१८४९ साली रोममध्ये प्रजासत्ताक निर्माण होऊन पोपच्या ताब्यातील जमिनी आणि त्याचे अधिकार गेल्यामुळे पोपचे पाठीराखे आणि कॅथोलिक चर्च असंतुष्ट होते. मुसोलिनीने १९२९ साली यावर सर्वसंमत तोडगा काढला. त्या तोडग्यानुसार रोम शहरातील काही जागा पोपला मिळून व्हॅटिकन नगरराज्याची स्थापना झाली. सध्या व्हॅटिकन सिटी स्टेटचे निराळे सरकार असून त्याचे सर्वाधिकार सर्वोच्च कॅथोलिक धर्मगुरू पोपकडेच असतात. १९१४ साली पहिल्या महायुद्धात सुरुवातीस इटालीने तटस्थतेची भूमिका घेतली. परंतु वर्षभरातच इटाली हा ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या युतीत सामील झाला. या युद्धात इटालीच्या आल्प्स पर्वताकडील सरहद्दीजवळच्या प्रदेशात मोठी मनुष्यहानी आणि मालमत्तेची हानी झाली. युद्धानंतर व्हर्सायच्या राजवाडय़ात झालेल्या तहात बाकी दोस्त राष्ट्रांनी आपल्याला मोठी मिळकत करून घेतली पण इटालीला काहीच प्राप्ती झाली नाही. युद्धानंतर आलेल्या आíथक मंदीमुळे आणि वस्तूंच्या टंचाईमुळे लोक हवालदिल झाले आणि अशा अशांत परिस्थितीत बेनिटो मुसोलिनी याने १९२२ साली आपल्या फॅसिस्ट अनुयायांसोबत रोम शहरात मोर्चा काढून आधीचे सरकार बरखास्त करून स्वत:कडे शासन घेतले. मुसोलिनी इटालीचा हुकूमशहा बनला. त्याने रोमन कॅथोलिक धर्माला राष्ट्रीय धर्म घोषित करून पोपला रोम शहरांतर्गत व्हॅटिकन नगरराज्य निर्माण करून दिले. दुसऱ्या विश्वयुद्धात मुसोलिनी हिटलरच्या आघाडीत सामील झाला. सुरुवातीला मुसोलिनीने इथिओपिया घेतला, पण त्यानंतर मुसोलिनीचा ग्रीस, उत्तर आफ्रिका आणि सिसिलीत झालेल्या पराभवांमुळे त्याचे पक्षकायकत्रे आणि विरोधकांनी त्याला सत्तेवरून खाली खेचले. जर्मनीत आश्रयासाठी जात असताना लोकांनी बेनिटो मुसोलिनीला अटक करून गोळ्या घालून ठार मारले. मुसोलिनीची १९२२ ते १९४३ अशी २१ वर्षांची कारकीर्द झाली. १९४६ साली रोममध्ये इटालीचे प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 
काजू
गोड आणि विविध प्रकारच्या शाही भाज्यांमध्ये आपण काजूचा सर्रास वापर करतो. आपल्या आहारातील अविभाज्य असलेला असा हा काजू वृक्ष मूळचा भारतीय नाही. आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब अशा वेस्ट इंडिज, ब्राझील, दक्षिण अमेरिका अशा विषुववृत्तीय प्रदेशातून काजू आपल्याकडे आला. साधारणपणे ४०० वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी तो भारतात आणला. विशेष म्हणजे त्याच्या नावाचा अपभ्रंश झाला नाही. पोर्तुगीज भाषेतील काजू या वृक्षाला आजही आपण काजू म्हणूनच ओळखतो. त्याचे लॅटिन नाव आहे अ‍ॅनाकाडर्ॅयम ऑक्सिडेंटल. अ‍ॅनाकार्डेएसी कुळातील हा वृक्ष असून साधारण १२ मीटर उंच वाढतो.
झाडाची साल जाड काळसर आणि खरखरीत असते. पानाचा आकार पुढच्या बाजूला गोलाकार आणि देठाशी निमुळता होत गेलेला असतो. पानाचा रंग काळसर हिरवा असून त्यावर एक प्रकारची चकाकी असते. लहान लहान पिवळसर रंगाची फुले झुपक्यांनी येतात. त्यावर लाल रंगाच्या बारीक रेषा असतात. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात काजूला मोहर येतो. मोहराला एक मंद सुगंध असतो. फुलाचे जेव्हा फळात रूपांतर होते तेव्हा वेगळ्या प्रकारची रचना होऊन आभासी फळ तयार होते, त्यालाच बोंड म्हणतात. पुष्पस्थळी आणि बी एकमेकांना जोडलेली असते. बोंडाच्या खाली असलेली बी राखाडी रंगाची असते. हे आभासी फळ चवीला तुरट, आंबटगोड असते. या बोंडातील रस आंबवून त्यापासून मद्य तयार करण्यात येते.
महाराष्ट्रात वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळसंशोधन केंद्रात काजूवर संशोधन केले जाते. या केंद्राने काजूच्या बऱ्याच जाती विकसित केल्या आहेत. यातील वेंगुर्ला-१ या जातीच्या झाडाला लवकर मोहोर लागतो. आणि काजू लवकर तयार होतो. बोंडे पिवळ्या रंगाची असतात. वेंगुर्ला -४ या जातीच्या झाडाची फळे लाल रंगाची असतात. काजूच्या बीचे वजन ६-७ ग्रॅम असते. या काजूच्या बीमध्ये २१% प्रथिने, ४७% चरबी आणि २२% काबरेहाड्रेट असतात. कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. काजूच्या बीच्या टणक आवरणातून तेल काढले जाते.
भारतातील दक्षिणेकडच्या बहुतेक राज्यांत समुद्रकिनाऱ्यावर काजूचे पीक घेतले जाते. त्यात महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य आहे.

– सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benito mussolini