मका पीक आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर चारापीक म्हणून घेतले जाते. वर्षभर चांगले आणि उंच वाढणाऱ्या या पिकापासून जास्तीतजास्त हिरवा चारा मिळतो. मका पिकामध्येही नऊ ते ११ प्रथिने असतात आणि या प्रथिनांची पचनीयता सर्वात जास्त म्हणजे ६५ ते ६८ टक्के असते. त्यामुळे जनावरांच्या आहारात मक्याच्या हिरव्या चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पारंपरिक एकदल पिकाबरोबरच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ओट या पिकाची लागवड करतात. या पिकाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे ५० ते ५५ दिवसांत पहिली कापणी तर ३५ ते ४० दिवसांनी दुसरी कापणी करता येते. चाऱ्याचे उत्पादनही भरपूर मिळते आणि प्रथिनेही आठ-नऊ टक्क्यांपर्यंत मिळतात.
एकदल हंगामी पिकाबरोबरच द्विदल पिकांचीही लागवड करणे गरजेचे आहे. द्विदल पिकामध्ये सर्वात लोकप्रिय चारा पीक म्हणजे लसूणघास. सर्वात जास्त म्हणजे १९-२२ प्रथिने असलेला तसेच इतरही अनेक अन्नघटकांचे भांडार असलेला जनावरांच्या आवडीचा लसूणघास. लागवड केल्यानंतर दोनतीन वष्रे टिकणारा, प्रत्येक महिन्याला कापणीसाठी तयार होणाऱ्या या चाऱ्याला दुग्धव्यवसायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून एकूण चारापिकाखालील क्षेत्राच्या २५-३० टक्के क्षेत्र या पिकाखाली ठेवावे. चवळी या द्विदल वर्गातील पिकाचाही चारा म्हणून उपयोग होतो. विशेषत: खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये चवळीचे पीक चारा म्हणून घेता येते. यामध्येही १३ ते १५ टक्के प्रथिने आहेत. चवळीचीही लागवड केल्यानंतर ६० ते ६५ दिवसांनी कापणी करता येते. संकरित नेपियर ज्याला गिन्नी गवतही म्हटले जाते, त्याच्या काही चांगल्या जाती आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जयवंत नावाची जात विकसित केली असून त्यामुळे दोन-तीन वर्षे चांगला चारा वर्षभर उपलब्ध होतो. पालेदार, जास्त गोडवा असणाऱ्या या पिकाच्या वर्षांतून सात-आठ कापण्या करता येतात. या चाऱ्यामध्ये आठ-नऊ टक्के प्रथिने असतात. याबरोबरच मारवेल ज्याला कांडीगवत म्हणतात, याचाही वापर बहुवर्षीय चारा पीक म्हणून शेतकरी करतात.
कुतूहल – जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन- २
मका पीक आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर चारापीक म्हणून घेतले जाते. वर्षभर चांगले आणि उंच वाढणाऱ्या या पिकापासून जास्तीतजास्त हिरवा चारा मिळतो. मका पिकामध्येही नऊ ते ११ प्रथिने असतात आणि या प्रथिनांची पचनीयता सर्वात जास्त म्हणजे ६५ ते ६८ टक्के असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal fodder planning