यास्मिन शेख

पुढील वाक्य वाचा- ‘कोणत्याही कलाकृतीला पारंपरिक स्वरूप देण्यापेक्षा तिला नावीन्यतेचे रंग दिले, तर ती कलाकृती अधिक अर्थपूर्ण व अधिक सुंदर होण्याची शक्यता असते.’

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…
Oxford University picks brain rot as word of the year
अग्रलेख : भाषेची तहान…
Devendra Fadnavis Friend told his Memories
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस साधे सरळ राजकारणी, कुणाला पाडा, कुणाला खेचा हे..”; जिवलग मित्राने उलगडला स्वभाव
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?

या वाक्यातील विचार पटण्यासारखा आहे, पण एका चुकीच्या शब्दयोजनेमुळे वाक्यरचना सदोष झाली आहे. तो शब्द आहे- नावीन्यता (नावीन्यतेचे रंग). ‘नावीन्यता’ या शब्दात मूळ शब्द आहे- नवीन (विशेषण). या विशेषणाला ‘य’ हा प्रत्यय जोडून भाववाचक नाम होते- नावीन्य. या भाववाचक नामाला आणखी एक ‘ता’ हा दुसरा अनावश्यक प्रत्यय जोडून, म्हणजे य, ता जोडून त्या भाववाचक नामाचे चुकीचे, चमत्कारिक रूप करणे योग्य नव्हे. ‘य’ हा प्रत्यय लागून ‘नवीन’ या विशेषणाचे भाववाचक नाम ‘नावीन्य’ हे सिद्ध झालेलेच आहे. नवीन या शब्दाला ता प्रत्यय लागून ‘नवीनता’ हे भाववाचक नाम होईल, पण हे नाम मराठीत क्वचितच वापरले जाते. सुंदर+ता = सुंदरता, विशेष+ता=विशेषता अशी काही भाववाचक नामे रूढ आहेत, पण त्या ‘या’ प्रत्ययाने मूळ शब्दात बदल होत नाही, हे लक्षात येईल.

‘नावीन्य’ हा संस्कृतातून मराठीने स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. नवीन (वि.) य (प्रत्यय)= नावीन्य. या शब्दातील पहिले अक्षर ‘न’ आहे. शब्दाला ‘य’ प्रत्यय लागल्यामुळे ‘न’ चा ‘ना’ होतो आणि शेवटच्या अक्षरात ‘य’ मिसळून ‘न’ चा ‘न्य’ होतो. वरील वाक्य असे हवे. ‘कोणत्याही कलाकृतीला.. नावीन्याचे रंग दिले, तर.. शक्यता असते.’

असेच काही तत्सम शब्द पाहू या.

गट १) प्रवीण- प्रावीण्य, चतुर- चातुर्य, ललित- लालित्य, चरित्र- चारित्र्य, समर्थ- सामथ्र्य, मधुर- माधुर्य, प्रमुख- प्रामुख्य, पवित्र- पावित्र्य, स्वतंत्र- स्वातंत्र्य, प्रमाण- प्रामाण्य, पंडित- पांडित्य, प्रधान(वि)- प्राधान्य.

गट २) निपुण- नैपुण्य, विपुल- वैपुल्य, विविध- वैविध्य, शिथिल- शैथिल्य, विशिष्ट-वैशिष्टय़, विचित्र- वैचित्र्य, निराश- नैराश्य, विराग- वैराग्य. गट ३) उदार- औदार्य, उत्सुक- औत्सुक्य, उचित- औचित्य, कुटिल- कौटिल्य, कुशल- कौशल्य, क्रूर- क्रौर्य, सुंदर- सौंदर्य, शूर- शौर्य.

गट १- पहिले अक्षर अकारान्त- भाववाचक नामात आकारान्त होते. गट २- पहिले अक्षर इकारान्त- भाववाचक नामात ऐकारान्त होते. गट ३- पहिले अक्षर उ किंवा उकारान्त- भाववाचक नामात औकारान्त होते.

Story img Loader