घरबांधणीत सिमेंटचा वापर हा प्रकार अलीकडेच प्रचलित झाला. तसे पाहता हजारो वर्षांपूर्वी काही मोठय़ा वास्तू वास्तुविशारदांनी अशा बांधल्या की त्यातील काही अजूनही टिकून आहेत. त्या कशा बांधल्या असतील याविषयीचे मानवाचे कुतूहल आजही शमलेले नाही.
पाण्याबरोबर ज्या पदार्थाची रासायनिक प्रक्रिया होऊन तो पदार्थ घट्ट होताना दोन दगड अथवा दोन विटा जोडण्याचे कार्य करतो त्याला ‘सिमेंट’ म्हणतात. सिमेंट ही कोरडी, सूक्ष्मकणी व करडसर हिरवट रंगाची पूड असून ती हायड्रॉलिक आणि नॉनहायड्रॉलिक या दोन प्रकारांत मोडते. सिमेंट हे पाण्यात कठीण होत असल्याने त्याला हायड्रॉलिक (जलीय) सिमेंट म्हणतात. या सिमेंटचा पोत इंग्लंडमधील पोर्टलॅण्ड बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो, म्हणून त्याला ‘पोर्टलॅण्ड सिमेंट’ म्हणतात. ‘या सिंमेटमध्ये सिलिकेट आणि ऑक्साइड यांचे मिश्रण असते. पोर्टलॅण्ड सिमेंट हे जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरतात. चुना आणि वाळू यांचे ते मिश्रण असून १४५० अंश सेल्सिअसला तापवले असता त्याचे रूपांतर कॅल्शियम ऑक्साइडमध्ये होते. त्यामध्ये जिप्सम (हायड्रेटेट कॅल्शिअम सल्फेट) आणि इतर पदार्थ मिसळतात. तसेच वाळू, अॅल्युमिना, फेरिक ऑक्साइड आणि कॅल्शियम ऑक्साइड यांचेही ते मिश्रण असते. त्यास सामान्य पोर्टलॅण्ड सिमेंट म्हणतात. पाणीविरहित सिमेंट पावडर आणि पाणी यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाल्याने त्यास टणकपणा येतो. या रासायनिक अभिक्रियेत हायड्रेट तयार होतात परंतु ते पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे हे सिमेंट सतत पाण्याखाली ठेवतात. तसेच ओलसर वातावरणात अधिक काळ ठेवल्याने सिमेंट आणि खडी, वाळू, विटा यामध्ये टणकपणा अधिक येतो.
नॉनहायड्रॉलिक ‘या दुसऱ्या प्रकारातील सिमेंट पाण्याखाली ठेवत नाहीत. कॅल्शियम हायड्रोऑक्साइड(स्लॅकड लाइम) आणि पाणी यांचे हे मिश्रण असते. ८२५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानास चुन्याचे दहा तास कॅल्शिनेशन केले असता कॅल्शियम ऑक्साइड तयार होते. कॅल्शिअम हायड्रॉक्साइडची हवेतील कार्बन डाय ऑक्साइडबरोबर काबरेनेशन (कार्बन डाय ऑक्साइड वायू क्राँक्रीटमध्ये शोषला जाणे) अभिक्रिया होऊन कॅल्शियम काबरेनेट तयार होते. आणि त्यात टणकपणा येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा