उन्हाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी चारा विशेषत: हिरवा चारा आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या दोन बाबींचा तुटवडा जाणवतो. जनावरांसाठी हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत आजही आपल्याकडे प्रचलित नाही. पिकांचे धान्य काढल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांचा चारा म्हणून वापरतात. खरंतर या वाळलेल्या चाऱ्यामध्ये पौष्टिक घटक कमी असतात. चाऱ्याचे रवंथ करून चांगले पचन होण्यासाठी जनावरांच्या आहारात २०ते २५ टक्के वाळलेला चारा आवश्यक आहे. परंतु अनेकदा उन्हाळा आणि दुष्काळ असेल तर वाळलेला चाराच मुख्य चारा होतो.
उन्हाळ्यातील तापमानामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यांना कमी परंतु जास्त पौष्टिक विशेषत: प्रथिनयुक्त खुराक/ चारा देणे गरजेचे असताना याच वेळी कमी पौष्टिक आणि कमी प्रथिनयुक्त चाऱ्यावर दुग्धव्यवसाय चालतो. याचा परिणाम जनावरांच्या एकूणच आरोग्यावर होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांची वाढ मंदावते. उत्पादन तसेच प्रजननक्षमता कमी होते. विशेषत: संकरित गाईंमध्ये जास्त तापमान सहन करण्याची क्षमता कमी असते. तसेच म्हशीच्या काळ्या रंगामुळे आणि जाड कातडीमुळेही तापमान वाढते व पचनक्रिया बिघडते. त्यामुळे विविध आजारांना जनावरे बळी पडण्याचे प्रमाण वाढते.
उन्हाळ्यामध्ये जनावरे चारा कमी आणि पाणी जास्त पीत असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन होते. त्यामुळे आम्लाचे प्रमाण वाढते. तसेच घामावटे सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम एकूणच शरीर प्रक्रियेवर होतो. तापमान वाढून जनावरे गाभण न राहाणे, गर्भपात होणे यांसारखे प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जनावरांना व्यवस्थित निवारा, योग्य पोषण आणि शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे. चारा देताना कुट्टी करून हिरवा-वाळलेला चारा एकत्रित करून टाकला तर त्याचे पचन चांगले होते. तसेच चारा कमी खात असताना जनावरांना पौष्टिक अन्न आणि प्रथिनांचा अतिरिक्त पुरवठा होण्यासाठी धान्य किंवा इतर पौष्टिक खाद्य द्यावे. उन्हाळ्यामध्ये खनिज मिश्रणे, क्षार यांचा वापर खाद्यातून करावा. उन्हाळ्यामध्ये जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांचे प्रजनन, उत्पादन आणि आजारांचे प्रश्न कमी होतील.

जे देखे रवी..- बॉस माणूस
कुक कौंटी रुग्णालयाच्या इ४१ल्ल२ विभागच्या प्रमुखाचे नाव होते बॉसविक. त्याच्या नावात इ२२ हा शब्द होताच, पण साहेबांना आपण इडरर आहोत याची पूर्ण जाणीव होती. ज्या गौरवर्णीय पिढय़ांनी अमेरिका देश त्यांच्या मूल्यांच्या आणि परिश्रमाच्या जोरावर एवढा प्रगत आणि बलाढय़ केला होता, त्या पूर्वजांचा अभिमान असलेला हा गृहस्थ त्यांचा पाईकच म्हणता येईल. अमेरिकेचा द्वेष सगळेचजण आजतागयात करत आहेत