सामान्यपणे मृतदेह जास्त काळ अंत्यसंस्कारावाचून राहिला की तो कुजायला लागतो आणि दरुगधी येऊ लागते. इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे मृतदेह आहेत. हे मृतदेह म्हणजेच ‘ममीज’ अजूनही कुजलेले नाहीत. हे कसे काय? मानवी देहाच्या विघटनाचे वा कुजण्याचे सुधारित स्वरूप म्हणजे ‘ममीफिकेशन’ होय. ममीफिकेशन या प्रक्रियेत शरीरातील पाणी निघून जाऊन ते शुष्क होते, वाळून जाते. लहान बाळांमध्ये ममीफिकेशन झालेले अनेकदा आढळून येते. याचे कारण म्हणजे लहान बालकांच्या अवयवांमध्ये जंतू नसतात किंवा त्यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया एक तर होतच नाही किंवा झाल्यास अगदी सावकाश होते.
वातावरणाचे उच्च तापमान, आद्र्रतेचा अभाव व मृतदेहाभोवती हवा खेळती राहण्याची सोय या तीन गोष्टी असल्या; तर मृतदेह न कुजता त्याचे ममीफिकेशन होते. आस्रेनिक व अॅन्टीमनी यांसारखी मूलद्रव्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना; पण शरीरामध्ये बराच काळ साठून राहिली असतील तर ममीफिकेशन लवकर होते. असा मृतदेह सुरकुतलेला दिसतो, त्याला वास येत नाही व त्याचा रंग काळपट असतो. मृतदेहाचे वजन घटते. त्वचा शुष्क व कडक होऊन शरीराला घट्ट चिकटून बसते. महत्त्वाची बाब म्हणजे वर सांगितलेल्या बदलांमुळे मृतदेहाच्या शरीरावरील रचनात्मक खुणा तशाच राहतात. यांचा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी उपयोग होतो. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये उच्च तापमान, खेळती हवा व आद्र्रतेचा अभाव या तीनही गोष्टी आढळून येत असल्याने तेथे मृतदेह कुजत नाहीत तर ते वाळून ममीज तयार होतात.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना शिकण्यासाठी व काही वेळा मृतदेह एका देशातून दुसऱ्या देशात न्यायचा असेल वा अंत्यसंस्कारास खूप वेळ असेल तर कृत्रिमरीत्याही ममीफिकेशन करता येते. यात मृतदेहाच्या मांडीतील धमनीत वा मानेतील धमनीत फॉर्माल्डीहाइड किंवा आस्रेनिक, लेड सल्फाइड व पोटॅशिअम काबरेनेट यांचे द्रावण सुईद्वारे सोडतात. यामुळे शरीरातील जीवाणू मरून कुजण्याची प्रक्रिया थांबते. या प्रक्रियेत शरीरातील अवयव कडक होतात.
मनमोराचा पिसारा: बहु साधकांच्या बहु साधनांचा, आधार तू रे किती चिंतनांचा..
१९३७ साली श्रीरामकृष्ण परमहंस यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्या गोष्टीला ७६-७७ र्वष उलटून गेली. त्या जन्मशताब्दीसाठी गुरुदेव रविन्द्रनाथांनी श्रीरामकृष्णांना अतिशय भावविभोर होऊन मधुर शब्दात श्रद्धांजली वाहिली होती.
मूळ काव्यरचना श्रीरामकृष्णांच्या उत्कट आध्यात्मवादाला उद्देशून गुंफलेली होती. श्रीरामकृष्णांच्या गूढवादी आध्यात्मानं कित्येक आकर्षित झाले. अशा साधकाचं जीवन श्रीरामकृष्णांच्या जीवनाच्या परिशीलनातून संपन्न झालं.
या काव्यपंक्तींची आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विशेष आठवण झाली. त्या काव्यावर चिंतन केल्यावर लक्षात आलं की ती भावपूर्ण श्रद्धांजली फक्त श्रीरामकृष्णांना वाहिलेली नाही.
भारताच्या समृद्ध आध्यात्मविचारांचं मर्म ओळखून त्यांच्याविषयी गुरुवर्य त्या शब्दांत आदर व्यक्त करतात.
भारताच्या मातीत दडलेल्या आत्मचिंतनवादी विचारांनी संपूर्ण विश्व उजळू शकतं. या भारतीय विचार परंपरेतली सर्वसमावेशकता, निराग्रहता, अभिनिवेशशून्यता आणि ‘केवळ चिंतनातून जीवनाचा अर्थ शोधता येतो,’ असा ठाम विश्वास जीवनाची सार्थकता या विचार परंपरेतून गवसते.
श्रीरामकृष्णांच्या विचारचिंतनामध्ये वंश-जाती, समाज अशा भेदाभेदांना स्थान नव्हते, पण त्याहीपलिकडे लिंगभेदालाही त्यांनी अमंगळ ठरविले होते. खऱ्या अर्थाने जीवनाचं चेतसरुप त्यांनी अनुभवलं होतं. इतका समृद्ध वारसा या भारतभूने जपलेला आहे.
