हरित क्रांती झाल्यानंतर जास्त खर्चाच्या, प्रत्येक बाबतीत परावलंबी आणि एक पीक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवन अधिकच अशाश्वत केले आहे. अर्थात, आजही अनेक भागांमध्ये शेतकरी शाश्वत जीवन जगतो. त्यासाठी तो विविध पीकपद्धती अवलंबून किंवा शेतीला जोडधंद्याचा आधार देऊन स्वत:चा व्यवसाय शाश्वत करतो. शेतीच्या अनेक जोडधंद्यांपकी सर्वात जुना आणि शाश्वत जोडधंदा म्हणजे पशुसंवर्धन.
हा आपल्या पूर्वजांपासूनचा पारंपरिक व्यवसाय. भूमाता आणि गोमातेचे संवर्धन करणाऱ्या भूमिपुत्राला त्यांनी कधीही अडचणीत आणले नाही. परंतु प्रगतीच्या नावाखाली भूमिपुत्राने भूमातेच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिनेही उत्पादन कमी देण्यास सुरुवात केली. अनेक भूमिपुत्रांनी गोमातेला घरातून काढून टाकले. गोमाता आणि भूमाता यांना निसर्गाने एका चांगल्या चक्रामध्ये बसवलेले असूनही आपण मात्र त्यांची ताटातूट करतो. भूमाता गोमातेच्या पोषणासाठी चारा पिकवते, तर गोमाता भूमातेच्या पोषणासाठी शेण, गोमुत्रासारखे अत्यंत उपयुक्त खाद्य तयार करून खाऊ घालते. हेच खरे निसर्गचक्र.
पूर्वी शेतकरी म्हणायचा की दुधाचा पसा सतत चलनात राहातो. त्यामुळे दैनंदिन व्यवहार किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे काम दुधाच्या पशावरच होते. आजही मोठय़ा प्रमाणात अल्प व अत्यल्प भूधारक तसेच जिरायती भागातील शेतकरी या व्यवसायामुळे स्थिर आहेत. देशातील एकूण रोजगारापकी ८-९ टक्के रोजगारनिर्मिती या व्यवसायातून होत असते. विशेषत: घरच्या घरी काम करता येते, म्हणून महिलांचा या व्यवसायामध्ये ८५-९० टक्के वाटा आहे. देशातील ६५ टक्के शेतकरी कुटुंबाकडे हा व्यवसाय आहे.
अनेकदा हवामानातील बदलामुळे पीक वाया गेले किंवा बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतीमध्ये नुकसान झाले, तरीही ज्या शेतकऱ्यांकडे दुग्धव्यवसाय आहे, त्यांना त्याची फार मोठी झळ बसत नाही. म्हणजेच दुग्धव्यवसाय अशा शेतकऱ्यांसाठी विम्याच्या कवचकुंडलासारखे काम करते. ज्या भागामध्ये दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन आहे, त्या भागात गरिबीचे प्रमाण कमी दिसून आल्याचे एका पाहाणीचा अहवाल आहे. हवामानामध्ये बदल होत असताना दुग्धव्यवसायासारखे शाश्वत उत्पादन देणाऱ्या व्यवसायाची शेतकऱ्यांना गरज आहे.
कुतूहल- शाश्वत कृषी विकासासाठी पशुसंवर्धन
हरित क्रांती झाल्यानंतर जास्त खर्चाच्या, प्रत्येक बाबतीत परावलंबी आणि एक पीक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवन अधिकच अशाश्वत केले आहे. अर्थात, आजही अनेक भागांमध्ये शेतकरी शाश्वत जीवन जगतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal husbandry for sustainable agriculture development