डॉ. श्रुती पानसे
मूल ते माणूस – हा प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. ‘मी एक चांगली व्यक्ती आहे आणि मी मला आवडते/ आवडतो’ असं स्वत:बद्दल छान वाटलं तर स्वत:शी मत्री होईल. हे कसं करता येईल? अशी कित्येक मुलं आहेत ज्यांना आपलेपणा मिळत नाही ती मुलं परिस्थितीशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न करतात. मुलगा की मुलगी, अभ्यासातली हुशारी की अक्षमता, यशस्विता, आर्थिक वर्ग, जातीभेद, वंशभेद, विभिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मुलं स्वीकारली जात नाहीत.
आपल्या मेंदूची जडणघडणच अशी असते की आपल्याला इतर माणसांशी जोडून घ्यायला आवडतं. आपण समाजशीलच असतो. इतरांशी मत्री करायला निश्चितच आवडते. आपल्या जवळपास आपली माणसं आहेत, यासारखी सुखासमाधानाची गोष्ट नाही. आपलं कोणीतरी आहे, या भावनेत सुख मिळतं. मुलांना घरात कितीही माणसं असली तरी खेळायला मित्र लागतात आणि कितीही मित्रांशी खेळलं तरी घरी मोठी माणसं हवी असतात. आपलेपणाची जाणीव अशी होत जाते. माझं कोणीतरी आहे, मला प्रेम मिळतं या भावनेतच जी मुलं मोठी होतात, त्यांच्यात सुरक्षितता निर्माण होते. जी मुलं आईबाबा असोत किंवा नसोत, एकाकी अवस्थेत, प्रेमहीन अवस्थेत लहानपण काढतात, त्या मुलांमध्ये या भावनांचा अभाव राहतो. सुबत्ता आहे पण प्रेम नाही, अशी उदाहरणं असतात. त्याचप्रमाणे सुबत्ता नाही आणि प्रेमही नाही अशीही उदाहरणं असतात. तसंच सुबत्ता नाही, पण प्रेम आहे, ही उदाहरणंही असतात. प्रेमात वाढलेली मुलं जास्त संतुलित वाटतात. मोठं झाल्यावर मुलांनीच यावर समजून उमजून मात करायची ठरवली तर मुलं अतिशय स्वयंपूर्ण, छान जगतात. मात्र ते त्यांना ठरवावं लागतं. मात्र त्या आधी त्यांनी जगण्याचा बराच संघर्ष झेललेला असतो. आपण कसेही असलो तरी स्वीकारले जातो आहे, याने स्वभावाची जडणघडण भक्कम होते. मात्र जेव्हा प्रेमहीन वातावरणात आणि कडक शिस्तीत जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो तेव्हा परकेपणाची भावना रुजते. त्या लोकांप्रमाणे वागलं तरच ठीक, अशा वातावरणात व्यक्तिमत्त्व फुलवायला अडचण येते, कारण स्वातंत्र्य नसतं.
म्हणून मुलं जशी आहेत तशी त्यांच्या वेगळेपणासह स्वीकारली जायला हवीत. स्वीकार केला की बोचरी टोकं बोथट होतात.
contact@shrutipanse.com