उन्हाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी चारा विशेषत: हिरवा चारा आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या दोन बाबींचा तुटवडा जाणवतो. जनावरांसाठी हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत आजही आपल्याकडे प्रचलित नाही. पिकांचे धान्य काढल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांचा चारा म्हणून वापरतात. खरंतर या वाळलेल्या चाऱ्यामध्ये पौष्टिक घटक कमी असतात. चाऱ्याचे रवंथ करून चांगले पचन होण्यासाठी जनावरांच्या आहारात २०ते २५ टक्के वाळलेला चारा आवश्यक आहे. परंतु अनेकदा उन्हाळा आणि दुष्काळ असेल तर वाळलेला चाराच मुख्य चारा होतो.
उन्हाळ्यातील तापमानामुळे जनावरांची भूक मंदावते. त्यांना कमी परंतु जास्त पौष्टिक विशेषत: प्रथिनयुक्त खुराक/ चारा देणे गरजेचे असताना याच वेळी कमी पौष्टिक आणि कमी प्रथिनयुक्त चाऱ्यावर दुग्धव्यवसाय चालतो. याचा परिणाम जनावरांच्या एकूणच आरोग्यावर होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांची वाढ मंदावते. उत्पादन तसेच प्रजननक्षमता कमी होते. विशेषत: संकरित गाईंमध्ये जास्त तापमान सहन करण्याची क्षमता कमी असते. तसेच म्हशीच्या काळ्या रंगामुळे आणि जाड कातडीमुळेही तापमान वाढते व पचनक्रिया बिघडते. त्यामुळे विविध आजारांना जनावरे बळी पडण्याचे प्रमाण वाढते.
उन्हाळ्यामध्ये जनावरे चारा कमी आणि पाणी जास्त पीत असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन होते. त्यामुळे आम्लाचे प्रमाण वाढते. तसेच घामावटे सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण कमी होते. त्याचा परिणाम एकूणच शरीर प्रक्रियेवर होतो. तापमान वाढून जनावरे गाभण न राहाणे, गर्भपात होणे यांसारखे प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जनावरांना व्यवस्थित निवारा, योग्य पोषण आणि शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे. चारा देताना कुट्टी करून हिरवा-वाळलेला चारा एकत्रित करून टाकला तर त्याचे पचन चांगले होते. तसेच चारा कमी खात असताना जनावरांना पौष्टिक अन्न आणि प्रथिनांचा अतिरिक्त पुरवठा होण्यासाठी धान्य किंवा इतर पौष्टिक खाद्य द्यावे. उन्हाळ्यामध्ये खनिज मिश्रणे, क्षार यांचा वापर खाद्यातून करावा. उन्हाळ्यामध्ये जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर त्यांचे प्रजनन, उत्पादन आणि आजारांचे प्रश्न कमी होतील.
कुतूहल – उन्हाळ्यात जनावरांचे खाद्य
उन्हाळ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी चारा विशेषत: हिरवा चारा आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी या दोन बाबींचा तुटवडा जाणवतो. जनावरांसाठी हिरवा चारा साठवून ठेवण्याची पद्धत आजही आपल्याकडे प्रचलित नाही. पिकांचे धान्य काढल्यानंतर राहिलेले अवशेष जनावरांचा चारा म्हणून वापरतात. खरंतर या वाळलेल्या चाऱ्यामध्ये पौष्टिक घटक कमी असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal food in summer days