अ‍ॅलिस ऑगस्टा बॉल या एक आफ्रिकन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होत्या. १९४०च्या दशकामध्ये कुष्ठरोगासाठी इंजेक्शन देण्यायोग्य तेलाचा अर्क त्यांनी विकसित केला होता. हवाई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या त्या  पहिली महिला होत्या. तसेच विद्यापीठातील रसायनशास्त्राच्या त्या पहिल्या महिला प्राध्यापकही होत्या. अ‍ॅलिस ऑगस्टा बॉल यांचा जन्म २४ जुलै १८९२ रोजी सिएटल, वॉशिंग्टन येथे झाला. त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात    रसायनशास्त्राचा अभ्यास केला. हवाई विद्यापीठातील त्यांच्या पदव्युत्तर संशोधन कारकीर्दीत, बॉलने त्यांच्या मास्टरच्या प्रबंधासाठी रासायनिक रचना आणि पाइपर मेथिस्टिकम (कावा) च्या सक्रिय तत्त्वाची तपासणी केली. १८६६ ते १९४२ पर्यंत जेव्हा जेव्हा एखाद्या रुग्णाला कुष्ठरोगाचे निदान होत असे, तेव्हा त्यांना अटक करून मोलोकाई या हवाई बेटावर पाठवले जात होते. डॉ. हॅरी टी. हॉलमन हे हवाई येथील ‘कालीही’ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. चौलमुगरा तेलातील सक्रिय रासायनिक संयुगे विलग करण्याची पद्धत विकसित करण्यात मदत करण्यासाठी त्यांना साहाय्यकाची गरज होती. त्यांनी अ‍ॅलिस बॉल यांच्याशी संपर्क साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 अवघ्या २३व्या वर्षी, बॉल यांनी चौलमुगरा झाडाच्या बियांचे तेल शरीराद्वारे शोषले जाईल आणि ते इंजेक्शनद्वारे देता येईल असे तंत्र विकसित केले. त्यांच्या या नवीन तंत्रात चौलमुगरा तेलातील फॅटी अ‍ॅसिडपासून इथाइल एस्टर संयुगे वेगळे करणे समाविष्ट होते. हे विलगीकरण तंत्र ‘बॉल पद्धती’ म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे, अ‍ॅलिस त्यांचे क्रांतिकारी निष्कर्ष प्रकाशित करू शकल्या नाहीत. आर्थर एल. डीन यांनी ‘‘बॉल’’चे कार्य चालू ठेवले, निष्कर्ष प्रकाशित केले आणि इंजेक्शन करण्यायोग्य चौलमुगरा अर्क मोठय़ा प्रमाणात तयार करण्यास सुरुवात केली. डीनने बॉल यांना श्रेय न देता या तंत्राचे नाव ‘डीन पद्धती’ असे ठेवले. इसवी सन २००० मध्ये विद्यापीठाने बॉल यांना बॅचमन हॉलच्या पाठीमागे असलेल्या शाळेच्या चौलमुगरा झाडावर एक फलक लावून सन्मानित केले. त्याच दिवशी, हवाईचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर मॅझी हिरोनो यांनी २९ फेब्रुवारी हा दिवस ‘अ‍ॅलिस बॉल डे’ म्हणून घोषित केला. २००७ मध्ये हवाई बोर्ड ऑफ रीजेंट्स विद्यापीठाने बॉल यांचा सन्मान केला. मार्च २०१६ मध्ये हवाई मासिकाने हवाई इतिहासातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत अ‍ॅलिस बॉल यांना स्थान दिले.

 – डॉ. प्रशांत ठाकरे  मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org