‘हे माझे शरीर आहे, हे माझे मन आहे’ याचे भान माणसात वयाच्या एक वर्षांपासून विकसित होऊ लागते. असे आत्मभान तपासण्याची मानसशास्त्रात एक चाचणी आहे. लहान मुलाच्या चेहऱ्यावर रंगीत टिकली लावून त्याला आरसा दाखवला, तर आरशात पाहून- ही टिकली आपल्या चेहऱ्यावर आहे हे समजल्याने चेहऱ्यावरील टिकलीवर बोट नेणे, हे आपले शरीर आरशापेक्षा वेगळे आहे याचे भान असल्याचे लक्षण आहे. एक वर्षांपेक्षा लहान मुले हे करू शकत नाहीत. १५ ते १८ महिने वय असलेल्या २५ टक्के मुलांना हे भान असते, तर दोन वर्षांच्या ७० टक्के मुलांना हे भान आलेले असते. अन्य प्राण्यांवरदेखील ही चाचणी शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यासाठी त्यांना बेशुद्ध करून चेहऱ्यावर अशी टिकली लावून शुद्धीवर आल्यानंतर आरसा दाखवला जातो. पूर्ण वाढ झालेले चिम्पांझी, गोरिला, पेंग्विन आणि भारतीय हत्ती आरशात पाहून चेहऱ्यावर जेथे टिकली असते, तेथे स्पर्श करू लागतात. अन्य प्राणी वा पक्षी यांना हे भान नसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा