कॅलक्युलस म्हणजेच कलनशास्त्र हे नाव कॅलक्युली म्हणजे अगदी छोट्या आकाराचे दगड या लॅटिन शब्दावरून आले आहे. कलनशास्त्रात असंख्य अतिसूक्ष्म भाग करण्याची संकल्पना पायाभूत आहे. कलनशास्त्राचा औपचारिक शोध सतराव्या शतकात लागला असला तरी त्याची पाळेमुळे थेट इसवीसन पूर्व काळातील ग्रीकांच्या गणितात सापडतात. युडॉक्सस, आर्किमिडीज यांची वक्राकाराच्या आतील भाग असंख्य छोट्या बहुभुजाकृतींनी विभागून वक्राकाराच्या अंतर्भागाचे क्षेत्रफळ काढण्याची बेरजेची पद्धत समाकलनाशी नाते सांगते. मध्ययुगात चीनमध्ये व भारतातही कलनशास्त्रातील काही संकल्पना शोधल्या गेल्या. १७ व्या शतकात फर्मा, वॅलीस, ग्रेगरी यांनीसुद्धा त्यांत भर घातली. या विखुरलेल्या संकल्पनांमधून सलग शास्त्रशाखा म्हणून कलनशास्त्राची मांडणी करण्याचे श्रेय न्यूटन आणि लायब्निझ या गणितज्ञांना जाते. दोघांनी स्वतंत्रपणे एकाच वेळी आपले संशोधन प्रसिद्ध केले. नंतरच्या २०० वर्षांत बर्नुली बंधु, ऑयलर, कॉशी, वाईस्ट्र्रास यांसारख्या गणितज्ञांनी या शास्त्रशाखेला पुढे नेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा