इतर कुठल्याही मानवनिर्मित तंतूंप्रमाणे अ‍ॅसिटेट रेयॉनसुद्धा अखंड व आखूड या दोन्ही प्रकारांत उत्पादित करता येतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हा तंतू बहुतांशी अखंड तंतूंच्या स्वरूपात वापरला जातो. सेल्युलोज बहुवारिकापासून बनलेले इतर सर्व तंतू, त्यांना उष्णता दिली असता एका ठरावीक तापमानास पेट घेतात  sam08म्हणजेच ते ज्वलनशील असतात. परंतु अ‍ॅसिटेट रेयॉनच्या तंतूंना उष्णता दिली असता ते हळूहळू मऊ होत जातात आणि २३० अंश से. तापमानास वितळतात. त्यामुळे अशा तंतूंपासून तयार केलेल्या कपडय़ांची उष्णतेशी संबंध येणाऱ्या प्रक्रियेत विशेष काळजी घ्यावी लागते. उदा. इस्त्री करताना इस्त्रीचे तापमान संयमित ठेवावे लागते. ९३ अंश से. तापमानानंतर या तंतूंची स्थितिस्थापकता नाहीशी होते म्हणून या तापमानावर कापडास कुठलाही आकार दिला असता तो कायमपणे टिकतो. म्हणून या तंतूंच्या कापडाची इस्त्रीची घडी कायम राहते. कायमच्या व न मोडणाऱ्या घडय़ांचे (प्लीट्स) स्कर्ट व तत्सम कपडे तयार करण्यासाठी या तंतूंचा मोठय़ा प्रमाणावर होत असे.  
अ‍ॅसिटेट रेयॉनपासून तयार केलेल्या कपडय़ांचा स्पर्श अतिशय मुलायम व आरामदायी असून ते दिसायला अत्यंत आकर्षक व चमकदार असतात. त्यांना आकर्षक रंग देता येतात. जसा पाहिजे तसा विविध पातळीचा चमकदारपणा त्यांना देता येतो. याचे कपडे तुलनेने लवकर वाळतात.
अ‍ॅसिटेट रेयॉनच्या तंतूंचा उपयोग स्त्रियांच्या कपडय़ासाठी, तसेच नेकटाय तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. काही प्रमाणात या तंतूंचा वापर शर्ट, पायजमे, पायमोजे व अंतवस्त्रे यासाठी केला जातो. अ‍ॅसिटेट रेयॉन हे उष्णतेने मऊ व चिकट होत असल्याने त्याचे कापड सुती कापडाच्या दोन पदरामध्ये ठेवून त्यांवरून इस्त्री फिरविल्यास ते कापड सुती कापडाच्या दोन्ही पदरास चिकटते आणि अशा प्रकारे या तिन्ही कापडाचा एक जड असा पुठ्ठा तयार होतो. शर्टच्या कॉलर तयार करताना या प्रक्रियेचा उपयोग केला जातो.
अ‍ॅसिटेट रेयॉनचे कापड उष्ण पात्याने कापले असता त्याच्या कडा वितळून घट्ट होतात आणि त्यांतून धागे बाहेर येत नाहीत. या गुणाचा वापर करून फिती किंवा अरुंद कापड पट्टय़ा कडा न शिवता बनविता येतात.

संस्थानांची बखर: ‘जेम्स ऑफ होळकर्स’
हैदराबाद, पतियाळा, कपूरथाळा, बडोदे आणि इंदौर येथील संस्थानिक हिरे, मोती आणि सोन्याचे जडजवाहर जमविण्याच्या त्यांच्या शौकाबद्दल प्रसिद्ध होते. इंदौरच्या राज्यकर्त्यांचा खजिना अत्यंत उच्च दर्जाच्या दागदागिन्यांनी भरलेला होता. १९३० ते १९४० या दशकात राज्यकर्त्यां होळकरांकडे चाळीस दशलक्ष डॉलर किमतीच्या जवाहिरांचा मोठा संग्रह होता. एकटय़ा महाराजा तुकोजीरावांनी त्यांच्या कारकीर्दीत १२०० मौल्यवान दागिन्यांचे संच खरीदले होते. त्यांचा मुलगा महाराजा यशवंतराव हा फ्रेंच जवाहिरांचा भोक्ता आणि मोठा आश्रयदाता होता. शॉमेत, मौबासिन, अप्रेल इत्यादी जगप्रसिद्ध फ्रेंच जवाहिऱ्यांकडून यशवंतराव स्वत:च्या पसंतीचे दागिने बनवून घेत असे.
सर्व जगभरात होळकरांच्या दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंबद्दल चर्चा होत असे. इंग्लंडच्या ‘एशिया मॅगेझीन’या नियतकालिकाने ‘जेम्स ऑफ होळकर्स’ हा खास अंक १९२० साली प्रसिद्ध केला. महाराजा तुकोजीरावची तिसरी पत्नी नॅन्सी अ‍ॅन मीलर ही एका अब्जाधीश अमेरिकन उद्योगपतीची कन्या. लग्नानंतर तिने िहदू धर्म स्वीकारला व ती राणी शर्मिष्ठाबाई झाली. तुकोजीरावाने या पत्नीला प्रत्येकी ४६.९५ व ४६.७० कॅरेटचे, नासपती (पीअर) फळाच्या आकाराचे दोन मौल्यवान हिरे सोन्याच्या कर्णफुलांमध्ये घालून दिले होते. इंदौर पीअर्स या नावाने ही कर्णफुले जगप्रसिद्ध होती.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader