योगेश सोमण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फ्लेरोव्हिअमच्या शोधाची गोष्ट म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ ही उक्ती सार्थ ठरविणारी आहे. अमेरिकेच्या लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी आणि रशियाच्या जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे या मूलद्रव्याचा शोध लावला. १९९८ साली युरी ओग्नेसिअन आणि व्लादिमिर उटय़ोनकोव यांनी प्ल्युटोनिअमवर कॅल्शिअमच्या अणूंचा मारा करून फ्लेरोव्हिअम तयार केले. तब्बल ४० दिवस चाललेल्या या प्रयोगात पाच अब्ज ५ x १०१८ इतक्या कॅल्शिअम अणूंचा मारा केल्यानंतर फ्लेरोव्हिअमचा एक अणू तयार झाला! पुढील वर्षांत फ्लेरोव्हिअमचे आणखी दोन अणू मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.
खरं तर याआधीही अणुक्रमांक ११४चे मूलद्रव्य तयार करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी झाला. लॉरेन्स प्रयोगशाळेचे ग्लेन सीबोर्गही हे मूलद्रव्य मिळविण्याच्या प्रयोगात सहभागी होते. डिसेंबर १९९७ मध्ये ग्लेन सीबोर्ग यांनी ‘मूलद्रव्य मिळविणे हे माझं खूप दिवसांचं, सुंदर स्वप्न आहे’ असं म्हटलं होतं.
युरेनिअमच्या स्वयंस्फूर्त विखंडनाचा शोध लावणाऱ्या जॉर्जी फ्लेरॉव्ह यांच्या नावावरून या मूलद्रव्याचे नाव फ्लेरोव्हिअम असे ठेवण्यात आले. फ्लेरोव्हिअमची २८६ ते २८९ अणुभार असलेली चार समस्थानिके ज्ञात आहेत. सर्वाचा अर्धायुष्यकाल फक्त काही सेकंदाचाच आहे. सद्धांतिक भाकितानुसार फ्लेरोव्हिअमचे २९० अणुभार असलेले समस्थानिक सर्वात स्थिर असेल; म्हणजेच त्याचा अर्धायुष्यकाल ३०-४० सेकंद ते काही मिनिटांपर्यंत असण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप हे समस्थानिक तयार करण्यात यश आलेले नाही.
शिसे मूलद्रव्याच्या गटात येणाऱ्या आणि त्याच्या खाली वसलेल्या फ्लेरोव्हिअमला इका-लेड असे नाव देण्यात आले होते. शिशाप्रमाणेच हे मूलद्रव्यही बऱ्याच प्रमाणात स्थिर असेल असा अंदाज बांधण्यात आला होता. १९९८ पासून आजपर्यंत फ्लेरोव्हिअमचे फक्त २०० ते ३०० अणूच तयार करण्यात आले आहेत. परंतु फक्त एवढय़ाच अणूंवर प्रयोग करून शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार धातुरूपात असण्याची अपेक्षा असलेले फ्लेरोव्हिअम निष्क्रिय वायूचे गुणधर्म दाखवत असल्याचे आढळले आहे. अजूनही फ्लेरोव्हिअम निष्क्रिय वायूप्रमाणे असेल की धातूप्रमाणे याचं कोडं उलगडलेलं नाही.
महत्प्रयासाने या मूलद्रव्याचे अणू मिळत असल्याने अर्थातच संशोधनाव्यतिरिक्त या मूलद्रव्याचे इतर काहीच उपयोग नाहीत.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org