‘कॅरी निर्मिक’ ही संकरित जात असील (देशी कोंबडी) आणि कॅरी रेड यांचे संकरण करून तयार केली आहे. नराचे वजन तीन ते चार किलो, तर मादीचे दोन ते तीन किलो असते. मादी १९६ दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करते. वर्षांला ९२ अंडी देते. अंडय़ाचे वजन ५० ग्रॅम असते.
‘कॅरी श्यामा’ ही कडकनाथ आणि कॅरी रेड यांचे संकरण करून तयार केली आहे. पंख, त्वचा, चोच, मांडी व पाय काळसर रंगाचे असतात. मांसाचा रंग प्रामुख्याने काळा असतो. स्थानिक भाषेत या जातीला कालामासी म्हणतात. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्य़ात तसेच राजस्थान, गुजरातमध्येही ती आढळते. यांच्या मांस व अंडय़ांमध्ये लोहयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात. मांसात २५ टक्के प्रथिने असतात. २० आठवडय़ांत या पक्ष्याचे वजन दोन किलो भरते. हे पक्षी १८० दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. वर्षांला १०५ अंडी देतात.
‘अपकॅरी’ ही कडकनाथ, असील, नेकेडनेक, फ्रिजेल या प्रत्येक जातीची देल्लामरेड जातीशी संकरण करून तयार केली आहे. हे पक्षी १३० दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. वर्षांला १८० अंडी देतात. अंडय़ाचे वजन ५२ ते ५५ ग्रॅम असते.
‘गिरीराजा’ ही देशी जात पशुवैद्यकीय महाविद्यालय, बेंगळुरू येथे विकसित केलेली आहे. हा पक्षी उबवणीनंतर २२ ते २३ आठवडय़ांनी अंडी देण्यास सुरुवात करतो. नराचे वजन चार किलो तर मादीचे तीन किलो असते. वर्षांला १८० ते १९० अंडी देते.
‘वनराजा’ जात हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्पाने विकसित केली आहे. हे पक्षी वर्षांला १६० ते १८० अंडी देतात. हलके वजन आणि लांब पाय यामुळे ते शत्रूपासून स्वत:चे रक्षण सहज करू शकतात.
‘कृषी ब्रो’ जातदेखील हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्पाने विकसित केली आहे. हा मांसल असून रोग प्रतिकारक क्षमता अधिक असते. खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता कमी असते, परंतु सहा आठवडय़ांतच यांचे वजन प्रमाणित असते.
‘ग्रामश्री’ जात १५९ दिवसांनी अंडी देण्यास सुरुवात करते. वर्षांला १८० अंडी देतात. अंडय़ाचे वजन ५० ग्रॅम असते.
कुतूहल – परसातील पक्ष्यांच्या जाती
‘कॅरी निर्मिक’ ही संकरित जात असील (देशी कोंबडी) आणि कॅरी रेड यांचे संकरण करून तयार केली आहे. नराचे वजन तीन ते चार किलो,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breeds of hen