– डॉ. नीलिमा गुंडी

काही वाक्प्रचार गतकालीन स्त्रीजीवनाची कल्पना देतात. त्यातून कालबाह्य रूढीही लक्षात येतात. त्याची ठळक उदाहरणे पाहू. ‘हूं की चूं न करणे’ हा वाक्प्रचार मुख्यत: स्त्रीच्या संदर्भात वापरला जात असे. याचा अर्थ आहे, अवाक्षर न काढणे. दडपणामुळे तोंडातून शब्दच काय, एक अक्षरही न उमटणे. लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ (१९३६) या गाजलेल्या आत्मचरित्रात वर्णन केलेला एक प्रसंग आहे. लक्ष्मीबाईंच्या लग्नाआधी त्यांच्या एक आजेसासूबाई त्यांना पाहायला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या लहानग्या मुलीच्या डाव्या कानाचा चाप गच्च दाबून धरला. तरी तिने हूं की चूं केले नाही! तेव्हा त्यांनी मुलगी पसंत केली! हा वाक्प्रचार त्या काळातील आदर्श स्त्रीविषयीची समाजाची अपेक्षा नेमकेपणाने लक्षात आणून देतो. आज अशी मूक सोशीक स्त्रीप्रतिमा आदर्श मानली जात नाही.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

आजच्या स्त्रीजीवनाच्या वाटचालीकडे पाहता पूर्वीचा आणखी एक वाक्प्रचार कालबाह्य ठरतो. तो म्हणजे ‘ब्र न काढणे’. ब्र न काढणे म्हणजे चकार शब्द न बोलणे. येथील ब्र या अक्षराला काही अर्थ असावा. आपल्याकडे प्राचीन काळी काही ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या. मात्र ती परंपरा पुढे खंडित झाली. स्त्रियांना अध्यात्मज्ञानाचा अधिकार नाकारला गेला. त्यामुळे ब्रह्मज्ञान लांबच राहिले, त्यातील ब्र सुद्धा उच्चारायचा नाही, असा त्याचा गर्भितार्थ असावा! एकंदरीत ज्ञानाच्या सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या क्षेत्रात स्त्रीला प्रवेश नाही, असा त्याचा अर्थ दिसतो. एक प्रकारे जुन्या काळी तिला अज्ञानामुळे गप्प बसायला भाग पाडता येत असावे! आज स्त्रीला सहजासहजी कोणी ज्ञानापासून वंचित ठेवू शकणार नाही. कविता महाजन यांनी ‘ब्र’ ही कादंबरी लिहून या वाक्प्रचाराला जणू आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे या कादंबरीचा हिंदीत अनुवाद ‘चूँ’ या नावाने झाला आहे!

पायीची वहाण, पायीच छान’ (स्त्रीचे स्थान कमी दर्जाचे), ‘एखाद्याने बांगडय़ा भरणे’ (नामर्द असणे) असे स्त्रीचा अधिक्षेप करणारे वाक्प्रचारही आता समाजमनातून पुसले जायला हवेत.

Story img Loader