नक्र म्हणजे मगर. मगरी खरोखरच अश्रू ढाळतात का? खरे तर खोटे अश्रू ढाळण्याला ‘मगरीचे अश्रू ढाळणे’ किंवा ‘नक्राश्रू ढाळणे’ असे म्हणतात. या शब्दप्रयोगास नेमकी सुरुवात कशी आणि कधी झाली, हे सांगणे कठीण आहे. खोटी दया किंवा सहानुभूती दाखविणे किंवा दु:ख झाल्याचे दाखविणे या अर्थाने हा शब्दप्रयोग वापरला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तळे अथवा नदीच्या काठावर डोळे मिटून अश्रू ढाळत पहुडलेली मगर सर्वाना परिचित आहे. मनुष्यप्राणी भावनाशील होतो तेव्हा अश्रू ढाळतो, परंतु मगरीच्या अश्रूंचा भावनांशी संबंध नसतो. पूर्वी असे मानले जाई, की मगरी जेव्हा शिकार खातात तेव्हा त्यांच्या डोळय़ांतून पाणी येते. मगरींना अश्रुनलिका असतात. एरवी मगर बराच काळ पाण्यातून बाहेर राहिल्यावर डोळे स्वच्छ करण्यासाठी, खासकरून निमेषक पटल तसेच डोळय़ांना ओलसरपणा देण्यासाठी अश्रू ढाळतात आणि ते अश्रू अन्न खाण्याची प्रेरणा ठरतात असेही म्हटले जाते.
२००६ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील चेतासंस्थाशास्त्रज्ञ (न्युरोलॉजिस्ट) माल्कॅम शानेर यांनी मगरी- अॅलीगेटर यांच्यावर प्रयोग केले. त्यांचा चमू अशा निष्कर्षांपर्यंत पोहोचला की हे मगरींचे रडणे, अश्रू ढाळणे, अन्न खाताना, जबडय़ाच्या जोरात होणाऱ्या हालचालींमुळे तसेच गरम हवेच्या हिस्स अशा आवाजाने (जी हवा कवटीच्या पोकळय़ांत- सायनसमधून जाते) अश्रुग्रंथींवर दाब पडतो आणि अश्रुग्रंथी उद्दीपित होतात ज्यामुळे अश्रू (द्रव) डोळय़ांत जमा होतात आणि बाहेर पडतात.
तसे पाहायला गेले तर मगरी खरोखर अश्रू ढाळतात म्हणजेच डोळय़ातून द्रव बाहेर टाकतात आणि त्यांच्या अश्रूंमध्ये प्रथिने आणि खनिजे असतात.
तोंडाचा लकवा बरा झालेल्या रुग्णांमध्ये खाताना कधी कधी डोळय़ांत पाणी येते. बोगोराड या न्यूरो-पॅथॉलॉजिस्टने ही गोष्ट प्रथम निदर्शनास आणली म्हणून त्यास बोगोराडचा लक्षण समुच्चय (बोगोरडस सिंड्रोम) असे म्हणतात. याला ‘क्रॉकोडाइल टीयर्स सिंड्रोम’ किंवा ‘नक्राश्रू लक्षण’ असेही म्हणतात.
मगरीच्या अश्रूंचे केवळ एक असे निश्चित कारण अजून नीटसे कळलेले नसले, तरी मगरीच्या अश्रूंचा आणि भावनांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. शिकारीला आमिष अथवा लालूच दाखविण्यासाठी आणि निर्धास्त करण्यासाठी स्वत: खूप संकटात असल्याचा बहाणा करताना मगरी अश्रू ढाळतात का असाही प्रश्न पडतो. मात्र खाऱ्या पाण्यात शरीरात येणारे जास्तीचे क्षार बाहेर काढण्यासाठी मगरींना, सुसरींना या अश्रूंचा निश्चितच उपयोग होतो.
– डॉ. नीलिमा कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org