पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१ टक्के असूनही त्यातील केवळ तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. निरोगी आरोग्यासाठी हे उपलब्ध पाणी शुद्ध असणे आवश्यक आहे. पाणी हे जीवनाच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक असल्यामुळे पाण्याचा वापर गरजेइतकाच करून पाणी वाचवणे आणि त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. परंतु लोकसंख्यावाढीबरोबरच वाढती अन्नगरज, फोफावणारे शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या वेगाने उपलब्ध जलसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे.
दर वर्षी पाणीटंचाई जाणवत असतेच, परंतु पाणीटंचाईच्या कालावधीतही वाढ होत चालली आहे. याचा संबंध जागतिक तापमानवाढ आणि बदलते हवामान यांच्याशी जोडला जातो. कारण या बदलांमुळे मोसमी पावसाचे नियमित चक्र काहीसे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जलसाठे पुरेसे भरत नाहीत. हा हवामान बदल प्रामुख्याने वातावरणात कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या प्रमाणामुळे होतो आहे. सध्या ज्या गतीने आपण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करीत आहोत, त्या गतीने येत्या काही वर्षांत कित्येक अब्ज टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात टाकलेला असेल. हे प्रमाण लक्षात घेतले, तर भविष्यात जागतिक तापमानवाढीचे आणि पर्जन्यमान घटण्याचे महाभयानक संकट साऱ्या जगावर कोसळणार आहे. तसा इशारा ‘नेचर’ या प्रसिद्ध विज्ञानविषयक नियतकालिकात देण्यात आला आहे. म्हणूनच शाश्वत विकासासाठी पाण्याची योग्य पद्धतीने साठवणूक, जपणूक आणि व्यवस्थापन आवश्यक आहे. हे करण्यासाठी केवळ राज्यकारभार चालवणारे सरकार आणि त्यांच्या योजना यांवरच अवलंबून राहणे अपेक्षित नाही. यामध्ये सामूहिक सहभाग अत्यंत आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, पाण्याच्या संवर्धनात आणि संरक्षणात जनजागृती होऊन या राष्ट्रीय कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून गैरसरकारी संस्था (स्वयंसेवी संस्था), ग्रामपंचायती, शहरी स्थानिक संस्था, जल वापरकर्ता संघटना, कॉर्पोरेट क्षेत्र, व्यक्ती, आदींसाठी केंद्र सरकारच्या जलसंपदा व नदी विकास मंत्रालयातर्फे ‘भूजल वाढ पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ २००७ पासून सुरू करण्यात आले. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ आणि कृत्रिम ‘रिचार्ज’द्वारे भूजल वाढीच्या नवीन पद्धतींचा अवलंब करणे, पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढवणे, पाण्यावर पुनप्र्रक्रिया व पुनर्वापर करणे आणि पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात लोकांच्या सहभागाद्वारे जनजागृती करणे या दृष्टीने विधायक कार्य करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते.
मनीष चंद्रशेखर वाघ
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org