कोंबडीचे संपूर्ण शरीर पिसांनी झाकलेले असते. पंख व पाय ताकदवान असतात. हाडे वजनाने हलकी असतात. कोंबडीच्या शरीराचे तापमान १०७ अंश फॅरनहाइट असते. रक्त उष्ण असते. कोंबडीमध्ये जुनी पिसे झडून नवी पिसे येतात.
कोंबडीची चोच टोकदार, टणक असते. चोचीच्या खालच्या बाजूस लाल बॅटल (गलूल) असून डोक्यावर तुरा असतो. तुऱ्याच्या खालच्या बाजूस डोळे व कानाच्या वाटय़ा असतात. कोंबडीला घामग्रंथी नसतात. शरीर पिसांनी झाकल्यामुळे तिला बाह्य़घटकाकडून इजा होत नाही आणि शरीराची उब टिकून राहते. पायाच्या मागील बाजूस एक नखी असते. नर पक्षात नखीची वाढ मोठय़ा प्रमाणात दिसते. नराच्या शेपटीची पिसे मादीच्या तुलनेत जाड व मोठी असतात. नराचा तुरा लालभडक व मोठा असतो. नराचे वजन मादीच्या तुलनेत जास्त असते.
कोंबडीची मान लवचीक असते, कारण मानेमध्ये मणक्यांची माळ असते. त्यामुळे मानेची हालचाल लवकर होते. पायाची व मांडीची हाडे मजबूत परंतु पोकळ असतात. कंबरेची हाडे, मूत्रिपड, जननेंद्रिय व पोटाची आतडी यांना संरक्षण देतात.
कोंबडीमध्ये पचनसंस्थेची लांबी १० फुटांपर्यंत असते. कोंबडीत दात नसतात, परंतु माजा/गिझार्ड या पोटाच्या भागात वाळूसारखे तुकडे असतात. त्यांच्या मदतीने खाद्याचे बारीक दळण होते. शरीरात लहान आतडे व स्वादुिपड असते. पाचक द्रव्यामुळे पिष्टमय पदार्थ, प्रथिने व स्निग्ध पदार्थाचे पचन होते. कोंबडीत पचनाची व शोषणाची प्रक्रिया तीन तासांत पूर्ण होते. अन्नातील चोथा किंवा विष्ठा मोठय़ा आतडय़ात साठवली जाते. कोंबडय़ाच्या श्वसनसंस्थेचे प्रमुख तीन भाग आहेत : श्वासनलिका, फुप्फुसे, हवेच्या पिशव्या. कोंबडी उडताना हवेच्या पिशव्या व हाडातील पोकळी यात हवा साठवते. त्यामुळे वजन हलके होऊन त्या हवेत उडतात.
मेंदूतील ऑप्टिक भागामुळे कोंबडय़ा सूक्ष्म बाबी पाहू शकतात व रंग ओळखू शकतात, परंतु त्यांच्या जिभेला चव कळत नाही. पीयूषी ग्रंथी व मज्जातंतूंद्वारे त्यांच्या शरीरात विविध संदेश प्राप्त होतात व शारीरिक कार्य होत असते.
वॉर अँड पीस: बालमधुमेह : आयुर्वेदीय उपचार
आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथात एकूण वीस प्रकारचे प्रमेह वर्णिले आहेत. प्रमेह म्हणजे प्रकर्षेण मेहति। म्हणजे वारंवार मूत्रप्रवृत्ति होणे. शास्त्रकारांनी कालमेह, इक्षुमेह, उदकमेह, सांद्रमेह, सुरामेह, पिष्टमेह, शीतमेह, शन्नैमेह, लालामेह, नीलमेह, क्षारमेह, हारिद्रमेह, मंजिष्टमेह, वसामेह, मज्जामेह व हस्तिमेह, सिकतामेह, रक्तमेह अशा विविध प्रमेह रोगांचे अंती रूपांतर मधुमेहातच होते असे सांगितले आहे. मोठय़ा माणसांच्या मधुमेहाची प्रामुख्याने तीन कारणे असतात. आनुवंशिकता, धातुक्षय, वातवृद्धी. लहान बालकांच्या मधुमेहाबद्दल आयुर्वेदीय ग्रंथात कुठेही उल्लेख नाही. मात्र वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या प्रमेह लक्षणांकरिता निश्चितपणे काम करणाऱ्या अनपायी औषधी वनस्पती खूप आहेत. यातील निवड करताना लहान बालकांचे मूत्र परीक्षण दर पंधरवडय़ाने, महिन्याने केल्यास लहान बालकांच्या ते हिताचे ठरेल. बालकांचे सुई टोचून वारंवार रक्त तपासणे योग्य नव्हे. घरच्या घरी रक्तशर्करा तपासणी यंत्र, काही वेळेस फसवे आकडे देतात. कारण यातली केमिकल्स क्वचित कालबाह्य़ झालेली असतात.