आणि सगळेच जण कुतूहलाने किंवा पोटापाण्यासाठी तिथेच जाऊ बघतात, हा जगातला मोठा विरोधाभास आहे. अमेरिकेच्या भूखंडावर राहणारी मूळ रक्त वर्णीय (फी िकल्ल्िरंल्ल२) जमात आता तिथे क्वचितच दिसते. इथे मूळ धरलेले पहिले परदेशी प्रवासी इंग्लंडमधले. इंग्लंडमधल्या धार्मिक वातावरणात उदारमतवाद सुरू झाला तेव्हा ख्रिश्चन धर्माची मूळ परंपरा टिकवण्यासाठी मे फ्लॉवर बोटीवरून, रूढींना चिकटून राहणारी आणि थोडीफार कर्मठ अशी ही मंडळी अमेरिकेच्या पूवरेत्तर भागात पोहोचली. त्यांनी घालून दिलेले धार्मिक आणि नैतिक नियम आणि परिश्रम करत स्वतंत्र विचाराने अमेरिका या देशाची त्यांनी केलेली घडण हा त्या देशाचा पाया ठरला. पुढे अनेक वंशांचे, अनेक देशांतले लोक इथे पोहोचले, परंतु तो मूळ ढाचा काही बदलला नाही. या सगळ्या वातावरणाला एक मोठेच गालबोट होते ते म्हणजे अफ्रिका खंडातून  आणलेले निग्रो गुलाम. बाकी सगळी सगळ्यांची तरक्की चालली असताना या माणसांना जनावराचेच जिणे अनेक वर्षे भोगावे लागले. त्यातून पुढे यथावकाश सुधारणा झाल्याही, परंतु जगात सर्वत्र असते तसेच गौरवर्णीय आणि इतर ह्य़ांचे समांतर, पण एकरूप न झालेले सवतेसुभे इथेही उरले. वर्णाश्रम किंवा वंशाश्रम जगातल्या कोठल्याही भागात संपूर्णपणे संपलेला नाही. तो संपणे शक्यही नाही. कारण ती गोष्ट जैविकतेच्या विरुद्ध आहे. सांगण्याचा मुद्दा असा की अमेरिकेतल्या गौरवर्णीयांच्या इतिहासाचा एक उत्तम नमुना म्हणजे हे माझे विभागप्रमुख बॉसविक. वैज्ञानिक क्षेत्रात यांचे स्थान गौण होते, परंतु वैद्यकीय जगतात जे समाजकारण आणि राजकारण चालते त्यात हे माहीर होते. अनेक संस्थांमध्ये त्यांना पदे होती. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हा यांचा नेहमीचा कार्यक्रम. ह्य़ांच्या हातातल्या कौशल्यापेक्षा ह्य़ांच्या हातातली माणसे आणण्याची, त्यांना कामाला लावण्याची सत्ता जास्त महत्त्वाची होती. या त्यांच्या सत्तेमुळे कर्मधर्मसंयोगाने मी इथे पोहोचलो होतो हे ध्यानात यायला मला वेळ लागला नाही. मी एक प्यादे होतो. त्याचे मोहरे कसे व कधी करायचे हे ते ठरवणार होते. ते योग्यच होते. मला शिकायचे होते. त्यांना एक त्यांच्या सत्तेवर अवलंबून असलेला काम करेल असा माणूस हवा होता. आमच्या दोघांमधले संबंध कसे उत्क्रांत होत गेले ते पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

वॉर अँड पीस –  ब्लडप्रेशर : रक्तदाबवृद्धी विकार
वयाच्या पन्नाशीपर्यंत वरचा रक्तदाब १३० व खालचा ८० पर्यंत असल्यास ब्लडप्रेशर हा विकार विचारात घ्यावयाची गरज नसते. वयाचे पन्नास-पंचावन्नपर्यंत सामान्यपणे रक्तदाब प्रमाण वरीलप्रमाणे स्थिर असते. वय ५०च्या वर गेल्यावर, वरच्या रक्तदाबाची मर्यादा १०० अधिक वय मिळून ठरवता येते. उदा., ६० वयाच्या माणसाचा वरचा रक्तदाब १६०च्या वर जाऊ नये. खालचा रक्तदाब ८५च्या वर गेल्यास रक्तदाब या लक्षणाचा अवश्य विचार करावा लागतो.
