‘दाग अच्छे है’ ऐकायला छान वाटते, पण एरवी हे डाग किती त्रास देतात, याचा प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतला असेल. नवीन कपडे घालून सण-समारंभात मिरवताना मजा वाटते, पण त्याच कपडय़ांवर जर डाग पडला तर तो काढण्यासाठी ना-ना प्रकार केले जातात. फक्त साबणाने जेव्हा हे डाग जात नाहीत, तेव्हा डाग काढणाऱ्या उत्पादनांचा विचार केला जातो. जो पदार्थ कपडय़ावर पडलेला असतो, तो पाण्यात विरघळणारा नसेल तर त्याचा डाग पडतो. साधारणपणे िलबू म्हणजे सायट्रिक आम्ल आणि बेकिंग सोडा (सोडा बाय काबरेनेट) यांचे मिश्रण डाग घालवण्यासाठी वापरले जाते. हे मिश्रण कपडय़ांना शुभ्रता आणण्यासाठीही वापरले जाते.
कपडय़ाच्या आणि डागाच्या प्रकारानुसार डाग काढण्यासाठी विकरे, क्लोरिन ब्लिच अथवा ऑक्सिजन ब्लिचचा वापर केला जातो. डागही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे विकरयुक्त(एंजाइमेटिक) उदाहरणार्थ रक्त, ऑक्सिडायजेबल (उदा. चहा, कॉफी), ग्रीज (वंगण, तूप, तेल) आणि माती, चिखलाचे डाग. बहुतेकदा प्रोटीएज हे विकर वॉिशग पावडरमध्ये असते. हे विकर डागातील पाण्यात न विरघळ्णाऱ्या प्रथिनांचं विरघळ्णाऱ्या लहान तुकडय़ात रूपांतर करतात. त्यांना ‘ब्लिचेबल डाग’ किंवा ‘ऑक्सिडायजेबल डाग’ असेही म्हणतात. हे डाग ब्लिच करणाऱ्या पदार्थाने काढले जातात.
ऑक्सिजनयुक्त ब्लिच असा शब्दप्रयोग आपण सर्रास वापरताना बघतो. हा ऑक्सिजन त्या पावडरमध्ये कसा येत असेल? सोडियम परकाबरेनेट हे रसायन पावडर स्वरूपात असते, त्याचा पाण्याशी संपर्क येताच सोडियम काबरेनेट आणि हायड्रोजन पेरॉक्साइड तयार होते. हायड्रोजन पेरॉक्साइड हा ऑक्सिडायजिंग घटक आहे. ज्याचे विघटन होऊन ऑक्सिजन आणि पाणी तयार होते. हायड्रोजन पेरॉक्साइड चांगला विरंजक (ब्लिचिंग) पदार्थ असला तरी त्याला साधारणपणे ४० अंश सेल्सिअस इतकं तापमान आवश्यक असतं. वॉिशग मशीनमध्ये ही अडचण येत नाही. कारण त्यात तापमान वाढले जाते. कमी तापमानाला ब्लिचिंग प्रक्रिया व्हावी आणि प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी त्यात टेट्रा अॅसिटाइल इथिलीन डायअमाइन घातले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा