श्रुती पानसे contact@shrutipanse.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभ्यासामध्ये आपण ‘सुखद धक्का’ हा घटक आणू शकतो का? पालक आणि शिक्षकांनी याचा जरूर विचार करावा, कारण याचा संबंध थेट स्मरणशक्तीशी आहे.
समजा, एक दिवस भूमितीचा तास हा वर्गात न भरवता अचानक मदानावर भरवला आणि मदान मुलांनी काढलेल्या वर्तुळं आणि विविध कोनांनी भरून गेलं तर? असं होऊ शकतं का? कदाचित त्या दिवशी शिकवलेलं सर्व मुलांसाठी अविस्मरणीय असेल. आपोआप मुलांच्या लक्षात राहील.
याचं कारण शाळेतल्या वर्गाचं रूटीन शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं असतं; पण अचानक एखाद्या दिवशी वर्गात नवे शिक्षक आले किंवा वर्ग चालू असताना कोणत्या तरी कारणामुळे अचानक हास्याचा स्फोट झाला तर हा अनुभव स्मृतींमध्ये नकळत जाऊन बसतो.
कधीकधी तर हे आपल्या लक्षात आहे याची जाणीवही नसते. कोणी तरी आठवण करून दिली की ते सगळं आठवतं. अशा किती तरी आठवणी मनाच्या कोपऱ्यामध्ये घर करून राहिलेल्या असतात. मात्र मेंदूच्या याच शक्तीचा उपयोग करून स्मृती तयार होऊ शकते.
अशा स्मृती तयार होण्याचं कारण म्हणजे त्यात आश्चर्य आणि त्यासोबत आनंद किंवा दु:ख याचा भाग जास्त असतो. अचानक, अनपेक्षित आणि विपरीत असं काही घडलं तर ते लक्षात राहतं. आपल्या स्मृतींचा एक भाग बनून राहतं. आपल्याही नकळत ती (कदाचित बिनमहत्त्वाची) घटना साठवून ठेवलेली असते.
या स्मृती आपल्या नकळत तयार होतात याचं शास्त्रीय कारण म्हणजे त्या घटनेचे आपोआप न्यूरॉन्स जुळलेले असतात. सिनॅप्स तयार झालेले असतात. कसलाही विशेष सराव नसताना हे आठवतं. याचं कारण ते भावनांशी निगडित आहे. अमिग्डाला या नावाचा एक छोटासा अवयव भावनांच्या क्षेत्रात ते साठवून ठेवतो.
वास्तविक रीतसर स्मृती जतन करणारा भाग म्हणजे हिप्पोकॅम्पस. आपण जेव्हा जाणीवपूर्वक नव्या गोष्टी शिकतो, तेव्हा त्या हिप्पोकॅम्पसमध्ये साठवून ठेवल्या जातात; परंतु अशा प्रसंगात मात्र अमिग्डाला पुढाकार घेतो, ते त्या प्रसंगातल्या भावनांच्या अस्तित्वामुळे. धक्का दु:खद असेल तरीही लक्षात राहील! पण त्यापेक्षा सुखद धक्के दिलेले केव्हाही चांगलंच!