१९९७ साली वडिलांची झालेली हत्या, संशयातून आईला झालेला तुरुंगवास, नातलग आणि गावकऱ्यांचा बहिष्कार, उदरनिर्वाहासह तीन बहिणींची पडलेली जबाबदारी. अशा प्रतिकूल परिस्थितीत एका तरुणीने नाइलाजाने शिक्षण सोडून, एकटीने शेती करायला सुरुवात केली. आई-वडील शेतीची कामे करीत असल्यामुळे शेतीकामाचा अनुभव सुनंदा व तिच्या बहिणींना नव्हता. शेतीच्या कामासाठी एका युवकाला कामाला ठेवले होते, पण वाईट अनुभव आला. त्यामुळे औत जुंपणी, नांगरणी, मळणी, तोडणी या कामांसह शेतीमाल बाजारात पाठवण्यापर्यंतची सर्व कामे सुनंदाने तिच्या बहिणींच्या मदतीने केली. त्यांपकी काही कामे तर सुनंदाने दुरून बघून शिकून घेतली. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना २.२६ हेक्टर जमिनीवर संत्रे, चिकू, आंबा, सीताफळ इत्यादी फळझाडे लावली. खरीप हंगामात ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या मिश्रपिकांची तर रब्बी हंगामात गहू, आणि चण्याची लागवड केली. भाजीपाल्यामध्ये दरवर्षी लाखभर रुपयांचे कोबीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर तुतीची लागवड करून रेशीम उत्पादनाचा जोडधंदा आहे.
सुनंदाने ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केला तसेच स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने आमदार निधीतून मदत मिळवून शेतीतील कच्च्या विहिरीचे पक्के बांधकाम करून तिची साठवण क्षमता वाढवली.
शेतीतील तिच्या अनुभवाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मिळावा म्हणून ती करीत असलेल्या मार्गदर्शनाचा लाभ सुमारे २५० शेतकरी घेत आहेत. मिश्रपिकांचे फायदे आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व त्या शेतकऱ्यांना पटवून देतात. शासकीय शेती प्रशिक्षण शिबिरे त्यांच्या शेतात घेण्यात येतात, ही त्यांच्या कामाची पावती तर आहेच, पण त्याशिवाय हे विदर्भातील उदाहरण म्हणूनसुद्धा अधोरेखित करण्यासारखे आहे.
शेतीतील या कामासाठी सुनंदा यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार, बळीराजा- अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाले आहेत.
फळे साठविण्यासाठी पॅकहाऊस, भाजीपाला पिकांसाठी शेडनेट, शक्यतो सेंद्रिय पद्धतीने शेती व शेततळय़ाच्या माध्यमातून मत्स्यशेती करण्याचे सुनंदा यांचे पुढील उद्दिष्ट असून विदर्भातील शेतकऱ्यांसमोर शाश्वत शेतीचा आदर्श ठेवण्याचा तिचा मानस आहे.

जे देखे रवी.. – कर्म  : गहन आणि विचित्र
मागच्या लेखात मी Alexander  ताजमहल आणि पिरामिड यांच्याशी झटापट केली. मी तरी काय करणार? माझे डोके तिरपे किंवा उलटे चालते. तोही कर्माचाच प्रकार आहे. आपल्याकडे वितंडवाद नावाचा एक शब्द आहे त्याचे मूळ ‘वितंडा’ असे आहे आणि तो शब्द जवळजवळ २००० वर्षे जुना आहे. तो शब्द येतो गौतम नावाच्या माणसाने लिहिलेल्या न्याय दर्शनात. प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक तर त्यांच्या सारख्या चुका तरी काढायच्या त्याला गौतमाने छल असे नाव दिले. छळ हा शब्द तिथून आला किंवा मुद्दय़ाच्या भोवती काहीतरी भरमसाट बोलत राहायचे त्याला वितंडा असे नाव आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये वगैरे ठराव पास करण्यासाठी जर संध्याकाळची सहाची वेळ ठरली असेल आणि एखाद्याला तो ठराव पास होऊ नये वाटत असेल तर तो ‘वितंडा’ सुरू करतो. इतका वितंडवाद घालतो की सहा वाजून जातात, मग चर्चा अपुरी राहून तो ठरावच बारगळतो. या हिकमतीला त्यांच्याकडे ’Filibuster असे नाव आहे. एकंदरच मनुष्य जात लबाड आणि आत्मकेंद्रित हे लक्षात घेतलेले बरे. ज्ञानेश्वरांचे महाभारताचे वर्णन विवेकाचे उद्यान, सर्व सुखांचे मूळ, परमात्म्याचे घर, प्रमेयांचा ढीग आणि सगळ्या धर्माचे माहेर असे आहे. परंतु खुद्द महाभारतात आपल्याला काय दिशा दाखवली आहे ते ऐकले की कर्म गहन का ते समजते. उदा.
(१) सौम्य असो वा भयंकर, आपले कर्तव्य आपण करावे, स्वत:चा उद्धार करावा आणि मग समर्थ झाल्यावरच धर्माचरण करावे. हे विधान उलटे की सुलटे? हे विधान गीतेशी जुळते?
(२) बळ आणि तेज असलेला माणूसच धर्माचरण करू शकतो, अज्ञानी भुकेकंगाल हीन दीनाला कसला आला आहे मोक्ष?
(३) आपल्या विपरित स्थितीत आपण शत्रूला डोक्यावर घ्यावे, मग परिस्थिती बदलली की त्याचे मडके डोक्यावरून दगडावर आपटावे आणि त्याचा चक्काचूर करून टाकावा.
