महाराष्ट्रातील जमिनी वेगवेगळ्या खडकांपासून तयार झाल्या असून त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत. मुख्यत: बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनांना रेगूर म्हणतात. या उथळ ते भारी खोल असतात.  समुद्रपाटीपासून ३०० ते ९०० मीटर उंच पठारावर उष्ण व कोरडय़ा भागात त्या आढळतात. उतारावरील जमिनी हलक्या लालसर व कमी सुपीक असतात. नदीकाठच्या भागात त्या खोल भारी काळ्या रंगाच्या असतात. भारी खोल जमिनीत चिकणमाती जास्त असते. पाणी धारणशक्ती चांगली असते. परंतु पाण्याचा निचरा कमी होतो. या जमिनी नत्रखतास उत्तम प्रतिसाद देतात. जमिनीतील थरात मोठय़ा प्रमाणात चुनखडी सापडते.
कृष्णा-गोदावरी नद्यांच्या खोऱ्यातील काळ्या जमिनी फारच सुपीक आहेत. जमिनीचा काळा रंग हा सेंद्रीय पदार्थाचे विघटन भाग व चिकणमातीचे मिश्रण तसेच टिटॅनियम ऑक्साईडमुळे होतो. काळी माती वाळल्याने तिला भेगा पडतात. अशा प्रकारे नांगरणीचे काम नसíगकरीत्या होते. म्हणून त्यास रेगूर (स्वयंनांगरट) जमिनी म्हणतात. काळ्या जमिनीत कापूस पीक घेत असल्याने त्यांना काळ्या कापसाच्या जमिनी असेही म्हणतात. खोलीनुसार या जमिनी उथळ, मध्यम वा खोल असतात.
उथळ जमिनीची खोली २२.५ सेमीपर्यंत असून त्यांची सुपीकता व उत्पादकता कमी असते. पाऊस चांगला झाल्यास पिकांचे उत्पादनही चांगले येते.
मध्यम खोल काळ्या जमिनीची खोली ६० ते ९० सेमीपर्यंत असते. यात चिकणमाती बऱ्यापकी असते. नत्र व स्फुरद कमी परंतु कॅल्शियम व पालाश भरपूर असते. सुपीक असल्याने यामध्ये खरीप तसेच रब्बी पिके चांगली येतात.
भारी खोल जमिनीची खोली ९० सेमीपेक्षा जास्त असून काही ठिकाणी ती तीन ते सहा मीटपर्यंत असते. या जमिनीत चिकणमाती जास्त असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम भरपूर असते. परंतु नत्र व स्फुरद कमी असते. या जमिनीची पाणीधारणशक्ती जास्त असल्याने त्यात रब्बी हंगामाची जिरायती पिके घेतात. या जमिनीचा निचरा चांगला नसतो. म्हणून या बागायतीस योग्य नसतात.

जे देखे रवी..  – तंत्रज्ञान कुणाला खूश करते?
