पॉलिएस्टर, पॉलिअमाइड (नायलॉन) प्रमाणे तिसरा मानवनिर्मित तंतू म्हणजे अ‍ॅक्रिलिक. लोकरीमधील कमतरता लक्षात घेऊन तयार केलेला हा तंतू आता सर्वाच्या वापरात आहे. इ.स. १९४५मध्ये या तंतूची निर्मिती झाली. कॅशमिर या प्राणिजन्य तंतूशी असलेले साधम्र्य लक्षात घेऊन या तंतूला कॅश्मिलॉन म्हणून ओळखतात. अ‍ॅक्रिलिक तंतूंची निर्मिती अ‍ॅक्रिलोनायट्राईल यापासून केली. सुरुवातीला १००  टक्के अ‍ॅक्रिलोनायट्राईलपासून ही निर्मिती केली जायची. त्यापासून मिळणाऱ्या तंतूमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पुढील कताई, विणाई, रंगाई, छपाई इ. करणे अडचणीचे ठरत होते. म्हणून विविध प्रयोग करून ८५ टक्के ते  ९० टक्के अ‍ॅक्रिलोनायट्राईलबरोबर एक उदासीन एकवारिक आणि दुसरे आम्लधर्मी एकवारिक यांचा वापर करून अ‍ॅक्रिलिक तंतूची निर्मिती केली. वेगवेगळी उदासीन/आम्लधर्मी एकवारिक वापरून तंतू तयार केला जाऊ लागला. ह्या तंतूच्या लवचीकपणात वाढ होऊन द्रावणात तंतू विरघळवणे सोपे बनले. रंगाईमधील अडचणी मिटल्या आणि पुढील सर्व प्रक्रियांसाठी सुयोग्य असा तंतू निर्माण झाला. तंतू तयार करताना सह-बहुवारिकीकरणाची प्रक्रिया केली जाते तेव्हा उत्प्रेरकाचा वापरही केला जातो. एका पद्धतीत उत्प्रेरक म्हणून फेरस सल्फेटचा वापर करतात. द्रावणाचे तापमान, त्याचा सामू यावर नियंत्रण ठेवले जाते. प्रक्रिया पूर्ण होण्यास ३ ते १५ तास इतका वेळ लागतो.
या तंतूला सुरकुती पडत नाहीत. या तंतूपासून कापड यंत्रावर सहज शिवता येते. कापडाला गोळी धरण्याची क्रिया खूप कमी होते. रंगाई चांगली करता येत असल्यामुळे चमकदार आणि आकर्षक रंगात हे सूत मिळते. लोकरीचा हा मोठा दोष इथे टाळला जातो. ह्या तंतूवर आम्लांचा आणि सौम्य आम्लारींचा  परिणाम होत नाही. मात्र तीव्र आम्लारीबरोबर उकळल्यास त्या द्रावणात तंतू विरघळतो. धुलाई करताना या गुणधर्माचा परामर्ष घ्यायला हवा. रंगाई केलेल्या तंतूवर सूर्यप्रकाशाचाही विपरीत परिणाम होत नाही. म्हणून रंगाचा आकर्षकपणा टिकून राहतो. कसर किंवा बुरशीचा परिणाम या तंतूवर होत नाही. या तंतूची पाणी शोषण्याची क्षमता चांगली असते, त्यामुळे घाम टिपायला त्याचा उपयोग होतो. आता बाजारात हाती विणण्यासाठी म्हणून जे लोकरीचे गुंडे मिळतात, ते बहुदा सर्वच अ‍ॅक्रिलिकचे असतात.

मनमोराचा पिसारा: कालिदासांचा शरदऋतू ..
महाकवी कालिदासांच्या प्रतिभेला निसर्ग लीलांमुळे स्फुरण चढत असण्याचा ऋतुसंहार (सर्व काव्यांमध्ये) मध्ये वारंवार प्रत्यय येतो. कालिदासांना वृक्षवेलींकडे पाहून युवक-युवतींच्या प्रणयलीलांचं स्मरण होतं, पक्ष्यांच्या कलरवात, कुजबुजणाऱ्या रमणींचा नाद ऐकू येतो. यापूर्वी ग्रीष्म, वसंत आणि वर्षां ऋतूंवर आधारित श्लोकावर पिसारा फुलवला आहे. आता शरद ऋतूवर..
