भानू काळे

व्युत्पत्तीचा शोध घेऊन शब्दांचा नेमका अर्थ स्पष्ट होऊ शकतो, पण कधी कधी संदर्भ बघितल्यावरच शब्दाचा त्या विशिष्ट ठिकाणी असलेला अर्थ लक्षात येतो. वाच्यार्थ, म्हणजे आपण त्या शब्दाचा नेहमी घेतो तो अर्थ एकच असला तरी त्याचा सूचित अर्थ (लक्ष्यार्थ) फार वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ या ओळीत दगड शब्दाचा अर्थ नेहमीचा (म्हणजे वाच्यार्थ) आहे. पण ‘तो नुसता दगड आहे’ म्हणताना दगड शब्दाचा ‘बिनडोक’ हा सूचित अर्थ (म्हणजे लक्ष्यार्थ) आहे. लक्षणा ही एक मोठी शब्दशक्ती आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

रोजच्या भाषेत हा अर्थबदल खूपदा होतो. अक्षता म्हणजे आपले साधे तांदूळच असतात,पण त्यांना लग्नविधीत हळद-कुंकू लावले की अर्थबदल होऊन त्यांना वेगळेच पावित्र्य प्राप्त होते. श्रद्धापूर्वक देवापुढे हात जोडले की मगच पाण्याचे तीर्थ होते; एरवी तीर्थ हेही नुसते पाणीच असते. श्रीफळ म्हणजे आपला नेहमीचा नारळच; तो खोवून आमटी-भाजीसाठी आपण वापरतोच; पण एखाद्याचा सत्कार करताना दिला जातो तेव्हाच त्याचे ‘श्रीफळ’ होते. अर्थात, एखाद्या कार्याचा शुभारंभ करताना फोडला जातो तोही नारळच असतो आणि एखाद्याला कामावरून काढून टाकतानाही ‘त्याला नारळ दिला’ असेच म्हटले जाते; पण तो एक भाषाविशेष आहे आणि तोही संदर्भावरूनच कळतो.

उपोषण, उपास आणि लंघन हे तीन शब्द आपण वापरतो. तिन्ही शब्दांनी व्यक्त होणारा मूळ अर्थ एकच- तो म्हणजे न जेवणे. पण संदर्भानुसार तिन्ही शब्दांचा अर्थ किती पालटतो! उपोषण हे राजकीय किंवा सामाजिक विरोध करण्याचे हत्यार आहे; उपास हा धार्मिक कारणांसाठी केला जातो; तर लंघन हे आरोग्याला उपयुक्त म्हणून केले जाते.

आभाळ आणि आकाश दोन्ही तसे समानार्थी शब्द. पण त्यांतून सूचित होणारा वेगवेगळा भाव स्पष्ट करताना शान्ता शेळके म्हणतात,‘भरून येते ते आभाळ आणि मोकळे होते ते आकाश!’ संदर्भामुळे अर्थ कसा बदलतो हे स्पष्ट करताना पु. ल. देशपांडे यांनी एक सुरेख उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते, ‘मत देते ती जनता आणि दगड मारते ते पब्लिक!’

Story img Loader