पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता तळोजा ते कळंबोलीकडे जाणा-या मार्गिकेवर झालेल्या अपघातामध्ये एक तरुण ठार झाला तर एक महिला अत्यवस्थ आहे. या भीषण अपघाताची विचलित करणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. समाजमाध्यमांवर ही दृश्य काहीक्षणात पसरल्याने वाहनचालकांमध्ये खळबळ माजली आहे. या अपघातामध्ये एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
कल्याण येथे राहणारे ५३ वर्षीय परवीन ग्रोवर हे भरधाव मोटारीतून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ए वन या भरधाव वडापावच्या दूकानासमोरुन भरधाव वेगाने डाव्याबाजूने मोटार चालविल्यामुळे हा अपघात झाला. ग्रोवर चालवित असलणा-या मोटारीने रस्त्यावर चालणा-या लालू नारद तांटी याला ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाला. तर दूसरी पादचारी महिला प्रमिला दास या गंभीर जखमी झाल्या. ग्रोवर यांच्या मोटारीने रस्त्याकडेला उभ्या वाहनाला सुद्धा जोरदार धडक बसल्याने अपघात करणारी मोटार तेथे थांबली अन्यथा या मोटारीने अनेकांचे बळी घेतले असते असे बोलले जाते.
हेही वाचा…उरण : खोपटे पुल दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबूतीकरण
मोटारीची धडक एवढी जबरदस्त होती की ठार पडलेला लालू आणि जखमी प्रमिला या अक्षरशा पंधरा ते वीस फुटावर उडाले. जखमींना तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतू तळोजा पोलीसांचा तपास सुरू असल्याने नेमके अपघाताचे कारण अद्याप पोलीसांनी स्पष्ट केलेले नाही.