाकू ठेवलाच होता. त्याच चाकूने वार करुन त्याने यशश्रीला ठार केलं. सध्या तरी त्याने चाकू हेच हत्यार आणलं होतं, असं समजतं आहे.” अशी माहिती अमित काळे यांनी दिली.

हे पण वाचा- Yashashree Shinde Murder Case: दाऊद शेखने यशश्री शिंदेची हत्या का केली? ‘हे’ कारण आलं समोर

दाऊद शेख चाकू घेऊनच यशश्रीला २५ जुलै रोजी भेटला होता

यशश्रीला मारण्यासाठी चाकू घेऊनच दाऊद शेख आला होता. माझ्याशी लग्न कर आणि बंगळुरुला चल असा तगादा दाऊद शेखने लावला होता. मात्र यशश्री शिंदेने ( Yashashree Shinde ) यासाठी त्याला नकार दिला. ज्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. आधीच बरोबर आणलेल्या चाकूने दाऊदने यशश्रीवर वार केले. त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन यशश्रीला भेटायला बोलवलं होतं. चाकू त्याने फेकला आहे. तो आम्ही शोधत आहोत. हत्या केल्यानंतर दाऊद त्याच्या नातेवाईकांकडे गेला. त्याचं शेवटचं लोकेशन आम्हाला जिथे आढळून आलं तिथून आम्ही त्याला अटक केली. यशश्रीची ( Yashashree Shinde ) हत्या केल्यानंतर दाऊदने त्याचा मोबाइल बंद केला होता. दाऊदने यशश्रीला ज्या फोटोंची धमकी दिली होती ते फोटो नेमके कुठले होते हे अद्याप समजलेलं नाही. कारण दाऊद शेखने ते फोटो पोस्ट करुन डिलिट केले होते. ते रिट्राईव्ह करण्याचं कामही आम्ही करतो आहोत असंही अमित काळे यांनी स्पष्ट केलं.

Yashshree Shinde Murder News
यशश्री शिंदे या मुलीच्या हत्येआधीचं फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दाऊद तिच्या मागे गेला होता हे दिसतंं आहे.

मौसिन आणि दाऊद यांची मैत्री होती

दाऊद आणि मौसिन यांची मैत्री चांगली होती. त्याच्या मोबाइलवरुन दाऊद शेख यशश्रीशी संपर्क साधायचा. या दोघांचं भांडण झालं किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलं तर दाऊद शेख मौसिनच्या फोनवरुन यशश्रीशी ( Yashashree Shinde ) संपर्क करायचा. मात्र प्रेमाचा त्रिकोण किंवा तसा काही अँगल समोर आलेला नाही. दाऊदने आम्हाला इतकंच सांगितलं की मी यशश्रीला सांगितलं होतं की माझ्यासह लग्न कर आणि बंगळुरुला चल मात्र तिने नकार दिला. २०१९ मध्ये जेव्हा दाऊदला पॉक्सो अंतर्गत अटक झाली त्यानंतर काही कालावधीनंतर तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर अनेक दिवस तो यशश्रीच्या संपर्कात नव्हता. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी मित्राच्या माध्यमातून तो २०२० च्या नंतर तो पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला होता असंही काळे यांनी सांगितलं.

Story img Loader