लहान बालकांच्या मूत्र तपासणीमध्ये मूत्राचे प्रमाण, त्याचा वास, त्याचा रंग, गढूळपणा, अॅल्बुमिन, क्षार यांचा मागोवा घ्यावा. लघवीवाटे धातू जात असेल, रक्ताचे प्रमाण कमी असले तरच चंद्रप्रभावटी २ वा ३ गोळ्या २ वेळा द्याव्यात. बालमधुमेह रुग्णांना गोखरू, आवळकाठी, गुळवेलयुक्त रसायनचूर्ण सकाळ-सायंकाळ दोन ग्रॅम या हिशोबात दीर्घकाळ द्यावे. मूत्रात अन्य दोष असल्यास गोक्षुरादिगुग्गुळ २ वा ३ गोळ्या २ वेळा द्याव्यात. मधुमेहग्रस्त मोठय़ा व्यक्तींना बेलाच्या पानांचा नित्य काढय़ाचा निश्चित उपयोग होत असतो, पण लहान बालकांना असा काढा नित्य देणे व्यवहार्य नाही.
त्याकरिता त्यांच्या आहारात ओली हळद, मेथ्या, आवळा, तुरट चवीची फळे, मेथी, शेवगा, तांदुळजा, चाकवत, काटेरी वांगी, मुळा, राजगिरा, पालक अशा भाज्या युक्तीने वापराव्यात. चतकोर तरी ज्वारी-बाजरीची भाकरी, मुगाचे वरण अशी सवय लावावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत २६ ऑगस्ट
१८६३ > मराठी ज्ञानभाषेत भर घालण्यासाठी झटणारे विष्णू गोविंद विजापूरकर यांचा जन्म. ‘विश्ववृत्त’ हे मासिक त्यांनी चालविले होते. याशिवाय एम.ए.च्या विद्यार्थ्यांकरिता ऋग्वेदसंग्रह, ऋग्वेदातील निवडक उताऱ्यांचे संकलन आणि ‘फ्रीमनकृत युरोपचे संक्षिप्त इतिवृत्त’ ही त्यांची काही पुस्तके.
१९२१ > कवी, कथाकार/ कादंबरीकार व बालसाहित्यिक श्रीकृष्ण शांताराम पोवळे यांचा जन्म. स्वातंत्र्यलढय़ाच्या अखेरच्या टप्प्यात क्रांतीच्या कविता ते लिहू लागले. त्यांचा ‘अग्निपराग’ हा संग्रह प्रकाशित झाला, तसेच तीन कादंबऱ्या व चार बालपुस्तके त्यांनी लिहिली.
१९२२ > ‘भाकरी आणि स्वातंत्र्य’, ‘साता उत्तरांची कहाणी’, ‘स्वातंत्र्याचे महाभारत’ तसेच ‘हाजीपीर’, ‘सोनार बांगला’ आदी पुस्तके आणि नेहरू, टिळक यांच्या कार्याचा आणि विचारांचा सांगोपांग आढावा घेणारी चरित्रपुस्तके लिहिणारे गणेश प्रभाकर (ग. प्र.) प्रधान यांचा जन्म. १९४२च्या चलेजाव आंदोलनात १३ महिने, तर आणीबाणीविरोधी आंदोलनात वर्षभराचा तुरुंगवास भोगणारे ‘प्रधानमास्तर’ एरवी फर्गसन कॉलेजात इंग्रजी शिकवत. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेले प्रधान काही काळ ‘साधना’चे संपादकही होते. ‘महात्मा फुले गौरव ग्रंथा’चे संपादन त्यांचे आहे.