(४) बेसावधपणा घातक आहे. राज्यकर्त्यांनी कोणावरही विश्वास ठेवू नये. या उलट ज्या भरत राजाच्या नावाने महाभारत नावाची परंपरा सुरू झाली, त्याची आई म्हणजे शकुंतला दुष्यंताला म्हणते, ‘‘तू विसरला असशील आपल्या लग्नाची गोष्ट आणि म्हणून माझा स्वीकार करणार नसशील तरी त्याची मला पर्वा नाही. माझा सत्यावर विश्वास आहे आणि या सत्याच्या तुलनेत मी पती आणि पुत्र यांना तुच्छ मानते.’’ ही पुराणातील दुर्गाच. मी फक्त दुष्यंताची गोष्ट आठवावी. मी काही शिकारीला जात नाही. गेलो तरी शकुंतला भेटण्याची शक्यता नाही आणि समजा ती भेटली आणि तिच्याशी गांधर्व विवाह जरी झाला तरी तो तसला विवाहही विसरण्याची माझी छाती नाही.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

वॉर अँड पीस – मुखरोग: भाग-२
लक्षणे- १) अडखळत बोलणे- काही शब्द स्पष्ट बोलता न येणे, काही वेळेस बोलण्याचे सुरुवातीला वेळ लागणे. अडखळावयास होणे, सुचत असूनही शब्द बाहेर न उमटणे. २) खवखव व गिळावयास त्रास- घशात, गळ्याशी खवखवणे; जेवण गिळावयास त्रास, घसा दुखणे. ३) गालगुंड- गालाला बाहेरून, आतून सूज, गिळावयास त्रास, ताप येणे. ४) घटसर्प- टॉन्सिल्स व दोन्ही बाजूला तसेच जिभेच्या गळ्याकडील बाजूकडे पांढरे ठिपके. पाणी गिळावयास, बोलण्यास त्रास, खरवडले असता पांढरे ठिपके जातात. ५) जिभेवरील किटण- जिभेवर पांढरा काळसर जाड थर, पांढरे लाल ठिपके, जीभ जाड होणे. ६) पडजिभेचे विकार- पडजीभ लांबणे, लाल होणे, क्षोभ होणे, सतत खोकला. ७) तोंडात पांढरे ठिपके- गालाच्या आत, जिभेच्या वरखाली, टाळा, सर्वत्र कफाचे पांढरे आवरणाचे ठिपके. ८) शोष पडणे- तहान, कोरडा घसा , स्वरभंग, ओठाला कोरडेपणा.
कारणे- अडखळत बोलणे- अनुवंशिकता, आत्मविश्वासाचा अभाव, स्वरयंत्राची सूज, जड जीभ, जिभेचा आकार तुलनेने लहान, कफ विकारामुळे स्वरयंत्रात बिघाड. २) खवखव, गिळावयास त्रास- उष्ण, तीक्ष्ण, मसालेदार, अति थंड तुपकट पदार्थाचे मोठय़ा प्रमाणावर, अवेळी सेवन, खराब हवा, दूषित धूर, अति बोलण्याने घसा बिघडणे, ३) गालगुंड- रोगसंसर्ग, तीव्र उन्हाळा, दूषित पाणी, ४) घटसर्प-खराब हवा, दूषित पाणी, रोगाची साथ, रोग प्रतिकार शक्ती कमी, कफवृद्धी ५) जिभेवरील किटण- पोट साफ नसणे, जंत, कृमी, मलावरोध; जड आंबट, खारट, तिखट, तेलकट, थंड पदार्थाचे अतिरेकी, वारंवार सेवन, ६) जड जिभेचे विकार- शरीरात कफ किंवा पित्त खूप वाढेल, अशा प्रकारचे खाणे-पिणे, ७) मुखात पांढरे ठिपके- थंड, आंबट, गोड, तेलकट, तुपकट अशा कफवर्धक आहार विहाराचा अतिरेक, ८) शोष पडणे- अतिरेकी बोलणे, झोप, पोषण कमी, खूप तिखट, थंड, तेलकट अशा एकेरी गुणांच्या पदार्थाचे अतिरेकी सेवन.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत -१८ जून
१८९९ > तत्त्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. ‘सवरेदयदर्शन’, ‘गांधीजी: एक दर्शन’, ‘क्रांतिनिष्ठा’, ‘आपल्या गणराज्याची घडण’, ‘पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार’ अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९२० > संगीतविषयक पुस्तकांचे लेखक, संगीत-नाटय़ समीक्षक आणि अनुवादक माधव कृष्ण पारधी यांचा जन्म. ‘मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत’ हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर ‘भारतीय सैन्याची परंपरा’ (मूळ लेखक धर्मपाल), ‘स्वातंत्र्याचा लढा’ (बिपिनचंद्र त्रिपाठी), ‘भारतीय वाद्ये’ (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.
१९४२ > मराठीतील अद्भुत-कल्पनारम्य कादंबऱ्यांचा प्रभाव कमी व्हावा या ईर्षेपायी उत्तम माहितीपर पुस्तकांची भाषांतरे करणारे श्रीनिवास भिकाजी सरदेसाई यांचे निधन सरकारी नोकरी सोडून ते मराठी लेखनाकडे वळले, वृत्तपत्रांत कामे करून त्यांनी भाषांतरित कादंबऱ्यांच्या प्रकाशनासाठी ‘कादंबरीकल्प’ हे मासिक काढले होते.
१९९९ > तब्बल ५२ कादंबऱ्या आणि ११०० हून अधिक कथा (किमान ९ कथासंग्रह प्रकाशित) लिहिणारे श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.
– संजय वझरेकर