लक्षणे- रक्तदाबवृद्धी विकारात पुढील लक्षणांचा मागोवा घेऊन रक्तदाबवृद्धी हा स्वतंत्र विकार आहे का अन्य विकारातील लक्षणे आहे याचा नेमका विचार केल्यास, औषधी योजना नेमकी होते व संभाव्य उपद्रव, औषधाची खूप सवय टाळता येते. छातीवर प्रेशर येणे, धाप लागणे, चढाच्या रस्त्यावर चालायला त्रास होणे, एकही चढणे मुश्कील होणे, थोडय़ाशाही श्रमाने ‘फा फू’ होणे, हाताला मुंग्या येणे, डोके गरगरणे, मान दुखणे, थकवा येणे, दृष्टी कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूतखडा असणे, वजन वाढणे, हातापायाला सायंकाळी सूज येणे, अस्वस्थ वाटणे, झोप न येणे, रक्तशर्करा वाढणे, खाज सुटणे, लघवीला घाण वास इ.
कारणे- आनुवंशिकता, ४०च्या वर वय, स्थौल्य, चरबी वाढेल असा आहार असणे, फाजील पोषणामुळे रसरक्तवाहिन्यांमध्ये क्षार किंवा चरबी साठून रक्ताभिसरणात अडथळा होणे, आहारात चरबीयुक्त गोड, तेलकट, तूपकट, मीठ इ.चे प्रमाण अधिक असणे. आहाराच्या मानाने व्यायाम वा शारीरिक श्रमाचा अभाव असणे. रात्री उशिरा वा अवेळी जेवणे. जेवणात कडू, तिखट, तुरट रसांच्या, चवीच्या पदार्थाचा वापर नसणे. चिंता, कमी वा खंडित झोप, बैठे काम, धास्ती, मानसिक चिंता, मूत्रप्रवृत्ती कमी होणे, हृदयाच्या स्नायूंचे कार्य शिथिल किंवा मंद होणे. रक्तदाबवृद्धी विकाराकरिता रुग्णाची उंची व त्यामानाने वजन, रक्तातील चरबी-लिपीड प्रोफाईल, रक्ताचे व रक्तशर्करेचे प्रमाण यांची एकवेळ अवश्य नोंद घ्यावी. मूत्राचे प्रमाण व त्यातील विविध घटक एकवेळ तपासावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ३ मे
१९३२ > सत्यशोधक विचारधारेतील खंदे पत्रकार आणि ब्राह्मणेतर चळवळ विचारांनी समृद्ध करणारे कार्यकर्ते दिनकर शंकर जवळकर यांचे निधन. लोकमान्य टिळकांनी आंतरजातीय विवाहाच्या बिलास विरोध दर्शवताच जवळकरांनी त्यावर ‘प्रणय-प्रभाव’ हे नाटक लिहिले होते. काही लोकशिक्षणपर काव्यरचनाही त्यांनी केल्या, परंतु त्यांचे महत्त्वाचे लिखाण नैमित्तिक लेखांच्या स्वरूपात झाले. पुढे महाराष्ट्राच्या राजकीय विचारांच्या इतिहासाचे अभ्यासक य. दि. फडके यांनी जवळकरांचे समग्र वाङ्मय संपादित केले.
१९७१> अर्थतज्ज्ञ आणि भारतातील सहकार चळवळीचे आद्य प्रणेते तसेच मराठीचे दालन अर्थविषयक ग्रंथांनी समृद्ध करणारे धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. ‘ध. रा. गाडगीळ लेखसंग्रह’ (खंड १ व २) हे त्यांच्या मराठी लेखांचे संकलन.
१९७७ >  कादंबऱ्या तसेच ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप, कारणे आणि उपाय’, ‘ इस्लामचे भारतीय चित्र’ अशी वैचारिक पुस्तके लिहिणारे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रणेते हमीद दलवाई यांचे निधन. ‘लाट’ या कादंबरीतून त्यांनी अंधश्रद्धांचे चित्रण केले, तर गाजलेल्या ‘इंधन’ कादंबरीत हिंदू-मुस्लिम तेढीचे चित्रण आहे.
– संजय वझरेकर