नसíगक स्रोतांवर ताण पडू लागला त्याचे एक मुख्य कारण वाढती लोकसंख्या. या सर्वाची गरज भागवणे म्हणजे घराकरिता रंग, कपडय़ाकरिता रंग इत्यादी खूप अडचणीचे ठरते. ‘गरज शोधाची जननी’ या न्यायाने आणि मानवाच्या सतत नवीन शोधण्याच्या ध्यासामुळे विविध रसायनांचा वापर रंगासाठी करण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगाची फलनिष्पत्ती म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेल्या रसायनांवर आधारित भली मोठी रंगशंृखला.
कापडाकरिता वापरले जाणारे रसायनयुक्त रंग सर्वसाधारणपणे तीन-चार प्रकारांत मोडतात. या सर्व पद्धतीत रंग टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. पद्धती भिन्न असल्या तरी हा रंग टिकून राहावा हा एकच उद्देश या सर्वामागे आहे. तर त्या रंगाला स्वीकारार्हता लाभेल. नसíगक तंतू जसे कापूस, रेशीम यांच्या व्यतिरिक्त मानवनिर्मित तंतू म्हणजे पॉलिस्टर, पॉलिअमाइड (नायलॉन) इत्यादी यांचा वापर वस्त्राकरिता मोठय़ा प्रमाणात होतो. सुती वस्त्राकरिता पूर्वी फक्त थेट रंगाचा वापर केला जायचा. त्यामध्ये इतर कोणत्याही रसायनांचा वापर न करता कापड रंगवले जायचे. त्या रंगाच्या पाण्यात कापड ठरावीक कालावधी बुडवून ठेवायचे. त्या वेळी रंग द्रावणातून तंतूवर जाऊन चिकटायचे. कधी हे पाणी खोलीच्या तापमानाचे असायचे तर कधी थोडे गरम. क्वचित काही रंगाला थोडय़ा थंड पाण्याचाही उपयोग केला जायचा. रंग पक्के बसण्याकरिता कापड रंगवून झाल्यावर ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची पद्धत सर्रास अवलंबली जात होती. तरीही या पद्धतीच्या रंगांचा टिकाऊपणा कमी असायचा.
यामुळेच गंधक रंग, नॅप्थॉल रंग, व्हॅट रंग असे एकापेक्षा अधिक परिणामकारक आणि टिकाऊ रंग वनस्पतीजन्य तंतूकरिता वापरात आले. प्राणिजन्य तंतूकरिता आम्ल रंगाचा वापर केला जाऊ लागला. या वेळी बाजारातील रसायनाची शुद्धता जेवढी चांगली तेवढे हे रंग टिकून राहायचे. पण जेव्हा रसायनात भेसळीचे भूत शिरले, तेव्हा रंगाचा पक्केपणा बिघडला. त्याचा दुष्परिणाम म्हणजे रंगाचा टिकाऊपणा कमी झाला. याला अन्यही कारणे आहेत, पण प्रमुख कारण रसायनातील भेसळ हेच आहे.

मनमोराचा पिसारा: कुकूर-बोकी.. मानस मानसी..
तुम्ही ‘हां हां’ म्हटलं का? कारण तुम्ही हां हां म्हणा, की ना ना म्हणा, वर्ष सरलं म्हणजे इने गिने पाच-सहा दिवस मागे राहिलेत इतकंच.
वर्षभरात आपण तीनशेहून अधिक वेळा इथेच आणि या कट्टय़ावर अशीच शुभ्र सकाळ होत असताना भेटलो, गुजगोष्टी केल्या, आठवणीतल्या कविता आणि भूले बिसरे गीत आठवून हरखलो, कधी गहिवरलो, कधी वाळूत मारल्या रेघा.. कसा वेळ गेला, मित्र हो, कळलंच नाही. बरं झालं.. वेळ जाता जात नाही, असं कधी म्हणावं लागलं नाही.
या पिसाऱ्यातली काही महत्त्वाची पिसं फार फार रंगली. त्या रंगात अनेक छटा होत्या, आकार होते आणि त्यांचा मखमलीपणा खूप मित्रमैत्रिणींना विशेष भावला.
त्यात अर्थात पहिला मान? कुकूर आणि बोकी यांचा. बोके, कुकूरचं नाव आधी घेतलं म्हणून रुसून कान हलवू नकोस. कुकूर दादा ना तुझा! तुझ्या छकुली-बकुली दोघांना खूप सांभाळतो तो! तू घुश्शात असलीस की, त्या दोघी त्याला जाऊन बिलगतात.
कुकूर दादा शहाणा आहे, अगदी पहिल्यापासून माझा मोठा स्ट्रेसबस्टर आहे.
आता उन्हात झोपली आहेत दोघं मस्त गुरगुटून! त्या दोघांशिवाय पिसारा फुललाच नसता. आता झाले मोठे दोघे जण. पायापायात घोटाळत नाहीत.
खूप शिकवलं दोघानी. विशेषत: कुकूरच्या टीचरनी माणसांच्या शाळा कशा असाव्यात यावर छान भाष्य केलं. कुकूर, बोकी आणि तुझी कच्चीबच्ची.. आय लव यू गाईज!
मग नंबर लागतो मानस-मानसीचा! या दोघांचं एकमेकांशी नेमकं काय नातं आहे, याची चौकशी करणारी बरीच पत्रं आली. त्याला उत्तर एकच.. सिर्फ एहसास है, रुहसे महसूस करो, कोई नाम ना दो..
मानसीचा आतला आवाज म्हणजे मानस आणि मानसचा आतला आवाज म्हणजे मानसी! ते दोघं एकाच मनाची दोन रूपं. एकमेकांत गुंतलेली, प्रसंगी एकमेकांशी भांडणारी, समजूत काढणारी, थट्टामस्करी करणारी ही दोन पात्रं ‘पिसाऱ्या’मधली सशक्त पिसं. मानस-मानसीचं सहअस्तित्व ही एक मानसिक रिअ‍ॅलिटी. प्रत्येक पुरुषात स्त्रीसुलभ गणलेल्या कोमल भावना असतात, हळवेपणा असतो, चिकाटी असते, वास्तवाची जाणीव असते. तर प्रत्येक स्त्रीच्या मनात पुरुषसुलभ ठामपणा, आग्रहीपणा, थोडा आक्रमकपणा असतो. या दोन मनोभूमिकांना आपल्या मनात सामावून घेणं म्हणजे स्त्री-पुरुष समानता! अर्थात, हे फार गोडगोड, छानछान असतं असं नाही, त्या वृत्तीचं आपापसात पटतं असं नाही. म्हणजे आपलंच आपल्याशी भांडण होतं. आपण आपल्यावर रुसतो, नावं ठेवतो.
म्हणून मानस-मानसीचे संवाद रंगवताना ‘मनमोराचा पिसारा’ विशेष फुलला, अधिक रंगतदार झाला. आपण आपल्याशी कसा खेळकर, हृद्य आणि मजेदार संवाद साधायचा, याचं ते प्रारूप होतं. मानस-मानसीच्या संकल्पना कार्ल युंग यांच्या समूह नेणिवेतील प्राचीन आकृतिबंध (आर्कीटाइप्स इन कलेक्टिव्ह अनकॉन्शस) यामधून सुचलेल्या आहेत हे सांगायला नको..
अजून भेटायचं आहे, तोपर्यंत माझी मानसी म्हणजे ललिता ‘मनमोरा’बद्दल काय म्हणते ते वाचा.. अर्थात इथेच आणि या कट्टय़ावर.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
आता फक्त कपडे नव्हे तर माणसांनाही मशीनमध्ये धुता येणार? जपानी कपंनीने तयार केली माणसांना धुणारी मशीन