कालिदास तृतीय सगीतल्या बाराव्या श्लोकांमध्ये शरद ऋतूवर किंचित रुसलेले वाटतात. ते म्हणतात-
जलदोदरेषु बलभिद: धनु: नष्टं
अद्यवियत्पताका सौदामिनी न स्फुरति
बलाका: पक्षपवनै: न धुन्वन्ति
मयूरा: गगनं उन्नतमुखं न पश्यन्ति।।
.. वर्षांऋतू सरला आहे, कृष्णमेघानी दाटलेले नभ आता दिसत नाहीये. त्या काळ्या ढगांवर उठून दिसणारे इन्द्रधनु दृष्टीस पडत नाहीये. गडगडणाऱ्या ढगात कडाडणारी बिजली आकाशात पताकांसारखी चमकत असे, तीही दिसेनाशी झालीय. त्या नीलवर्णी नभोमंडपात इथून तिथे उडणाऱ्या बलाकांच्या विहंगमाला ही नाहीशा झाल्या आहेत.. आणि अशा (शृंगारमय) वातावरणात आपले राजवर्खी मुख आकाशाकडे करून विविध रंगाने नटलेला पिसारा फुलवणारे मोर कुठे आहेत? सारेच कसे बदलून गेले आहे.
कालिदासांच्या दृष्टीस अर्थात शरदाचं सौंदर्य केव्हाच भरून गेलं होतं. वर्षांऋतूसारखी शरदातही रंगाची उधळण दिसते असं ते इथे म्हणतात.
भिन्नम् अत्र्जनंप्रचयकान्ति नभो मनोज्ञं
बन्धूक पुष्परजसारुणिता भूमिश्च
चारुकमलावृत भूमिआगा: व प्राश्च
भुवि कस्य यून: मनो न प्रोत्कण्ठयन्ति
इथे कालिदास शरदाच्या तीन मनोहर वैशिष्ठय़ांचं वर्णन करतात. आकाशातल्या ढगांचा काळिमा नष्ट झाला आहे आणि नीलवर्णी नभानं मन मोहित होत आहे. लाल रंगानं बहरलेल्या फुलांच्या पखरणीमुळे जमीनही सुशोभित झाली आहे. इथे तिथे लहानमोठी तलावांमध्ये अनेक कमल पुष्प फुललेली आहेत. नभ, पृथ्वी आणि जल अशा रीतीने उत्फुल्ल झाली आहेत, अशा वेळी तरुणांची मनं (प्रणय) उत्सुक झाली नाहीत तर ते नवलच.
निसर्गवर्णनावरून महाकवी कालिदास अधिक शृंगारिक रसाचा परिपोष करतात. नदी, लता अशा नैसर्गिक स्त्रीरूपांमध्ये त्यांना ललनांची भावविभोरता, चंचलता आणि प्रणयरम्यता त्यांना ठायीठायी प्रतीत होते. ते म्हणतात-
चञ्चन्मनोज्ञशफरी रशना कलापा:
पर्यन्त संस्थितसिताण्डजपंक्ति हारा:
विशाल पुलिनान्तनितम्बबिम्बा: नद्य:
समदा: प्रमदा: इव अद्य मन्दं प्रयान्ति (अन्वय)
वर्षांऋतूमधील पर्जन्यानं तुडुंब भरलेल्या नद्या आता खळाळत नाहीत, तर त्या धीमेपणानं समुद्राकडे आपल्या मस्तीत वाहात आहेत. जशा रूपगर्विता स्त्रिया मंदगतीने आपल्या प्रियकराकडे वाटचाल करत आहेत.
