एक नूर आदमी, दस नूर कपडा’, अशी एक म्हण प्रचलित आहे. पण आताच्या माणसाला हे वर्णनही कमी पडेल अशी परिस्थिती आहे. मध्यमवर्गीयांमध्येही एका व्यक्तीकडे कपडय़ांचे दहापेक्षा जास्त संच सहजी मिळतील. उच्चमध्यमवर्गीय आणि श्रीमंतांकडे तर या पुढची पायरी गाठलेली असेल. बाजारात कापडाचे इतके प्रकार उपलब्ध आहेत, त्यामधून निवड करायला जायचे तर घेणाऱ्याचा गोंधळ उडेल. हे कशामुळे साध्य झाले याचे उत्तर द्यायचे झाल्यास एका शब्दात सांगता येईल ‘रसायनशास्त्र’.
याचा खुलासा करायचा झाल्यास कापूस, रेशीम, लोकर या नसíगक तंतूबरोबर किंवा काही वेळा त्यापेक्षा जास्त पॉलिस्टर, पॉलिअमाइड, अॅक्रिलिक अशा रसायनांचा वापर करून निर्मिलेले तंतू मोठय़ा प्रमाणात वापरात आले आहेत. ते सुद्ध फक्त अंगावर घालायच्या कपडय़ाबद्दल बोलतानाचे चित्र आहे. इतर अनेक वापराकरिता आणखी तंतूंचे उत्पादन झाले आहे. कधी नसíगक तंतूबरोबर मिश्रण करून या मानवनिर्मित तंतूंचा वापर केला जातो, तर कधी स्वतंत्रपणे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या वस्त्रप्रावरणांची रेलचेल बघायला मिळते. मानवनिर्मित तंतूप्रमाणेच रासायनिक प्रक्रियांचा वापरही मुबलक प्रमाणात केला जात आहे. कापड आकर्षक करायचे असेल तर त्यावर रासायनिक प्रक्रिया करणे गरजेचे असते. हे पूर्वापार सुरू आहे. सुमारे दीडशे वर्षांपासून मागावर कापड विणून झाल्यावर काही प्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामध्ये ब्लीचिंग, मर्सरायिझग, डाईंग, िपट्रिंग, इत्यादी अनेक रासायनिक प्रक्रियांचा समावेश होतो. यापेक्षा अधिक रासायनिक प्रक्रियांचा अवलंब सध्या केला जात आहे. या सर्वामागचा उद्देश, त्या कापडाचा आकर्षकपणा वाढवणे हाच आहे. सध्याचा जमाना जाहिरातीचा आहे किंवा आपल्या उत्पादनाचे गुणगान गाण्याचा आहे. त्या वेळी अशी एक विशिष्ट प्रक्रिया घेऊन, त्याचा जाहिरातीत समावेश करून आमचे उत्पादन (इथे कापड) इतरांपेक्षा वेगळे कसे आहे, हे दाखवण्याकरता पण केला जातो. अर्थात त्या वेळी उपयुक्ततेच्या दृष्टीने एखादा जास्तीचा गुण त्या कापडात असतो, जो इतर कापडाच्या उत्पादनात नसतो. सुरकुती न पडणारे सुती कापड हे त्याचे उदाहरण म्हणून लक्षात घेता येईल.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – कापड आणि रसायनशास्त्र
एक नूर आदमी, दस नूर कपडा’, अशी एक म्हण प्रचलित आहे. पण आताच्या माणसाला हे वर्णनही कमी पडेल अशी परिस्थिती आहे. मध्यमवर्गीयांमध्येही एका व्यक्तीकडे कपडय़ांचे दहापेक्षा जास्त संच सहजी मिळतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth and chemistry