गेल्या शतकातल्या ६०-६५ सालापर्यंत मी वैद्यकीय शिक्षण घेतले. हल्लीचा जमाना बघता त्या काळातले निदानाचे तंत्र अपंग होते आणि जवळ ६०-७० टक्के आजारांना त्यामुळे औषधेच नव्हती. तंत्रज्ञानाने हा जमाना पार बदलून टाकला. हल्ली रुग्ण स्वत:ला तपासून घेत असतीलही, पण तज्ज्ञ कधी एकदा ‘सीटी स्कॅन’ किंवा ‘एमआरआय’ करायला सांगतो आहे आणि खरे पक्के निदान करून माझ्यावर उपचार करतो आहे याचीच वाट रुग्ण बघतो. आपल्या अंतरंगाचे आपल्यालाही समजेल असे रंगीत चित्र जर यंत्र काढत असेल तर तज्ज्ञ मंडळी पुजेपुरती भटजीबुवांसारखीच होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. त्यातल्या त्यात चिरफाड करणारे सर्जन लोक अजून तग धरून आहेत, पण तिथेही आता अनेक प्रकारच्या नळकांडय़ांनी प्रवेश केल्यामुळे पोट कापून शस्त्रक्रिया करणे लवकरच इतिहासात जमा होईल, असा रागरंग आहे. परवा परवा एका स्त्रीच्या Gall Bladder  ची शस्त्रक्रिया बघितली. तिच्या योनीमार्गातून एक नळी पोटात घालण्यात आली ती नळी Gall Bladder पर्यंत नेण्यात आली त्या नळीतल्या चाकूने  Gall Bladder काढण्यात आले.माझ्या पोटावर व्रण नको. अगदी दोन सेंटिमीटरही नको, अशी या सुंदरीची मागणी तंत्रज्ञानाने पुरविली. सगळेच खूश. डॉक्टरांना पैसे मिळाले. एका दिवसात रुग्ण घरी गेल्याने त्या खाटेवर दुसरा रुग्ण ठेवता आल्याने रुग्णालय खूश. एका दिवसात कारभार आटोपल्याने ही बाई खूश आणि ज्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले त्याची निर्मिती करणारी कंपनीही खूश. हे तंत्रज्ञान भरमसाट महाग असते. त्या नळीतले शुभ्र दिवे, त्यात मावणाऱ्या कात्र्या, आत रक्तस्राव झाला तर तो भाजून बंद करण्यासाठी लागणारी विजेरी या गोष्टी प्रचंड महाग असतात. त्यावर शिवाय नफा असतो. या तंत्रज्ञानाच्या कंपन्या डॉक्टर मंडळींचे लाड करण्यासाठी त्यांना फुकट परदेशवाऱ्या घडवतात. ही यंत्रे जी रुग्णालये विकत घेतात आणि रुग्णांना सरचार्ज लावतात, त्यामुळे अनावश्यक शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढते. वैद्यकीय जगात भांडवल आणि गुंतवणूक वगैरे भयानक प्रकार या तंत्रज्ञानाने आणले आहेत. हे केवळ निरीक्षण आहे. याच्यावरचा उपाय वगैरे माझ्यासारख्या पामराला कृपा करून विचारू नये.
गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. माझे लग्न झाल्यावर मी एकदा माझ्या सासऱ्यांना ‘उच्च विकार, नैतिकता’ याबद्दल हातवारे करीत सांगत होतो. त्यांनी ऐकून घेतले आणि नंतर मला म्हणाले, ‘तुम्ही जर एवढे हुशार आहात तर मग ‘तुम्ही श्रीमंत कसे झाला नाहीत?’ या प्रश्नाला दोन पदर होते. एक होता मला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा, पण त्याहून महत्त्वाचा होता त्यांच्या मुलीच्या संसाराच्या काळजीचा.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
forest cover , Sindhudurg district, Western Ghats,
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात वाढ तर पश्चिम घाटात घट, चिंतेची बाब
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
vasai virar palghar forest declined
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके

वॉर अँड पीस – ताप : भाग ४
५) कावीळ, जंत व अजीर्णामुळे ताप – घाण पाणी, खराब व शिळे अन्न, खराब दूध, अजीर्ण, अपचन असतानाही, भूक नसताना पचावयास जड, असे जेवण जेवण्याची नेहमी सवय असणे. खूप गोड पदार्थ, दीर्घकाळ सातत्याने खात राहणे. भूक मंदावणे, इ. कारणांमुळे मलावरोध, पोटफुगी, पोटदुखी, जंत, कृमी, भूक मंद होणे, लघवी व डोळे पिवळे होणे. अंगास खाज सुटणे अशी लक्षणे असतात.
कावीळ कमी होण्याकरिता कुमारी आसव चार चमचे, अम्लपित्त वटी तीन गोळ्या दोन्ही जेवणानंतर उकळलेल्या पाण्याबरोबर, जेवणापूर्वी आरोग्यवर्धिनी, लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश प्र. ३ गोळ्या दोन वेळा सुंठ चूर्णाबरोबर द्याव्या. रात्री त्रिफळा किंवा गंधर्वहरितकी चूर्ण एक चमचा कपिलादीवटी सहा गोळ्या घ्याव्या. कोरफडीच्या एका पानाचा गर, राजगिरा/साळीच्या लाह्य़ा, काळ्या मनुका, उकळलेले पाणी, बिनसाईचे दूध, तांदूळ भाजून भात, ज्वारीची भाकरी, उकडलेल्या भाज्या असा हलका आहार ठेवावा.
६) आगंतुक – विषारी प्राणी किंवा चुकीची तीव्र औषधे किंवा चुकीच्या तीव्र औषधांचे शरीरावर परिणाम. ग्रहपीडा व मानवी मनास आकलन न होणाऱ्या कारणांमुळे शरीरावर चकंदळे, फोड, पू. गांधी ही लक्षणे दिसणे, ताप खूप तीव्र किंवा कमी अधिक, शरीराची व इंद्रियांची आग होणे, खाज सुटणे, तापात बरळणे अशी लक्षणे असतात.
अशा विकारात खूप औषधे पोटात देण्यापेक्षा बाह्योपचारांवर भर द्यावा. वेखंड, ओवा, बाळंतशोपा, उद व धूप यांची धुरी घ्यावी. उपळसरी चूर्ण सकाळी एका चमचा घ्यावे. चंदनासव, उशिरासव, अरविंदासव अनुक्रमे स्त्री, पुरुष व बालकांकरिता योजावे. रक्तशुद्धीकरिता सारिवाद्यासव; मानसिक बलाकरिता सारस्वतारिष्ट योजावे. तापाकरिता लघुसूतशेखर दोन गोळ्या, चंद्रकला एक गोळी एक एक तासाने दिवसातून सहा वेळा द्यावी. अशांतता, सर्वागदाह असल्यास मौक्तिक भस्म व काळ्या मनुकांचा वापर करावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ८ मार्च  
१८८९ > मराठीत ‘सिंधी भाषेचे लघुव्याकरण’ वा ‘मुंबई इलाख्याचा  इतिहास आणि भूगोल’ लिहिणारे, तुकारामांच्या हस्तलिखित पोथ्यांतून ४५०० अभंगांचे दोन खंड तयार करणारे ज्ञानकर्मी संशोधक व कर्ते सुधारक- कायदेपंडित विश्वनाथ नारायण ऊर्फ रावसाहेब मंडलिक यांचा जन्म.
१८६४ > ‘पण लक्षात कोण घेतो?’, ‘गड आला पण सिंह गेला’ अशा १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक कादंबऱ्या सन १९०३ ते १९३० या काळात लिहिणारे हरी नारायण आपटे यांचा जन्म. मोलिएर, शेक्सपिअर, व्हिक्टर ह्यूगो आदींच्या नाटकांनी मराठी रूपांतरे त्यांनी केली, तसेच रवीन्द्रनाथ ठाकुरांच्या ‘गीतांजली’ची ओळखही १९१७ सालीच मराठी अनुवादातून करून दिली.
१९२५ > कृषी, वनस्पती, भूगर्भ, रसायन  शास्त्रांवर मराठीत लेखन करणारे बाळकृष्ण  आत्माराम ऊर्फ भाईसाहेब गुप्ते यांचे निधन
१९३० > अल्पायुष्यात मराठी साहित्याला ‘नक्षत्रांचे देणे’ देणारे कवी आरती प्रभू ऊर्फ  चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म.  अवध्य (नाटक), राखी पाखरू (कथासंग्रह), कोंडुरा (कादंबरी) अशा उत्तुंग कलाकृती त्यांनी लिहिल्या. २३ प्रकाशित पुस्तके, २७ अप्रकाशित नाटके व अनेक भावगीते मागे ठेवून ते गेले.
– संजय वझरेकर

Story img Loader