– डॉ. यश वेलणकर

‘डिप्रेशन’ हा आजार कोणत्याही जंतूमुळे होत नसला, तरी साथीच्या आजारासारखा वेगाने वाढतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार, जगात ३० कोटी लोकांना कोणत्या न् कोणत्या प्रकारचे ‘डिप्रेशन’ आहे. आत्महत्या आणि व्यसनाधीनता यांचे मुख्य कारण ‘डिप्रेशन’ हेच आहे. ‘डिप्रेशन’ का होते, याबद्दल संशोधन सुरू आहे. माणसाचा मेंदू बाह्य़ परिस्थिती आणि शरीरातील घडामोडी यांना जाणून दोन निकषांवर प्रतिक्रिया करीत असतो. एक निकष- हा अनुभव चांगला की वाईट, असा असतो. दुसरा निकष- ‘अराउज्ड’ म्हणजे उत्तेजित होऊन लगेच कृती आवश्यक की शांत राहणे योग्य, असा असतो. या दोन निकषांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘सुखद शांत’, ‘सुखद सक्रिय’, ‘दु:खद शांत’ आणि ‘दु:खद सक्रिय’ अशा मनाच्या चार स्थिती निर्माण होतात.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

माणूस निवांत, रिलॅक्स असतो, त्या वेळी ‘सुखद शांत’ स्थिती असते. ‘सुखद सक्रिय’ म्हणजे तो काही तरी करीत असतो आणि ती कृती आनंददायी असते. ‘दु:खद सक्रिय’ स्थिती त्रासदायक तणावाची आणि चिंतेची असते. ‘दु:खद शांत’ स्थिती औदासीन्याकडे झुकणारी असते. आपल्या रोजच्या आयुष्यात या चारही अवस्था कधी ना कधी येत असतात. निवांतपणा, उत्साह, काळजी आणि कंटाळा हे मूड्स म्हणजे चार नैसर्गिक भावना आहेत. आपला मनाचा लंबक या चार स्थितींच्या वर्तुळात फिरत असतो. मात्र तो ‘दु:खद सक्रिय’ आणि ‘दु:खद शांत’ या दिशांना अधिक दूरवर जाऊ लागला, की मानसिक अस्वस्थता वाढू लागते. हळूहळू याच दोन स्थिती अधिकाधिक वेळ राहू लागतात. सुखद स्थितीच्या अवस्थेत मन जातच नाही, गेले तरी फार काळ राहात नाही. मनात चिंता किंवा उदासी निर्माण करणारे विचार अधिकाधिक येऊ लागतात. या दोन्ही भावना आलटून पालटून जाणवू लागतात.

काही जणांत लंबक एकाच ठिकाणी अधिक राहू लागतो आणि केवळ चिंता किंवा फक्त औदासीन्यदेखील असू शकते. तीव्र दु:खद सक्रिय स्थितीमध्ये आत्महत्येचे प्रयत्न होतात. ते कमी करण्यासाठी वैद्यकीय मदत, औषधे, मानसोपचार आवश्यक आहेत. पण अशी स्थिती येऊ द्यायची नसेल, तर ‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना समजून घेऊन रूढ करायला हवी.

yashwel@gmail.com