इमारतींच्या भिंती किंवा सपाट छपरे जलरोधक बनविण्यासाठी त्यावर प्रथम जलरोधक पदार्थाच्या विद्रावाचे पाच-सहा लेप देतात व त्यावर आवश्यक तेथे फेल्टचे कापड पसरून त्यावर एक ते तीन सेंमी जाडीचा सिमेंट-वाळूच्या मिश्रणाचा थर देतात. सिमेंट जलरोधक करण्याकरिता तुरटी व कॉस्टिक सोडय़ाचे मिश्रण त्यात मिसळतात.
शिवाय इमारतीमध्ये काँक्रीट हे अनेकदा सच्छिद्र असते. या सच्छिद्रतेमुळे ते पूर्णत: जलरोधक राहत नाही. म्हणून त्यात पॉलिमर मिसळून ते जलरोधक केले जाते. त्यामध्ये बिटूमिन, सिलिकेट, पीव्हीसी आणि एचडीपीई असे पदार्थ वापरले जातात. गेल्या दोन दशकापासून बांधकाम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यात जलरोधक पदार्थ आणि मेमब्रेन यांचाही वापर केला जात आहे. जलरोधक क्षमता हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक या दोन प्रकारात मोडते. हायड्रोफिलिक पद्धतीत क्रस्टलायझेशन तंत्रज्ञानाद्वारे काँक्रीटमधील पाणी काढून टाकले जाते. परिणामी, त्यातील पाणी निघून गेल्याने ते गळू शकत नाही.
हायड्रोफोबिक पद्धतीत फॅटी आम्ल हे काँक्रीटमधील बारीक चिरा, छिद्रे बुजवण्याचे कार्य करतात. त्यामुळे त्यातून पाणी झिरपू शकत नाही. अक्रॅलिक कोपॉलीमर इमल्शन हे सिमेंटमध्ये पूरक (अॅडेटिव्ह) म्हणून मिसळतात. त्याने काँक्रीटची जलरोधक क्षमता, गंजरोधक क्षमता आणि ताकदही वाढते. हे रसायन छत, पाण्याची टाकी, पोहण्याच्या तलावाचा पृष्ठभाग यासाठी वापरतात. स्टायरीन ब्युटाडाईन कोपॉलीमर इमल्शन हे काँक्रीटमध्ये मिसळल्याने ते जलरोधक, रसायनरोधक आणि ओरखडा प्रतिकारक (अॅब्रेशनरोधक) म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे चुना, सिमेंट, रंग यांचाही वापर केला जातो. लॅटेक्स रंग हे बाथरूम बेसमेंट, भिंती गळू नये म्हणून वापरतात. बाथरूममध्ये आद्र्रतेचे प्रमाण अधिक असल्याने भिंतीत पाणी जाऊन त्याचे आयुष्य कमी होते. या रंगामुळे भिंतीचे आयुष्य वाढते. तसेच एपॉक्सी रंग हे अधिक उच्च प्रतीचे असल्याने ते जहाज, पाण्याची टाकी यामध्ये वापरतात. या रंगामध्ये रसायनाचा बंध घट्ट असल्याने त्यातून पाणी गळू शकत नाही. जलरोधक म्हणून इमारतीत मोनोमर आणि पॉलीमर याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.
प्रा. शामकुमार देशमुख (सोलापूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई – office@mavipamumbai.org
कुतूहल – जलरोधकासाठी रसायने
इमारतींच्या भिंती किंवा सपाट छपरे जलरोधक बनविण्यासाठी त्यावर प्रथम जलरोधक पदार्थाच्या विद्रावाचे पाच-सहा लेप देतात व त्यावर आवश्यक तेथे फेल्टचे कापड पसरून त्यावर एक ते तीन सेंमी जाडीचा सिमेंट-वाळूच्या मिश्रणाचा थर देतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2014 at 12:18 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemicals to make waterproof