सर्वसामान्य व्यक्तींचा संबंध येतो तो कापडाशी आणि कपडय़ांशी! सुतापासून कापडनिर्मिती होते आणि सूतनिर्मितीसाठीचा आवश्यक घटक म्हणजे ‘तंतू’. एका अर्थी कापडाचा मूळ एकक आहे तंतू. म्हणून वस्त्र प्रावरणाच्या अभ्यासातील सुरुवात तंतूपासून होणे महत्त्वाचे आहे. व्यासाच्या किंवा रुंदीच्या २००पट लांब असलेल्या घन वस्तूला ‘तंतू’ किंवा इंग्लिशमध्ये फायबर म्हणतात. निसर्गात शंभरहून अधिक तंतू उपलब्ध आहेत. सूतनिर्मिती होण्याकरिता तंतूमध्ये विशेष गुणधर्म असणे आवश्यक आहे. सर्वच तंतू वस्त्रनिर्मितीसाठी योग्य असतात असे नाही, म्हणूनच वस्त्रोद्योगात आजपर्यंत काही निवडक तंतूंचाच वापर करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरीही तसे अनेकविध तंतू वस्त्रनिर्मितीमध्ये वापरले गेले आहेत व त्यांचे वर्गीकरण केल्यास आपल्याला त्याचे उपयोग आणि आवाका समजणे सोपे जाईल.
तंतूंची वर्गवारी नसíगक तंतू आणि मानवनिर्मित तंतू अशी करता येईल. नसíगक तंतूमध्ये वनस्पतीजन्य तंतू जसे बियांपासून -कापूस आणि काथ्या इत्यादी, खोडापासून -ताग, लिनन इत्यादी
आणि पानांपासून- अननस आणि सिसल इत्यादींचा अंतर्भाव होतो. प्राणीजन्य तंतूमध्ये लोकर (मेंढीच्या कातडय़ापासून) आणि रेशीम (रेशमी कीटकांपासून) यांचा समावेश होतो. याशिवाय खनिजतंतू म्हणून अ‍ॅसबॅसटॉसचा उल्लेख केला जातो.  
मानवनिर्मित तंतूंमध्ये पुनर्जनित तंतू जसे व्हीस्कोस, अ‍ॅसिटेट, रबर, ऑक्सिनेट इत्यादींचा समावेश होतो तर संश्लेषित तंतूंमध्ये नायलॉन, पोलिएस्टर, अ‍ॅक्रॅलिक इत्यादींचा अंतर्भाव आहे. इतर तंतू म्हणून कार्बन, काच, जर इत्यादींचा उल्लेख  करायला हवा.  
इतक्या प्रकारचे तंतू वेगवेगळ्या कामाकरिता वापरले जातात, त्या तंतूंचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या तंतूंपासून सूत तयार करायला, त्या सुताचे कापड तयार करायला भिन्न पद्धतींचा वापर करावा लागतो, हे आपल्या लक्षात आले असेल. यामुळेच वस्त्रोद्योगाचा आवाका खूप मोठा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग करून या उद्योगानेही मोठा पल्ला गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संस्थानांची बखर: ब्रिटिशांचे युरोपीय स्पर्धक बाद
ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे आपले प्रथम प्रशासकीय ठाणे स्थापन केले, त्या काळात भारतातील असंख्य लहान लहान राज्यकर्त्यांपकी निम्म्याहून अधिक शासक मोगल बादशाह किंवा मराठा छत्रपती किंवा इतर एखाद्या मोठय़ा सत्तेचे खंडणीदार अथवा निष्ठावंत मांडलिक असत. जनतेकडून महसूल गोळा करुन त्यातील ठराविक रक्कम चौथाई म्हणून स्वतसाठी घेऊन बाकीची रक्कम प्रमुख शासकांना ते देत असत.
 कंपनीचा संबंध व्यापाराच्या उद्देशाने प्रथम सुरत,  हैदराबाद तसेच बंगाल या (समुद्रकिनाऱ्यांना  लागून असलेल्या) राज्यांशी आला. त्यांचे युरोपीय स्पर्धक फ्रेंच यांच्याशी झालेल्या संघर्षांतून ब्रिटिशांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला प्रेरणा मिळाली. फ्रेंचांचा भारतात बिमोड करुन ब्रिटिशांनी त्यांना पाँडिचेरी, चंद्रनगर (बंगाल), माहे (आजचे केरळ), यानाम (आताचा आंध्रप्रदेश) येथे तर पोर्तुगीजांना केवळ गोव्यात सीमित केले आणि त्यानंतरच भारतीय उपखंडातील आपली राज्यविस्तार करण्याची मोहीम सुरू केली.
१७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दुबळ्या झालेल्या मोगल सत्तेचे वर्चस्व झुगारून त्यांचे अनेक लहानमोठे मांडलिक राजे, सरदार, जहागीरदार आपले स्वतंत्र राज्य स्थापण्याच्या खटपटीला लागले. प्लासी आणि बक्सरच्या विजयानंतर कंपनीच्या ताब्यात बंगाल आणि ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेशाच्या सुपीक प्रदेशातला महसूल आलाच पण बंगालचा नवाब, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातले बाहुले बनला. अवधचा नवाब आणि मोगल बादशाह शाह आलम यांच्याशी ब्रिटिशांनी मत्री केल्याचे नाटक हुबेहूब वठविले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com