जर्मन  साम्राज्यकाळात, अठराव्या शतकाच्या अखेरीस बíलनमध्ये कला आणि सांस्कृतिक विकास झाला. नाटय़गृहांमध्ये गेऱ्हार्ट हॉपमन, हेरमन सुडेरमानसारख्या प्रतिभावंतांच्या नाटकांचे प्रयोग होऊ लागले. सांस्कृतिक विकासाबरोबर औद्योगिक विकास झाल्यामुळे बíलनमधील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. उच्चभ्रूंच्या वस्तीबरोबरच कामगार वस्त्यांमध्येही वाढ झाली. कामगार वर्गाच्या वाढत्या मागण्या, ट्रेड युनियन्स, मोच्रे आणि त्यातून झालेला समाजवाद्यांचा उदय यामुळे बर्लिनच्या समाज व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाला. १८७९ साली सिमेन्स आणि हास्क या इंजिनियर्सनी जगातली पहिली विद्युत रेल्वे निर्माण केली आणि पाठोपाठ विद्युत मोटारगाडीही बनली. १९०० साली बृहन बíलन आणि त्याची २३ उपनगरे मिळून लोकसंख्या २५ लक्ष होती. १९११ साली विज्ञानविषयक संशोधनासाठी बíलनमध्ये कैसर विल्यम सोसायटी स्थापन होऊन मार्क्‍स राइनहार्तसारखे विख्यात शास्त्रज्ञ तयार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९१४ ते १९१८ या काळात बíलन आणि पूर्व जर्मनीत पहिल्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीने समाजजीवन ढवळून निघाले. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या प्रचंड टंचाईमुळे त्रस्त झालेल्या बर्लिनकरांनी संप, मोच्रे, आंदोलने, िहसक कारवायांनी बर्लिन शहर पूर्ण हलवून टाकले. पहिल्या महायुद्धाचा शेवट ११ नोव्हेंबर १९१८ रोजी दोस्त राष्ट्रे आणि जर्मन सम्राट कैसर विल्यम द्वितीय यांच्यामधील तहाने झाला. महायुद्धातल्या दारुण पराभवामुळे जर्मन सम्राट कैसर विल्यम पळून आश्रयासाठी नेदरलँड्समध्ये गेला. ९ नोव्हेंबर १९१८ रोजी बíलनमध्ये राजकीय क्रांती होऊन समाजवादी नेता फिलीप शाईडमान याने ‘जर्मन प्रजासत्ताक’ स्थापन केल्याची घोषणा राईस्टागमधून केली. समाजवादी लोकशाहीवादी नेता फ्रेडरिक एबर्ट हा जर्मन प्रजासत्ताकाचा पहिला चान्सलर झाला. पाठोपाठ, ३० डिसेंबर रोजी कार्ल लिबनेख्त आणि रोझा लक्झेमबर्ग यांनी बíलनमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. सत्ताधारी लोकशाहीवादी समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षीयांमध्ये १९१९ साली झालेल्या संघर्षांत कम्युनिस्ट नेत्यांचे खून झाले.

‘आपुला’ शिरीष

‘विलायती शिरीष’ आपल्याकडे जितक्या प्रमाणात लावला गेलाय, तितक्या प्रमाणात तस्साच असणारा ‘आपला शिरीष’ का लावला गेला नाही, हे एक कोडेच आहे. विलायती शिरीषसारखेच दिसणारे हे पसरट फांद्यांचे झाड चांगले १८-२० मीटरपेक्षाही उंच वाढते. पाने विलायती शिरीषसारखीच संयुक्त, एकांतर आणि दोनदा विभागलेली, पिसासारखी. पण तुलनेत विलायती शिरीषपेक्षा जरा फिकट हिरवी आणि पर्णिका अधिक लंबगोलाकार असतात.

संस्कृतमध्ये याला कोमलतेचे प्रतीक मानलं आहे, ते बहुधा याच्या फुलांसंदर्भात असावं. फुलांचा बहर उन्हाळ्यात येतो. फुलांची रचना देशी आणि विलायती शिरीषमध्ये अगदी सारखी. फक्त रंग वेगळा. पुष्पदांडय़ाला तुतारीसारखी पांढरी १५-२० फुले गोलाकार बसवलेली. प्रत्येक फुलात एक स्त्रीकेसर आणि बाजूने झुबक्याने फिकट हिरवे पूंकेसर; त्यामुळे अनेक फुलांचा एक फिकट हिरवा गुच्छ तयार होतो. विलायती शिरीषची सुंदर गुलाबी फुलं दिसण्याच्या बाबतीत जरी उजवी वाटली तरी सुगंधाच्या बाबतीत मात्र शिरीष भाव खाऊन जातो. एक मनाला मोहवणारा मंदसा सुवास या फुलांना येतो. उन्हाळ्यात फुलांनी मढलेल्या शिरीष वृक्षाखाली फुलांचा हिरवा-पिवळा सडा पडलेला दिसतो.

शिरीषाला १२-१५ सेमी लांबी, ३४ सेमी रुंदीच्या, पातळ, चपटय़ा आणि दोन्ही बाजूस गोलसर असलेल्या शेंगा येतात. पण विलायती शिरीषच्या शेंगेप्रमाणे शिरीषच्या शेंगेत गर नसतो. डिसेंबर-जानेवारीत जेव्हा पानगळ होते, तेव्हा पानं जरी नसली तरी पिवळ्या शेंगांनी भरून गेलेलं झाड विलोभनीय दिसतं. शिरीषाच्या वाळलेल्या शेंगा वाऱ्याने जोरात हलल्या की त्या खुळखुळ वाजतात. यामुळे या शेंगांना इंग्रजीत ‘वूमेन्स टंग’ असं म्हणतात. याला इंग्रजीत सिरीस किंवा लेबेकही म्हटलं जातं. याचे ‘अल्बिझिया लेबेक’ हे शास्त्रीय नाव इटालियन निसर्ग अभ्यासक एफ. डी. अल्बिझिया यांच्या स्मरणार्थ दिलं आहे.

अल्बिझिया ह्य़ा प्रजातीत एकूण ६० जाती असून त्यापकी भारतात आढळणाऱ्या १५ जातींपकी शिरीष (अल्बेजिया लेबेक), कृष्णशिरीष (अल्बेजिया आमरा), पांढरा शिरीष (अल्बेजिया प्रोसेरा), काळा शिरीष (अल्बेजिया ओडोराटिसिमा) या जाती जास्त दिसतात.

आयुर्वेदात ‘विषघ्न’ म्हणून याचा उपयोग सांगितलेला आहे.