वनिता आपल्या कमरेभोवती चमकदार मेखला गुंडाळतात, त्याप्रमाणे या नद्यांमध्ये मासे चमकत आहेत. स्त्रिया चमचमत्या मोत्यांचे हार परिधान करतात त्याप्रमाणे या नद्यांनी काठावर उजळ रंगाच्या पक्षीरूपी माळा घातल्या आहेत. रमणींचे विशाल नितम्ब तरुणांना मोहित करतात. त्याप्रमाणे या नद्यांचे तट आता विस्तारलेले आहेत. अशा मदमत्त नद्या आता सागराकडे धिम्यागतीने वाटचाल करीत आहेत. असा हा शरदऋतू..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
bhoplyachi ring bhaji
दुधी भोपळ्याची रिंग भजी; हिवाळ्यात पौष्टिक अशी रेसिपी नक्की ट्राय करा
healthy besan toast recipe
Healthy Besan Toast: लहान मुलांना हेल्दी नाश्ता द्यायचाय? मग लगेच बनवा ही ‘बेसन टोस्ट’ रेसिपी
teeth shiny with the help of coconut oil
दातांच्या पिवळेपणाने त्रस्त आहात? मग नारळाच्या तेलाच्या मदतीने दात करा चकाचक

प्रबोधन पर्व: मागासलेपणाच्या निर्मूलनासाठी..
‘‘..जातिनिरपेक्ष निकषांप्रमाणे जे सामाजिक विभाग मागासलेले ठरतात त्या बऱ्याच प्रमाणात हिंदू समाजाच्या खालच्या जाती निघतात. म्हणजे तुरळक अपवाद सोडले तर ह्या निकषांप्रमाणे मागासलेली ठरणारी लोकसंख्या आणि खालच्या जातींची लोकसंख्या ही एकच असते असे दिसून येते. तेव्हा भारतीय समाजाचे मागासलेले विभाग म्हणजे अमूक जाती असे त्यांना ओळखणे सोयीचे आहे. जात लोकप्रसिद्ध गोष्ट आहे. ह्या जाती कोण आणि त्यांतली माणसे कोण हे सर्वजण ओळखतात. तेव्हा कोणत्याही समाजाला लागू पडणाऱ्या मागासलेपणाच्या निकषांच्या आधारे भारतीय समाजाचे मागासलेले विभाग मुक्रर केले आणि जातींशी त्यांची सांगड घालता येते हे दाखवून दिले, की जातींच्या द्वारे हे मागासलेले विभाग ओळखणे कारभाराच्या दृष्टीने सोयीचे ठरते.’’  मे. पुं. रेगे ‘नवभारत’च्या दिवाळी १९८३च्या अंकात ‘मंडल आयोगाचा अहवाल’ या लेखात लिहितात – ‘‘..भारतीय समाजाच्या संदर्भात हा मागासलेपणा घडवून आणणारी आणि टिकवून धरणारी कारणे कोणती ह्याचा शोध घेतला पाहिजे आणि ती नाहीशी केली पाहिजेत. नाहीतर मागासलेपणाचे निर्मूलन होणार नाही. ह्या कारणांचा शोध घेतला तर ती जात ह्या सामाजिक संस्थेमध्ये गुंतलेली आहेत असे आढळून येते. तेव्हा मागासलेपणा क्रमश: नाहीसा करण्यासाठी जात ही संस्था नष्ट केली पाहिजे.. जातीचे अस्तित्व दुहेरी असते. जात व्यवहारात असते आणि म्हणून जात नष्ट करण्यासाठी जातीवर आधारलेल्या सामाजिक व्यवहाराचा अंत घडवून आणला पाहिजे. ह्याचा एक मार्ग म्हणून खालच्या जातींतील लोकांना आधुनिक शिक्षणात प्रवेश दिला पाहिजे, आणि ह्या द्वारे आधुनिक शासकीय व्यवहारात, तंत्राधिष्ठित औद्योगिक उत्पादनात वगैरे ते सहभागी होतील अशी व्यवस्था केली पाहिजे.. ..  पण जातीचे अस्तित्व मनातही असते. ते श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व, सोवळे-ओवळे ह्यांविषयीच्या काही संकल्पनांवर, तसेच काही खास धार्मिक संकल्पनांवरही-उदा., पापपुण्य, कर्म, पुनर्जन्म इ. – आधारलेले असते. तेव्हा जात मनातून घालविण्यासाठी ह्या संकल्पनांचा बिमोड केला पाहिजे..’’

Story img Loader