प्रबोधन पर्व: समता-संगराची पंचसूत्री
‘‘समता-संगराची आम्हाला जाणवणारी जी पंचसूत्री आहे, त्याच्या कृतिशील आग्रहातून समतेची आज काहीशी अडखळत चालू असलेली वाटचाल दमदारपणे होऊ शकेल, असे आम्हाला वाटते.. जातिसंस्थेवर आधारित विषमतेचे उच्चाटन करणे, कौटुंबिक पातळीवर तीव्रतेने जाणवणारी स्त्री-पुरुष विषमता दूर करणे, केवळ सद्भावना वा करुणा यांवर समतेची अंमलबजावणी अवलंबून न ठेवता प्रत्यक्ष जगण्यात – विशेषत: आर्थिक हितसंबंधांत सहकार्य व समता प्राप्त करणे आणि प्रसंगी त्यासाठी संघर्ष करणे, समतेच्या नावाने जे गळा काढतात परंतु ज्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत – त्या तथाकथित समरसतावादी-विषमतावाद्यांचा प्रतिरोध करणे आणि या सर्वासाठी समतावाद्यांची आज विस्कळीत असलेली छावणी एकसंध करून त्यांची भरभक्कम एकजूट उभारणे – ही पंचसूत्री आम्हाला महत्त्वाची वाटते.’’
नरेंद्र दाभोलकर ‘समता-संगर’ (जून २०१४) या पुस्तकात समता-संगराची पंचसूत्री सांगत त्यापुढील आव्हांनाविषयी लिहितात – ‘‘आर्थिक विषमता या देशात पराकोटीला पोचली आहेच; पण त्याहून भयानक म्हणजे, त्याबाबतची संवेदनशीलताही ‘आहे रे’ वर्ग आणि सत्ताधीश झपाटय़ाने गमावून बसला आहे. ज्याच्या मनगटात भला-बुरा कसलाही दम असेल, तो कोठूनही आपले वैभव ओरबाडून घेईल. त्याबद्दल तक्रारीचा सूर सोडाच, असूयामिश्रित कौतुकाची भावना समाजात आढळते. विषमतेचे बळी ठरणाऱ्या दारिद्रयरेषेखालच्या कोटय़वधींना रास्त धान्याच्या दुकानात निम्म्या किमतीत धान्य देऊन जगवण्याची सोय केली की, जणू इतिकर्तव्यता संपते. घृणास्पद चंगळवादाला जागतिक परिमाण लाभल्याने या विषमतेला विरोध आणखीनच अवघड बनला आहे. आणि हे चित्र असेच राहिले, तर औपचारिक लोकशाहीचा सांगाडाही कोसळण्याची जबरदस्त किंमत सामान्य माणसालाच द्यावी लागेल.. समतेला विरोध करणाऱ्या प्रभावी शक्ती असल्याशिवाय विषमता अशी मोकाट सुटणार नाही. या शक्ती समर्थ तर आहेतच, पण मायावी आहेत.. सत्ता आणि समाजाच्या विविध अंगांवरील प्रभुत्व यांमुळे त्यांना किंमत प्राप्त झाली आहे. त्यांना अडवणे आणि त्यांचे सत्यस्वरूप सामान्यांना समजावून देणे, हेदेखील अतिशय गरजेचे आहे.’’

Story img Loader