लोकसत्ता टीम

नवी मुंबई: शहर प्रदुषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी छोट्या छोट्या अंतरावर जाण्याकरीता इंथनयुक्त वाहन न वापरता इंथनमुक्त सायकल अथवा इ-बाईकचा वापर करावा या अनुषंगाने शहरात ई-बाईक सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही ई-बाईक सध्या वापरून अडगळीत टाकण्याचे प्रकार घडत आहे. महापे येथे युलू बाईक वापरून बांधकाम असलेल्या ठिकाणी टाकून दिले आहे. शहरात अशा प्रकारे ई बाईकचा गैरवापर सुरू आहे.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक

सध्या धावपळीच्या,तणाव, व्यापाच्या जीवनात बहुतांशी नागरिक सुदृढ राहण्यासाठी नित्याने चालणे, योगासने करणे यावर अधिक भर देत आहेत. आजच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गराड्यात नागरिकांना सायकलचा विसर पडला होता. तसेच काही नागरिकांची सायकलिंग करण्याची इच्छा ही असते,परंतु आजमितीला सायकल हे वाहन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या सुदृढ आयुष्यासाठी सन २०१८पासून युलू सायकल त्यांनंतर युलू बाईक सुरू करण्यात आली. याला नागरिकांनाकडून भरभरून प्रतिसाद ही मिळत आहे. सध्या शहरात ३४६ ई बाईक सेवेत आहेत. अनेकांना या ई बाईक उपयुक्त ठरत असतानाच, दुसरीकडे त्यांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापरदेखील समोर येत आहे.

आणखी वाचा- बदलत्या हवामानाचा हापूसला फटका, यंदा अवघे १६ ते १८ टक्के उत्पादन

शहरात युलू बाईकचा वापर नोकरदार, कामगार वर्गांसह अनेक गरजू तरुणांना होत आहे. कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी युलू बाईक उपयुक्त ठरत आहेत. मोबाईलमध्ये असलेल्या अँप्लिकेशनच्या मदतीने कोणीही युलू बाईकचा वापर करू शकतो. त्यासाठीचे शुल्क देखील खिशाला परवडणारे असल्याने वाढत्या पेट्रोल दराच्या तुलनेत अनेकांकडून युलू बाईकला पसंती मिळत आहे. मात्र आता याच युलू बाईकचा तरुणांकडून गैरवापर होताना दिसत आहे. महापे येथे कोणी अज्ञात व्यक्तीने वापर करून नाल्याचे बांधकाम सुरू आहे त्याठिकाणी टाकून दिली आहे. नवी मुंबई महापालिकेडून असे गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील शहरात युलू बाईकचा गैरवापर सुरूच आहे.

Story img Loader