डॉ. यश वेलणकर

एखादा माणूस बारीक चणीचा असला तरी हार न मानणारा, पडला तरी पटकन उभा राहणारा असतो, त्याला काटक म्हणतात. हा काटकपणा शरीराचा असतो तसाच मनाचाही असतो. मनाचा काटकपणा म्हणजे अपयश आले, नुकसान झाले तरी पुनश्च हरि ओम असे म्हणून प्रयत्न करण्याची जिद्द होय. संकटे सर्वावर येतात, पण मनाने काटक असलेल्या व्यक्ती त्या संकटामध्ये संधी शोधतात. स्नायू लवचीक असले की शरीर काटक असते, तसेच विचारांची लवचीकता वाढवली तर मन काटक होते. बदललेल्या परिस्थितीत नवीन मार्ग चोखाळावे लागतात. नवीन साथीदार शोधावे लागतात. मोडेन पण वाकणार नाही, असे म्हणणारे वृक्ष वादळात उन्मळून पडतात. कारण ते लवचीक नसतात. याउलट वाकेन पण मोडणार नाही, या बाण्याची लवचीक झाडे वादळामध्येही टिकून राहतात. सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत विचारांची लवचीकता आवश्यक आहे. ती मेंदूचे एक व्यवस्थापकीय कार्य आहे. ते कार्य व्यवस्थित होत असेल, तर मानसिक आरोग्य चांगले राहते. टोकाची चाकोरीबद्धता आणि पूर्णपणे असुसंगतता या दोन टोकांच्या अवस्थांत मानसिक अनारोग्याची कारणे आणि लक्षणेही दिसतात. चाकोरीबद्धता असते त्या वेळी कोणताही बदल सहन होत नाही. सर्व कृती, विचार आणि भावना या ठरलेल्या असतात. ओसीडी, औदासीन्य यांमध्ये अशी चाकोरीबद्धता असते. याउलट असुसंगतता म्हणजे विचार, भावना आणि कृती यांचा गोंधळ असतो. कशाचा कशाला मेळ नसतो. हातात लाडू आहे असा विचार असतो, एक मिनिटानंतर तो दगड आहे असे वाटते. एक दिवस एखादी व्यक्ती खूप जवळची वाटते, दुसऱ्या दिवशी तीच आपल्यावर विषप्रयोग करीत आहे अशी खात्री होते. स्किझोफ्रेनिया आणि व्यक्तिमत्त्वांचे विकार यांमध्ये अशी लक्षणे दिसतात. या दोन टोकांच्या मध्ये मानसिक स्वास्थ्य असते आणि त्याच्या मध्यवर्ती भागात वैचारिक लवचीकता असते. विविध अनुभवांना सामोरे गेल्याने आणि विचार करण्याच्या कौशल्यानेही ती वाढवता येते. जे काही घडते आहे त्याची कोणकोणती कारणे असू शकतात अशा अनेक शक्यतांचा, ध्येय साध्य करण्याचे कोणकोणते अनेक पर्याय असू शकतात याचा विचार केल्याने विचारांची चाकोरीबद्धता कमी होते. या अनेक पर्यायांतून काही पर्याय निवडणे आणि त्यातील एक वा दोन पर्यायांवर निश्चित काल ठरवून कृती करणे यामुळे गोंधळ टाळता येतो.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

yashwel@gmail.com