नैसर्गिक रबरामधील ‘आयसोप्रीन’ हा महत्त्वाचा घटक. त्यात कार्बनचे ५ अणू आणि हायड्रोजनचे ८ अणू असतात. साधारणपणे १८८० मध्ये कृत्रिम पद्धतीनं अशा प्रकारचा एखादा पदार्थ तयार करण्यात संशोधक उत्सुक होते. त्याच काळात रबरापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची मागणी वाढत होती. नसíगक रबराचा पुरवठा कमी पडत होता. आयसोप्रीनच्या रासायनिक सूत्राशी जुळणारा २, ३ डायमिथिल ब्यूटाडाइन असा एक पदार्थ आहे असं संशोधकांच्या लक्षात आलं. या पदार्थात कार्बनचे ६ अणू आणि हायड्रोजनचे १० अणू असतात. २, ३ डायमिथिलमध्ये आयसोप्रीनपेक्षा एक हायड्रोजन आणि दोन कार्बनचे अणू जास्त असतात. त्याच्या रचनेत थोडासा फरक असतो. चुनखडी आणि कोळसा या कच्च्या मालापासून हा पदार्थ तयार करण्यात आला होता. जेव्हा या पदार्थाचा प्रत्यक्ष वापर करायला सुरवात झाली तेव्हा हे कृत्रिम रबर कमी प्रतीचं आहे असं लक्षात आलं. अमेरिका, जर्मनी या देशांमध्ये कृत्रिम पद्धतीनं रबर तयार करण्याचे अनेक प्रयत्न चालू होते. आयसोब्युटाडाइन या संयुगावर प्रक्रिया करून रबर मिळवता आलं.
सध्या संश्लेषित रबर (कृत्रिम रबर) तयार करताना ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे पदार्थ वापरतात. नसíगक रबर तयार करण्याच्या प्रकियेत थोडाफार बदल होतो आणि आपल्याला संश्लेषित रबर मिळतं. नसíगक रबरामध्ये जास्त प्रमाणात लवचीकता असते. वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे हातमोजे, फुगे तयार करण्यासाठी नसíगक रबर वापरलं जातं. कृत्रिम रबर नसíगक रबरापेक्षा अधिक मजबूत असतं. पाणी, ओलावा, आम्लधर्मी रसायनं यांच्याविरुद्ध लढण्याची क्षमता त्यात जास्त असते. झाडांना पाणी घालण्यासाठीचे पाईप, रेनकोट, क्षेपणास्त्रातील काही भाग तयार करताना कृत्रिम रबर वापरलं जातं. रबराच्या एकूण उत्पादनापकी ७० टक्के रबर हे वाहनांसाठी लागणारे टायर्स तयार करण्यासाठी वापरले जाते. या रबरी टायर्समुळेच तर आजचं आपलं जीवन सुखकारक झालेलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा