नसíगक स्रोतांवर ताण पडू लागला त्याचे एक मुख्य कारण वाढती लोकसंख्या. या सर्वाची गरज भागवणे म्हणजे घराकरिता रंग, कपडय़ाकरिता रंग इत्यादी खूप अडचणीचे ठरते. ‘गरज शोधाची जननी’ या न्यायाने आणि मानवाच्या सतत नवीन शोधण्याच्या ध्यासामुळे विविध रसायनांचा वापर रंगासाठी करण्याचे प्रयोग सुरू झाले. या प्रयोगाची फलनिष्पत्ती म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेल्या रसायनांवर आधारित भली मोठी रंगशंृखला.
कापडाकरिता वापरले जाणारे रसायनयुक्त रंग सर्वसाधारणपणे तीन-चार प्रकारांत मोडतात. या सर्व पद्धतीत रंग टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. पद्धती भिन्न असल्या तरी हा रंग टिकून राहावा हा एकच उद्देश या सर्वामागे आहे. तर त्या रंगाला स्वीकारार्हता लाभेल. नसíगक तंतू जसे कापूस, रेशीम यांच्या व्यतिरिक्त मानवनिर्मित तंतू म्हणजे पॉलिस्टर, पॉलिअमाइड (नायलॉन) इत्यादी यांचा वापर वस्त्राकरिता मोठय़ा प्रमाणात होतो. सुती वस्त्राकरिता पूर्वी फक्त थेट रंगाचा वापर केला जायचा. त्यामध्ये इतर कोणत्याही रसायनांचा वापर न करता कापड रंगवले जायचे. त्या रंगाच्या पाण्यात कापड ठरावीक कालावधी बुडवून ठेवायचे. त्या वेळी रंग द्रावणातून तंतूवर जाऊन चिकटायचे. कधी हे पाणी खोलीच्या तापमानाचे असायचे तर कधी थोडे गरम. क्वचित काही रंगाला थोडय़ा थंड पाण्याचाही उपयोग केला जायचा. रंग पक्के बसण्याकरिता कापड रंगवून झाल्यावर ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची पद्धत सर्रास अवलंबली जात होती. तरीही या पद्धतीच्या रंगांचा टिकाऊपणा कमी असायचा.
यामुळेच गंधक रंग, नॅप्थॉल रंग, व्हॅट रंग असे एकापेक्षा अधिक परिणामकारक आणि टिकाऊ रंग वनस्पतीजन्य तंतूकरिता वापरात आले. प्राणिजन्य तंतूकरिता आम्ल रंगाचा वापर केला जाऊ लागला. या वेळी बाजारातील रसायनाची शुद्धता जेवढी चांगली तेवढे हे रंग टिकून राहायचे. पण जेव्हा रसायनात भेसळीचे भूत शिरले, तेव्हा रंगाचा पक्केपणा बिघडला. त्याचा दुष्परिणाम म्हणजे रंगाचा टिकाऊपणा कमी झाला. याला अन्यही कारणे आहेत, पण प्रमुख कारण रसायनातील भेसळ हेच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा