आता उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसांमध्ये समुद्रसपाटीला असलेली शहरे आणि समुद्रसपाटीपासून लांब व उंचावर असलेली शहरे यांमध्ये उन्हाची तीव्रता वेगवेगळी असल्याचे जाणवते. याचे कारण हवेतील आर्द्रता हे आहे. समुद्रसपाटीला, किनाऱ्यालगत  साधारणपणे तापमान कमी असते अशा वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढत जाते. त्यासोबत हवेची उष्णता साठवण्याची क्षमतादेखील वाढत जाते. परिणामी उकाडा आणि चिकचिकाट वाढतो. मात्र, हवेतील या बाष्पाचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करता आले तर? भारतासारखे अनेक देश आहेत, जिथे पिण्याच्या शुद्ध व स्वच्छ पाण्याची तीव्र टंचाई भासते. ती पाहता, हवेतील बाष्पावर काही प्रक्रिया करून असे पाणी मिळवता येईल का, यावर जगभरात मोठय़ा प्रमाणात संशोधन झाले आहे आणि भारतासह अनेक देशांमध्ये अशा स्वरूपाचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जर्मनीत स्टुटगार्त या शहरातील ‘फ्रॉनहॉफर इन्स्टिटय़ूट फॉर इंटरफेशियल इंजिनीअिरग अ‍ॅण्ड बायोटेक्नोलॉजी (आयजीबी)’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एका खासगी कंपनीच्या सहकार्याने हवेतील बाष्पाचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचे वैशिष्टय़ असे की, या संपूर्ण प्रक्रियेसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर केला जातो. त्यामुळे ऊर्जेच्या दृष्टीने ही यंत्रणा स्वयंपूर्ण असून वीजप्रवाह उपलब्ध नसलेल्या ठिकाणीदेखील तिचा वापर करता येतो. या यंत्रणेत एका उंच मनोऱ्यासारख्या उपकरणातून हवेतील बाष्प शोषून घेण्याचा गुणधर्म असलेले ‘ब्राइन सोल्युशन’ (क्षारयुक्त पाणी) सोडण्यात येते. ते हवेतील बाष्प शोषून घेते आणि पुढे जमिनीलगतच्या निर्वात पोकळी असलेल्या टाकीमध्ये खेचले जाते. या टाकीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून तापमान वाढवले जाते. परिणामी शोषलेल्या पाण्यामुळे  ब्राइन सोल्युशन सौम्य होते. येथील कमी दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू कमी होतो. त्यामुळे बाष्पीभवन झालेले क्षारयुक्त पाणी हे संक्षेपणाने (कण्डेन्सेशन) नियंत्रित करून वेगळे केले जाते. पाण्याच्या स्तंभातील घनतेच्या फरकामुळे येथे कायम पोकळी राहून ही प्रक्रिया सातत्याने सुरूच राहते. गतवर्षी डिसेंबरमध्ये भारतातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर ‘मेघदूत’ या नावाने हवेतील बाष्पापासून पिण्याचे पाणी तयार करणारे यंत्र बसवले आहे. ‘फॉण्टस’ या नावाची एक बाटलीही उपलब्ध आहे, जिच्यात हवेतील बाष्पाचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करता येते.

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org