.. अशी ती रवीन्द्रनाथांची मूळ बांग्ला कविता. तिचा भावार्थ असा :
जीवनाचा अर्थ आणि सार्थकता शोधणारे लाखो साधक तुझ्या जीवनात अनेकविध साधनामार्ग शोधत असतात.
हे बहुविध साधनामार्ग तुझ्यात चिंतनात सामावलेले आहेत. तू विदीत केलेल्या ध्यानमार्गातच सगळ्या साधना समाविष्ट झालेल्या आहेत.
चिंतन-ध्यानधारणेच्या या अनेक मार्गानं तुझं जीवन उजळून निघाले आहे. ज्ञानप्राप्तीच्या या वैविध्यपूर्ण आणि अनेकमार्गानं तू तेजाळत आहेस. ज्ञानतेजानं (स्वयंप्रकाशित) तू आता विश्वाचे नूतन तीर्थस्थान आहेस.
देशीविदेशीचे विद्वत्जन आणि एतद्देशीय भक्तगण तुला या संपन्न (आध्यात्मिक) वारशाबद्दल नतमस्तक होतात.
या कोटय़वधी साधकांमध्ये माझे तुला शतश: प्रणाम..
प्रस्तुत काव्याचा भारताशी संदर्भ हे केवळ प्रस्तुत लेखकानं केलेलं निरुपण आहे. गुरुवर्य रवीन्द्रनाथ यांच्या विचारांचं उपयोजन या संदर्भात केलं आहे. अर्थात, रवीन्द्रनाथांच्या प्रत्येक कृतीच्या अंतर्यामी भारत असायचाच.
बहु साधोकेर बहु साधोनार धारा
ध्याने तोमार मिलीतो होयेछे तारा
तोमार जीबोने असीमेर लीलापॉथे
नुतॉन तीथरे रूप नीलो ए जॉगोते
देश-बिदेशेर प्रॉणाम आनीलो टानी
शेथाय आमार प्रॉणोति दिलाम् आनी
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: फाळणीनंतरही शेती फुलवणारे शिस्तबद्ध प्रयत्न
‘‘देशात साधनसामग्री कितीही विपुल असली तरीसुद्धा देशात कमालीचे दारिद्रय आणि मागासलेपणा असू शकतो असा मानवी अनुभव आहे. उदा. आपल्या शेजारच्या ब्रह्मदेशाचेच पाहा. सर्व तऱ्हेची विपुल साधनसामग्री, जमीन, पाणी, खनिजे, पेट्रोलियम पदार्थ, घनदाट जंगले व चांगला समुद्रकिनारा असतानासुद्धा आशिया खंडातील सर्वात अप्रगत आणि कमालाचे दारिद्रय असलेला देश म्हणजे ब्रह्मदेश. ब्रह्मदेशासारखे आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशिया खंडात इतरही काही देश आहेत. त्याच्या उलट कमीत कमी साधनसामग्री असताना जगात पहिल्या प्रतीची समृद्धी, औद्योगिक प्रगती, निर्यात व्यापार, उच्च राहणीमान, संपत्ती निर्माण करण्याचे सामथ्र्य जपानने साध्य केले आहे.’’ ‘महाराष्ट्र : विकासाचे नवे प्रवाह’ (१९९१) या पुस्तकातील लेखात भारतीयांच्या प्रयत्नांची थोरवी वर्णिताना अण्णासाहेब शिंदे लिहितात – ‘‘आपल्या देशातील पंजाबचे उदाहरण देखील लक्षात घेण्यासारखे व उद्बोधक आहे. देशाची फाळणी झाली तेव्हा अधिक सुपीक असलेला आणि प्रचंड कालव्यांचे जाळे असलेला ओलिताचा भाग हा पाकिस्तानचा भाग बनला आणि सुपीकता कमी असलेला, ओलिताचे क्षेत्रही फारसे नसलेला व वाळवंटी प्रदेशातील उंच-सखल मातीचे टेकडय़ासारखे ढिगारे असलेला बराचसा भाग हिंदुस्थानातील पंजाबच्या वाटय़ाला आला. ही बरीचशी जमीन पडीकही होती. ती पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या विस्थापितांना देण्यात आली. भारताच्या पंजाबमध्ये आलेल्या नवीन मंडळींमध्ये लष्करातून निवृत्त झालेले प्रशिक्षित बरेच लोक होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही आमचे जीवन यशस्वी करणार अशा ईर्षेने प्रेरित झालेले हे लोक होते. अपार कष्ट उठवून, शिस्तीचे पालन करून त्यांनी भारताचा पंजाब उभा केला. सध्या भारतात पंजाबसारखी समृद्ध शेती असलेला दुसरा प्रदेश नाही. मानवी प्रयत्नाने काय होऊ शकते याचे आदर्श उदाहरण पंजाब आहे. भारतीय मनुष्य काय करू शकतो याचीही प्रचीती पंजाबमध्ये आली.. मानवी प्रयत्नाच्या कष्टाने, संघटित व शिस्तप्रिय वागण्यानेच देश घडविता येतात.’’