या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जीवावरणात सुमारे ३.७ अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टीचा उगम झाला आणि उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू झाली. आजपर्यंतच्या या उत्क्रांतीच्या प्रवासात पृथ्वीच्या वातावरणात खूप मोठे बदल होत गेले आणि त्या अनुषंगाने जीवसृष्टीमध्येदेखील प्रचंड उलथापालथ होत गेली. प्राणी व वनस्पतींच्या हजारो प्रजातींचा सामूहिक विनाश झाला आणि त्या प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या; परंतु तितक्याच वेगाने हजारो नवीन प्रजाती अस्तित्वात आल्या. अशा घटना या अब्जावधी वर्षांच्या काळात पाच वेळा झाल्या असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे आज अस्तित्वात असलेली जीवसृष्टीतील विविधता अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांती प्रक्रियेचे फलित आहे असे मानले जाते. मानव गेली अनेक शतके पृथ्वीचा जन्म आणि जीवसृष्टीचा उगम याचा अभ्यास करत आला आहे. जीन बाप्टिस्ट लामार्क, चार्ल्स डार्विन, ग्रेगॉर मेण्डेल, ज्युलियन हक्सले यांसारख्या संशोधकांनी शंभर-दोनशे वर्षांपूर्वी सजीवांची उत्क्रांती व त्यांच्या लक्षणांमध्ये, गुणधर्मामध्ये असलेले कमालीचे वैविध्य आणि मूलभूत साधम्र्य यावर सखोल अभ्यास करून खूप महत्त्वाचे निष्कर्ष लोकांसमोर मांडले. प्रत्यक्षात ‘बायोडायव्हर्सिटी’ या शब्दाचा व्यवहारात, पर्यावरणाच्या अभ्यासात वापर सुरू झाला तो १९८० नंतर. तोपर्यंत ‘नॅचरल डायव्हर्सिटी’ हा शब्द जास्त प्रचलित होता. १९८६ मध्ये विल्यम रोसेन या अमेरिकी जीवशास्त्रज्ञाने ‘बायोडायव्हर्सिटी’ हा शब्द वापरात आणला आणि आता तोच प्रचलित आहे. मराठीमध्ये ‘जैविक विविधता’, ‘जैवविविधता’ किंवा ‘जीविधता’ असे शब्द प्रचलित आहेत.

साध्या अथवा शक्तिशाली सूक्ष्मदर्शकाखालीच दिसू शकतील असे अमिबा, जिवाणू आणि इतर विविध प्रकारचे लक्षावधी सूक्ष्म जीव ते साध्या डोळ्यांनी सहज दिसू शकतील असे लक्षावधी प्राणी व वनस्पती आणि माणूस यांचे शरीर पेशींचे बनलेले असते. या सर्वानाच आपल्या दैनंदिन जीवनक्रिया चालू ठेवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. अशी काही मूलभूत लक्षणे या सजीवांमध्ये सारखीच आहेत; परंतु इतर अनेक लक्षणे वेगळी आहेत. उदाहरणार्थ, हरित वनस्पती सूर्यप्रकाशातील ऊर्जा वापरून स्वत:चे अन्न स्वत:च ‘बनवतात’. प्राण्यांमध्ये ही क्षमता नसते. असे अनेक वेगळे गुणधर्म आपल्याला आढळून येतात आणि हीच जैवविविधतेची खासियत आहे!

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org