भारतातील ७० ते ७२ टक्के लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते. आपल्याकडे सहा लाखांच्या वर खेडी आहेत. ग्रामीण भाग म्हटला की शेती आलीच. शेती म्हटलं की त्याला लागणारे पशू आले. शेतकाम म्हणजे अन्नधान्य, फळे, भाज्या इत्यादी पिकविण्यासाठी जमिनीची करावी लागणारी मशागत व शेतापर्यंतची वाहतूक. आपल्याकडे शेतजमिनी लहान आकाराच्या आहेत. प्रत्येकाच्या हद्दीसाठी एक ते दोन फूट उंचीचे बांध आहेत. त्यामुळे यांत्रिकीकरणाला अडथळा येतो. म्हणून या कामांकरिता पशूंची गरज लागते. या पशूंना वर्षांतील जेमतेम ६५ ते ८० दिवस काम असते.
भारतात साधारणपणे गोवंशातील बल, म्हैसवर्गातील रेडे तसेच विशिष्ट राज्यांमध्ये मिथुन, याक, घोडे, उंट, गाढव यांच्याकडून शेतीकाम करून घेतले जाते. शेतीकामात नांगरणी, सपाटीकरण, पेरणी, कोळपणी, खुरपणी, फवारणी, वाडीला पाणी देणे, वाहतूक इत्यांदींचा अंतर्भाव आहे. भारतातील शेती पठारावर, उंचसखल उतारावर केली जाते. निसर्गाने त्या त्या भागात जगणाऱ्या, काटक, आकाराने लहान-मोठय़ा अशा वेगवेगळ्या जाती निर्माण केल्या आहेत.
गेल्या ४० वर्षांपासून संकरित गोवंशातील बल तयार झाले. त्यांना वशींड नाही म्हणून त्यांच्या खांद्यावर जू ठेवता येत नाही, अशी ओरड झाली. मी स्वत: उरळीकांचन येथील ‘बायफ’ संस्थेमार्फत पाच राज्यांत काम केले. सर्वाकडे संकरित बलाने मूळ भारतीय जातींच्या बलांपेक्षा कमी वेळात दीड ते दोन पट जास्त काम केले. या बलांना तापमान कमी असताना कामाला जुंपले तर त्यांना व त्यांच्याबरोबरच्या मानवाला उन्हातान्हाचे घाम गाळून, थकून काम करावयास नको. शेतीकामाची वेळ थोडी बदलली म्हणजे झाले.
महाराष्ट्रापुरते बघायचे झाल्यास डोंगरी व जास्त पावसाच्या प्रदेशात तुकतुकीत, बुटकी काळ्यापांढऱ्या रंगाची डांगी ही जात तर कमी पावसाच्या जास्त उन्हाळ्याच्या पठारी भागात पांढऱ्या रंगाची थोडीशी काटकुळी खिलार जात निसर्गाने निर्माण केली. या जाती गोवंशाच्या आहेत. म्हशींच्या जातींमध्ये भारताच्या ईशान्य भागात काटक, बुटक्या, पाण्याने शेत भरलेल्या जागेत उभे राहू शकतील, असे बल व रेडे तयार झाले.
कुतूहल- भारतातील शेतीसाठी उपयुक्त पशू
भारतातील ७० ते ७२ टक्के लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते. आपल्याकडे सहा लाखांच्या वर खेडी आहेत. ग्रामीण भाग म्हटला की शेती आलीच. शेती म्हटलं की त्याला लागणारे पशू आले. शेतकाम म्हणजे अन्नधान्य, फळे, भाज्या इत्यादी पिकविण्यासाठी जमिनीची करावी लागणारी मशागत व शेतापर्यंतची वाहतूक.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-06-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal suitable for agriculture