नैसर्गिक रबरामधील ‘आयसोप्रीन’ हा महत्त्वाचा घटक. त्यात कार्बनचे ५ अणू आणि हायड्रोजनचे ८ अणू असतात. साधारणपणे १८८० मध्ये कृत्रिम पद्धतीनं अशा प्रकारचा एखादा पदार्थ तयार करण्यात संशोधक उत्सुक होते. त्याच काळात रबरापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची मागणी वाढत होती. नसíगक रबराचा पुरवठा कमी पडत होता. आयसोप्रीनच्या रासायनिक सूत्राशी जुळणारा २, ३ डायमिथिल ब्यूटाडाइन असा एक पदार्थ आहे असं संशोधकांच्या लक्षात आलं. या पदार्थात कार्बनचे ६ अणू आणि हायड्रोजनचे १० अणू असतात. २, ३ डायमिथिलमध्ये आयसोप्रीनपेक्षा एक हायड्रोजन आणि दोन कार्बनचे अणू जास्त असतात. त्याच्या रचनेत थोडासा फरक असतो. चुनखडी आणि कोळसा या कच्च्या मालापासून हा पदार्थ तयार करण्यात आला होता. जेव्हा या पदार्थाचा प्रत्यक्ष वापर करायला सुरवात झाली तेव्हा हे कृत्रिम रबर कमी प्रतीचं आहे असं लक्षात आलं. अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये कृत्रिम पद्धतीनं रबर तयार करण्याचे अनेक प्रयत्न चालू होते. आयसोब्युटाडाइन या संयुगावर प्रक्रिया करून रबर मिळवता आलं.
सध्या संश्लेषित रबर (कृत्रिम रबर) तयार करताना ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे पदार्थ वापरतात. नसíगक रबर तयार करण्याच्या प्रकियेत थोडाफार बदल होतो आणि आपल्याला संश्लेषित रबर मिळतं. नसíगक रबरामध्ये जास्त प्रमाणात लवचीकता असते. वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे हातमोजे, फुगे तयार करण्यासाठी नसíगक रबर वापरलं जातं. कृत्रिम रबर नसíगक रबरापेक्षा अधिक मजबूत असतं. पाणी, ओलावा, आम्लधर्मी रसायनं यांच्याविरुद्ध लढण्याची क्षमता त्यात जास्त असते. झाडांना पाणी घालण्यासाठीचे पाईप, रेनकोट, क्षेपणास्त्रातील काही भाग तयार करताना कृत्रिम रबर वापरलं जातं. रबराच्या एकूण उत्पादनापकी ७० टक्के रबर हे वाहनांसाठी लागणारे टायर्स तयार करण्यासाठी वापरले जाते. या रबरी टायर्समुळेच तर आजचं आपलं जीवन सुखकारक झालेलं आहे.
मनमोराचा पिसारा: सेरेण्डिपिटी
म्हणजे ही सगळी गंमतच गंमत आहे. शब्द, त्याचा अर्थ, त्यामागची संकल्पना, शब्दाचा इतिहास, त्या शब्दसंकल्पनेचं उपयोजन, त्यामागील विचार, विचारातील विरोधाभास आणि अर्थात उदाहरणं.. उदाहरणांवरून सुरुवात करू. पुष्कळ आहेत म्हणजे जगात अग्रगण्य मानलेल्या शोधांमध्ये आणि उपयोजित शोधांमधले (डिस्कव्हरी) ५० टक्के कर्तृत्व याच संकल्पनेच्या आधारे समजून घेता येतं. मिनॉक्सिडिल या केशसंवर्धनाच्या औषधाचा केसांचे पुनरुज्जीवन करण्याचं उपयोजन. प्रत्यक्षात या रसायनाचा उपयोग अतिरक्तदाबाकरिता होईल, असं वाटून प्रयोगांना सुरुवात झाली आणि याने केस वाढतात, हा शोध केवळ योगायोगाने (चान्स फाइण्डिंग) लागला. फ्लुऑक्सेटिन (प्रोझ्ॉक) औषधांचा प्रभावी उपयोग मंत्रचळावर होते, हा शोध असाच. एक्स-रेचा शोध असाच लागला. थांबतो, जरा गुगलून बघा..
शब्द आहे ‘सेरेण्डिपिटी’. म्हणजे योगायोगाने, नशिबाने सापडलेला शोध. लक्षात आलेला नवा उपयोग. नवं ठिकाण, नवी गोष्ट. म्हणजे शोधायला लागलो एक आणि नशिबानं हात देऊन सापडलं घबाड!
वैज्ञानिक योगायोगावर विश्वास ठेवतात का? हा प्रश्न गौण. कारण जे गवसत नव्हतं ते गवसले. तर्कशुद्ध विचार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी स्वत: लावलेल्या शोधाचं श्रेय ‘नशिबाला’ द्यावी, हा मजेशीर विरोधाभास आहे. या विरोधावर मग अधिक संशोधन करण्याला सुरुवात झाली. असं आश्चर्यकारक संशोधन केवळ दैवदत्त नसून तल्लख जिज्ञासा, सूक्ष्म डोळस अवलोकन आणि निरीक्षण. त्यावर जुजबी सिद्धान्त मांडून पुढे सखोल परीक्षण आणि संशोधन, अशी प्रागतिक वाटचाल केली. आता वैज्ञानिक आपल्या संशोधन, अभ्यास अथवा विचाराकडे पाहून दॅट्स फनी, मी नव्हता असा विचार केलेला!! असं म्हणत मनाची कवाडं उघडी ठेवतात.
अॅलेक्झांडर फ्लेमिंगला पेनिसिलीनचा असाच शोध लागला होता. बुरशीमध्ये प्रतिजैविक असू शकेल, असं त्यांना सुचलं; कारण पेट्रिडिशमधल्या गोष्टीचं त्यांनी सांगोपांग, नियमित निरीक्षण केलं. हे नशीब नाही, तर ौकस, डोळस शहाणपणा (सगॅसिटी) आहे!! नाहीतर उगीच ‘दैववादी’ टाळ्या पिटायला लागतील.
तसं म्हटलं तर हा अनुभव आपल्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात कधीतरी येतो. सहज भेटायला जाऊन जीवनातली अपूर्व संधी मिळणे. चुकून फोन लागून जुनी मंडळी भेटणे इत्यादी; परंतु असं घडण्यासाठी किंवा घडविण्यासाठी मन तल्लख असायला हवं. मुख्य म्हणजे मनात जिज्ञासा आणि ज्ञानसंपादनाची तहान असावी लागले. मन तयार असावं लागतं. ज्ञानप्राप्तीकरिता उत्सुक मनाच्या आधारे आपली नजर शोधक होते. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ हे असं घडू शकतं. प्रत्येकाच्या मनात शास्त्रज्ञ असतो. तर्काधिष्ठित विचार करण्याची क्षमता असते. आपण या गोष्टी दैववाद, कुडमुडे ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, राशीभविष्याकडे गहाण ठेवतो!! ‘सेरेण्डिपिटी’ हा विज्ञानविषय ठरला आहे. आता हा शब्द आला कुठून? निळ्याशार समुद्रात नवं जग शोधायला निघालेल्या दर्यावर्दीना ‘सिंहलद्वीप’ म्हणजे ‘श्रीलंका’ हे बेट सापडलं अचानक नि अनपेक्षितपणे. या सिंहलद्वीपाचं पुढे ‘सेरेण्डिप’ झालं आणि त्यावरून सेरेण्डिपिटी हा शब्द तयार झाला. पिसाऱ्याच्या वाचकांची पत्रं येतात. त्यात कधीकधी अनपेक्षित लाभांच्या गोष्टीचा शोध इथल्या लेखातल्या वाक्यावरून लागला, असं ते कळवितात. माझ्याही दृष्टीनं पिसाऱ्याचा असा उपयोग हीदेखील ‘सेरेण्डिपिटी’!!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: जनप्रियतेसाठी भ्रष्ट नकला करण्याची प्रवृत्ती..
‘‘अवाजवी भपक्याने, नसलेले आहे असे भासवत फिरणे म्हणजे मिरवणे! माझा रोख आहे शास्त्रोक्त संगीताच्या नावाने मिरवणाऱ्या भारतीय चित्रपट संगीतातील काही लोकप्रिय रचनांकडे. या रचना लोकप्रिय नसत्या आणि केव्हाही, कुठेही कसेही चित्रपट संगीत घुसडण्याचे व्रत आकाशवाणी, दूरदर्शन वगैरे माध्यमांनी घेतले नसते, तर मला अशा रचनांची चर्चा करावी लागली नसती! परंतु दैनंदिन जीवनात खोटय़ा नाण्यांमुळे खरी नाणी बाजूला पडतात तसे चित्रपट संगीतात होण्याचा धोका आता वाढला आहे! खोटे किंवा नकली शास्त्रोक्त संगीत रचनाकार राहावेत म्हणून सर्व मोहिमा हाती घेतल्या जातात. गाणे ‘हॅमर’ केले जाते! ते यशस्वी होते. मग पुन्हा त्याची ‘कॉपी’ करून दुसरी गाणी तयार होतात! अशा सर्वव्यापी प्रक्रियेतून ‘शास्त्रोक्त’ म्हणून एखादे गाणे लोकांच्या कानी/ गळी उतरवणे चिंत्य घटना नव्हे काय?’’डॉ. अशोक दा. रानडे ‘मिरवणारे ‘शास्त्रोक्त’ संगीत’ (संगीत संगती, ऑक्टोबर २०१४) या लेखात संगीतशैलीत काही तरी विजातीय हीन मिसळण्याच्या संगीतरचनाकारांच्या सोसामुळे त्यांच्या चाली कशा खोटय़ा ठरतात या विषयी लिहितात –
‘‘भारतीय शास्त्रोक्त संगीताला(च) गांभीर्याने घेण्याची झालेली चूक. त्यामुळे संगीतात प्रतिष्ठेचे ते राग-ताल-संगीत असा गैरसमज फैलावला. आपल्याला तेही येते असे सिद्ध केल्याने आपण श्रेष्ठ ठरू, हा दुसरा गैरसमज मागोमाग येणे क्रमप्राप्त ठरले. चित्रपट संगीत श्रेष्ठ, त्याची गुणवत्ता मान्यताप्राप्त व्हावी तर रागतालाचा अंगरखा चढवला की भागते, अशी भाबडी खात्री संगीतकारांना वाटू लागली! शिवाय ‘त्या’ प्रेक्षकांना ‘ते’ संगीत आवडते, या तऱ्हेची विधाने आपण करत आलो- फारशा पुराव्याशिवाय. पात्रता आणि जनप्रियता हवी तर भ्रष्ट नकला करा, असा आदेश जणू दिला गेला आणि आमचे संगीत रचनाकार त्याच्या जाळ्यात फसले!.. रागसंगीताचे मर्म कशात असेल तर ते सांगीतिक कल्पनाबंधाची पद्धतशीर बढत करण्यात. अनेक वेळा अर्थपूर्ण कल्पनाबंध आकर्षकपणे थोडक्यात मांडला, तरीही रागसंगीताच्या खोलीचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही.’’