भानू काळे bhanukale@gmail.com

काही दिवसांपूर्वी ‘डालडा’ शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी या सदरात लिहिले होते. ते एका कंपनीने वनस्पती तुपाला दिलेले नाव आहे; पण ते इतके लोकप्रिय ठरले, की ‘डालडा’ हाच वनस्पती तुपाला प्रतिशब्द झाला! असाच दुसरा एक शब्द आज जवळपास सर्वच भाषांत रूढ झाला आहे. तो शब्द आहे झेरॉक्स. आजही ‘झेरॉक्स काढून मिळेल’ अशा पाटय़ा सर्वत्र दिसतात; ‘फोटोकॉपी काढून मिळेल’ अशी पाटी कुठेच दिसत नाही! 

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
two friends conversation new two wheeler joke
हास्यतरंग : नवीन गाडी…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
FIDE president controversy news in marathi,
‘फिडे’ अध्यक्ष द्वोर्कोविच राजीनामा देणार का?अधिकारांचा गैरवापर केल्याचा कार्लसनचा आरोप
Neil Nitin Mukesh
नील नितीन मुकेशला अधिकाऱ्यांनी घेतलं होतं ताब्यात; न्यूयॉर्क विमानतळावरील प्रसंग सांगत म्हणाला…

या शब्दाचे निर्माते चेस्टर कार्लसन हे न्यू यॉर्क येथील पेटंट कार्यालयात वकिली करत. तिथे दस्तावेजांच्या अनेक प्रती लागत व त्या टाइप करून घेणे खूप कष्टाचे काम होते. त्यावर बराच अभ्यास करून त्यांनी १९३८ साली अशा प्रती काढायची प्रक्रिया शोधली. तिला झेरॉग्राफी असे नाव देऊन तिचे पेटंटदेखील घेतले. ‘झेरो’ आणि ‘ग्राफी’ हे ‘कोरडे’ आणि ‘लेखन’ या अर्थाचे दोन ग्रीक शब्द. या प्रक्रियेत ओल्या शाईचा नव्हे, तर कोरडय़ा पावडरीचा वापर होत असे. संशोधनाला जोवर व्यावसायिक स्वरूप लाभत नाही, तोवर ते तसे उपयुक्त ठरत नाही. कार्लसन यांच्या बाबतीत तेच घडले. आयबीएमसारख्या बडय़ा कंपन्यांनी ते पेटंट खरेदी करायला नकार दिला. पुढे २० वर्षांनी त्यांना जोसेफ विल्सन हे उद्योजक भेटले. त्यांनी कार्लसन यांच्याशी भागीदारी करून १९५९ साली झेरॉक्स ९१४ हे यंत्र बाजारात आणले. ते प्रचंड लोकप्रिय झाले. ‘सर्वाधिक यशस्वी एकल उत्पादन’ (‘द मोस्ट सक्सेसफुल सिंगल प्रॉडक्ट’) म्हणून त्याचा जगभर गौरव झाला. पुढे काही जपानी कंपन्यांनी झेरॉक्सला जोरदार टक्कर दिली, पण त्यांच्यावर झेरॉक्सने मात केली. याच झेरॉक्सने १९६९ साली पहिल्या लेझर पिंट्ररची निर्मिती केली. आजच्या प्रकाशन व्यवसायात क्रांती करणारे आणि पुस्तकाच्या एक ते ३०० कितीही प्रती काढायची सोय असलेले ‘पिंट्र ऑन डिमांड’ हे यंत्रही याच कंपनीचे. अध्यक्षपदी आफ्रिकन-अमेरिकन महिलेची नेमणूक करणारी पहिली ‘फॉच्र्युन ५०० कंपनी’ हीच. आपल्या दृष्टीने एक रोचक बाब म्हणजे कार्लसन भगवद्गीतेचे अभ्यासक होते.   आजही आपल्याला विविध अर्जासोबत कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या लागतात. त्यासाठी कोणी छायाप्रत काढत नाही, फोटोकॉपीही काढत नाही; सगळे ‘झेरॉक्स’ काढतात!

Story img Loader