संजय वझरेकर
जे देखे रवी.. ज्ञानेश्वरांची भाषा
पाचव्या आध्यायातला वेदांताचे सार सांगणाऱ्या ओव्या बघू या. पै मूर्तिचेनि मेले। तो मूर्तिचे होऊन खेले। परि अमूर्तपण न मैले। दादूलियाचे. यातला ‘दादुलिया’ दाता या शब्दाचे रूपांतर आहे. त्याचा अर्थ श्रेष्ठ पुरुष असा आहे. हल्ली मोठय़ा गुन्हेगारालाही तोच शब्द वापरतात. पै हा प्राकृत शब्द वैचे रूपांतर आहे. वै संस्कृतमध्ये होकारार्थ. या वैचे व्हय होय आणि हो झाले. प्राकृतात पै ‘नक्कीच’ अशा अर्थाचा आहे. मूर्ति हा शब्द मृत्तिका म्हणजे माती याच्यापासून आला असणार. जे टिकत नाही ते मर्त्य हा शब्दही बहुतेक जवळपासचा. मूर्ति होते तेव्हा काहीतरी मूर्त होते. चैतन्य अमूर्त असते. खेला हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा दूरान्वयाने अर्थ क्रीडा असा आहे. पहिल्या चरणातला मेला शब्द प्राकृतमध्ये ‘मुक्काम, मुक्कामाला आला’ अशा अर्थाने येतो; परंतु मैले हा शब्द संस्कृतमधल्या मल या शब्दाचे परिवर्तन आहे त्याचा अर्थ अशुद्ध हिणकस असा दिला आहे. हिणकस म्हणजे ज्याचा कस हीन झाला तो. परि या शब्दाचे आपण ‘पण’ केले आहे. आता अर्थ लागतो. ‘नक्कीच मूर्तीच्या मुक्कामाला तो मूर्त होऊनच खेळतो (वागतो) पण अमूर्तपण मलिन (अशुद्ध) होत नाही त्या श्रेष्ठ पुरुषाचे.’ दुसरी ओवी म्हणते.
तो सृजी पाली संहारी। ऐसे बोलिती जे चराचरी। ते अज्ञानगा अवधारी। पांडुकुमरा
याच्यातल्या तो त्वं म्हणजे तूशी संबंधित. सृजी सृ या धातूशी संबंधित. त्याचा अर्थ वाहणे सरकणे. (उदा. निसर्गाचा प्रवाह) पाल हा संस्कृत शब्द म्हणजे रक्षण करणे. संहारीमधला संस्कृत शब्द ‘सहारी’ आहे त्याचा अर्थ नाश करणे असा आहे. हरिहरमधला नाश करणारा हर म्हणजे शंकर. बोलिती या शब्दाचा मूळ संस्कृत धातू वल्ह असा आहे. त्याचा अर्थ बोलणे ळ रस्र्ीं‘ असा दिला आहे. चराचरीमध्ये चल आणि अचल असे दोन शब्द आहेत. हलणारे आणि स्थिर. जिथे हलणारे आणि न हलणारे दोन्ही आहे, ते चराचर (जग), अज्ञान हा शब्द ज्ञानाच्या विरुद्ध. त्याचे इंडोयुरोपियन मूळ ‘ग्न’ ‘ॅल्ल’ असे आहे. ॅल्ल२्र२ म्हणजे समजणे. त्यातून ऊ्रंॠल्ल२्र२ म्हणजे निदान हा शब्द अवतरतो. कुमरा याचा अर्थ ‘तरुण पुरुष’. तो वाहतो, पाळतो आणि नाश करतो असे जे या जगात समजतात ते अज्ञान आहे तरुण पांडवा. पण यातला अवधारी शब्दही महत्त्वाचा. अवधार म्हणजे सूक्ष्मपणे बघणे. हे जे सगळे मी सांगतो आहे. ते बारकाईने बघ, असा सल्ला दिला गेला आहे. माझा वाचक म्हणत असेल किती ढील घेता. समजेल असे लिहा.
रविन मायदेव थत्ते