योगेश सोमण

अणूंची आंतररचना सूर्यमालेसारखी असते, असा सिद्धांत मांडणारे डेनिश शास्त्रज्ञ नील्स बोहर यांनी १९२२ मध्येच अणुक्रमांक ११८ असणाऱ्या मूलद्रव्याचे भाकीत केले होते. आवर्तसारणीच्या नियमानुसार इतर निष्क्रिय वायूंच्या गटात बसणारे हे मूलद्रव्यदेखील एक निष्क्रिय वायूच असेल असा अंदाज त्यांनी बांधला होता. १९२२ मध्ये प्रयोगशाळेत एका मूलद्रव्यावर अणूंचा मारा करून कृत्रिम मूलद्रव्ये तयार करता येतात हेच ज्ञात नव्हते.

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश

या भाकितानंतर बरोबर ८० वर्षांनी इ.स. २००२ मध्ये रशियातील जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात ११८ अणुक्रमांकाचे अस्तित्व दिसून आले. कॅलिफोर्निअमच्या पातळ थरावर कॅल्शिअम अणूंचा मारा करून केलेल्या प्रयोगात ११८ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचा एक अणू तयार झाला. सुपरहेवी (अतिशय जड) मूलद्रव्याच्या गटातील इतर मूलद्रव्यांप्रमाणे याहीवेळी अमेरिकेची लॉरेंस लिवरमोअर प्रयोगशाळा आणि जे.आय.एन.आर. यांच्या संयुक्त प्रयोगात ओगनेसन मूलद्रव्य तयार केले. २००६ मध्ये शास्त्रज्ञांनी ओगनेसनचे अणू तयार केल्याचे जाहीर केले. जॉइंट वर्किंग गटाने (IUPAC & IUPAP) २०१५ साली या मूलद्रव्याच्या संशोधनाला मान्यता दिली आणि २०१६ साली याचे नामकरण करण्यात आले.

२००२ पासून आजपर्यंत ओगनेसनचे फक्त पाच-सहाच अणू तयार झाले आहेत. सर्वाधिक अणुभार असलेल्या या मूलद्रव्याची ओगनेसन-२९४ आणि ओगनेसन-२९५ अशी दोन समस्थानिके आढळली आहेत. अत्यंत अस्थिर असलेल्या या समस्थानिकांचा अर्धायुष्यकाल फक्त १८ ते २० मिलिसेकंद इतका कमी आहे. सापेक्षतेच्या परिणामामुळे आवर्तसारणीत निष्क्रिय वायूंच्या गटातले हे मूलद्रव्य असले तरी, सामान्य तापमानाला ते अति-बाष्पनशील आणि क्रियाशील धातुरूपात असेल असे सुरुवातीच्या प्रयोगावरून दिसून आले आहे.

सुपरहेवी मूलद्रव्यांच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे रशियन अणुशास्त्रज्ञ युरी ओगनेसिअन यांच्या सन्मानार्थ या मूलद्रव्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. निष्क्रिय वायूंच्या गटातील हेलिअम हे एक मूलद्रव्य वगळता इतर सर्व नावे  ‘ ल्ल’ यांनी संपतात. त्या परंपरेत ओगनेसन हे नावही चपखल बसते. स्वत:च्या हयातीत एखाद्या मूलद्रव्याला शास्त्रज्ञाचे नाव देण्याची सीबोर्जीअम-106 नंतरची ही दुसरी खेप! मेंडेलीवच्या नामकरण पद्धतीनुसार या मूलद्रव्याचे नाव इका-रेडॉन असे होते. आयुपॅकच्या नवीन मूलद्रव्याच्या नामकरण पद्धतीनुसार या मूलद्रव्याला अनअनऑक्टिअम असे संबोधले गेले. ओगनेसन हे आवर्तसारणीतील आताचे शेवटचे मूलद्रव्य; यापुढेही मूलद्रव्ये तयार केली जातील; पण आता तरी आवर्तसारणीतील मूलद्रव्यांना तात्पुरता विराम.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Story img Loader