इतर कुठल्याही मानवनिर्मित तंतूंप्रमाणे अॅसिटेट रेयॉनसुद्धा अखंड व आखूड या दोन्ही प्रकारांत उत्पादित करता येतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हा तंतू बहुतांशी अखंड तंतूंच्या स्वरूपात वापरला जातो. सेल्युलोज बहुवारिकापासून बनलेले इतर सर्व तंतू, त्यांना उष्णता दिली असता एका ठरावीक तापमानास पेट घेतात
अॅसिटेट रेयॉनपासून तयार केलेल्या कपडय़ांचा स्पर्श अतिशय मुलायम व आरामदायी असून ते दिसायला अत्यंत आकर्षक व चमकदार असतात. त्यांना आकर्षक रंग देता येतात. जसा पाहिजे तसा विविध पातळीचा चमकदारपणा त्यांना देता येतो. याचे कपडे तुलनेने लवकर वाळतात.
अॅसिटेट रेयॉनच्या तंतूंचा उपयोग स्त्रियांच्या कपडय़ासाठी, तसेच नेकटाय तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. काही प्रमाणात या तंतूंचा वापर शर्ट, पायजमे, पायमोजे व अंतवस्त्रे यासाठी केला जातो. अॅसिटेट रेयॉन हे उष्णतेने मऊ व चिकट होत असल्याने त्याचे कापड सुती कापडाच्या दोन पदरामध्ये ठेवून त्यांवरून इस्त्री फिरविल्यास ते कापड सुती कापडाच्या दोन्ही पदरास चिकटते आणि अशा प्रकारे या तिन्ही कापडाचा एक जड असा पुठ्ठा तयार होतो. शर्टच्या कॉलर तयार करताना या प्रक्रियेचा उपयोग केला जातो.
अॅसिटेट रेयॉनचे कापड उष्ण पात्याने कापले असता त्याच्या कडा वितळून घट्ट होतात आणि त्यांतून धागे बाहेर येत नाहीत. या गुणाचा वापर करून फिती किंवा अरुंद कापड पट्टय़ा कडा न शिवता बनविता येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा