शहर म्हटले की नागरिकांना सोयीसुविधा पुरवणे अनिवार्य आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरी, वीज, पाणी, नैसर्गिक गॅसपुरवठा पाहिजे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट हवी, सांडपाणी प्रक्रिया सुविधा हवी आणि ही सगळी कामे करण्यासाठी जे कर्मचारी तैनात केले जातात त्यांची सुरक्षितता हे सारे शहरातील सुविधांअंतर्गत येतात. वीज २४ तास पुरवायची असेल तर त्यासाठी लागणारी यंत्रणा सुसज्ज ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यात ढिलाई किंवा कुचराई करून चालत नाही. या झाल्या नेहमीच्या सुविधा. स्मार्ट शहरांतील लोकांना भविष्यात काय सुविधा लागतील याचाही विचार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता येतो. एनर्जी ट्रॅकिंग तंत्रज्ञान या कामी उपयोगी येते. इंधनाचे नवे स्राोत शोधणे किंवा आहे त्याच इंधनांचा सुयोग्य वापर करण्याच्या पद्धतींचा अवलंब या विषयीच्या संकल्पना त्यातून प्राप्त होतात. काही प्रारूपे अशी आहेत की त्यांच्या वापराने स्थावर मालमत्ता विकासाची नवसंकल्पना मिळू शकते. नेमक्या कोणत्या वेळी मालमत्ता विक्री केल्याने हमखास व योग्य भाव मिळेल अशा वेळांची शक्यताही ही प्रारूपे वर्तवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा