गाय / म्हैस गाभण राहते, व्यायल्यानंतर चीक देते व पाच-सहा दिवसांनी दूध देणे सुरू करते. एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये ३०५ ते ३१० दिवस तसेच म्हशींमध्ये २७० ते २८० दिवस. एकदा गाय / म्हैस व्यायली की ती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू/ रेडकू देते, तो कालावधी म्हणजे दोन वेतांतील अंतर. हा काळ गायीमध्ये १२-१३ महिने तर म्हशीत १३-१४ महिने असावयास पाहिजे. या कालावधीतील १०० दिवस म्हणजे विण्याच्या अगोदरचे ४५ दिवस व व्यायल्यानंतरचे ५५ दिवस.
विण्याच्या अगोदर गायीच्या कासेला ४५ दिवस विश्रांती मिळाली पाहिजे. त्यासाठी तिला संपूर्णपणे आटवली पाहिजे. आटवताना पाणी, खुराक, हिरवा चारा हळूहळू कमी करावा. तिच्या कासेत सडाच्या टय़ुबा भराव्यात. त्यामुळे कास एकदम आकुंचित होते. मग तिचा आहार पुन्हा पहिल्यासारखा सुरू करावा.
या ४५ दिवसांचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिल्या १० दिवसांत कासेची काळजी घ्यावी. तिला आतून-बाहेरून कोणत्याही प्रकारची इजा होऊ देऊ नये.
त्यानंतरच्या ३० दिवसांत तिला पचनीय आहार व व्यायाम मिळेल, हे पाहावे. म्हणजे गर्भाशयातील वासरा / रेडकाचे वजन वाढते. २० दिवसांच्या अंतराने कृमी / जंतुनाशक औषधाचे दोन डोस तिला द्यावेत. गायीच्या / म्हशीच्या नख्या चांगल्या घासून वा कापून सरळ / काटकोनात कराव्यात. व्यायच्या अगोदरच्या काळात त्यांना संतुलित आहार द्यावा.
विण्याअगोदरच्या पाच दिवसांत त्यांना जास्तीतजास्त स्वच्छ ठेवावे. त्यांना निसरडय़ा, घसरडय़ा, जास्त उताराच्या, खड्डे असलेल्या जागी बांधणे, डोंगर, टेकडय़ा अशा जागी पाठवणे योग्य नाही. त्यांच्या बसण्या-उठण्याच्या जागेवर गवताची, उसाच्या चिपाडाची, गव्हाच्या काडाची, पेंढय़ाची किंवा अन्य सामग्री वापरून गादी करावी, तसेच त्यांना अत्यंत हलका आहार द्यायचा प्रयत्न करावा.
व्यायल्यानंतर ५५ दिवसांत गाय / म्हशीला पौष्टिक, संतुलित आहार मिळाला पाहिजे. या दिवसांत तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येऊन परत माजचक्र सुरू करण्याच्या तयारीत आणणे महत्त्वाचे असते. तिच्या गर्भाशयातून १०-१२ दिवस येणाऱ्या स्रावामुळे तिच्या शेपटीचा भाग धुऊन, र्निजतुक रसायने वापरून दररोज स्वच्छ ठेवावा. त्यामुळे गर्भाशयाला इजा होत नाही.
कुतूहल – गायी/म्हशींच्या वेतांतील महत्त्वाचे दिवस
गाय / म्हैस गाभण राहते, व्यायल्यानंतर चीक देते व पाच-सहा दिवसांनी दूध देणे सुरू करते. एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये ३०५ ते ३१० दिवस तसेच म्हशींमध्ये २७० ते २८० दिवस. एकदा गाय / म्हैस व्यायली की ती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू/ रेडकू देते, तो कालावधी म्हणजे दोन वेतांतील अंतर. हा काळ गायीमध्ये १२-१३ महिने तर म्हशीत १३-१४ महिने असावयास पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cows buffaloes important day of reed