धूम्रपानाचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तंबाखूयुक्त सिगारेटच्या धूम्रपानाने स्वास्थ्याला धोका असतो व त्यासंबंधी सूचना देणाऱ्या जाहिराती ठायी ठायी नजरेस पडतात. तंबाखूतील निकोटीन हे रसायन, मानसिक उभारी देणारे (सायकोअॅक्टिव) असते व त्यामुळे सिगारेटचे व्यसन जडते. सिगारेट ओढणाऱ्यांचे आयुर्मान साधारण १४ वर्षांनी कमी होते. गर्भवती बाईने सिगारेटी फुंकल्यास विकृती असलेले बाळ जन्माला येते. त्यात कमी वजन, शारीरिक व्यंग, अकाली जन्म यांचा समावेश असतो. सिगारेटच्या तंबाखूत प्रोपेलिन ग्लायकोल, ग्लिसरॉल यांसारखे आद्र्रता टिकविणारे पदार्थ, सुगंधित द्रव्ये इ. मिसळलेले असतात.
प्रत्यक्ष धूम्रपान करणाऱ्याइतकाच अप्रत्यक्ष धूर पोटात जाणाऱ्यांनादेखील या धुरातील घातक रसायनांचा फटका बसतो. त्यासाठीच तर गाडीघोडय़ातील प्रवासात तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला मज्जाव असतो. धूम्रपानाचे इशारे तर सर्वत्र झळकत असतात. इतके असूनही काही शौकीन मंडळी या व्यसनाच्या आहारी गेलेली आढळतात.
त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ी-्रूॠं१ी३३ी२ किंवाी-्रूॠ२) चा शोध लागलेला आहे. विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या या सिगारेटमधून धूर येत नाही, विशिष्ट प्रमाणातले निकोटिन (तंबाखूमधले नशा देणारे रसायन) धूम्रशौकीनांच्या पोटात जाते. आजूबाजूच्यांना त्याचा कोणताच त्रास होत नसतो.
नव्या शोधांनुसार या सिगारेटमध्ये तंबाखूतले कर्कप्रेरकी असतातच पण त्याव्यतिरिक्त एरवीच्या तंबाखूत न आढळणारी घातक रसायनेदेखील त्यात असतात. तंबाखूत चार प्रकारची नायट्रोसामाइन गटातील रसायने असतात आणि ती कर्कप्रेरकी असतात. तंबाखूत एन- नायट्रोसोनिकोटिन (ठठठ) एन-नायट्रोसोनबेसिक (ठअइ) एन-नायट्रोसोअनाटॅब्बाईट (ठअळ) आणि ४ (मिथाईल नायट्रोसो)-१- (३ पायरीडिल -१ ब्युटेनॉन (ठठङ) ही ती विषारी रसायने होत. ई-सिगारेट्मध्ये तर यांच्या व्यतिरिक्त फॉर्मोल्डिहाइड, ‘असिटाल्डिहाइड आणि अक्रोलिन यांसारखी कबरेलीन संयुगे आढळली आहेत. या ई-सिगारेटमधून उत्सर्जति होणारी ग्लिसरॉल आणि प्रोपिलिन ग्लायकोल ही बाष्परूपातील रसायने फारशी अपायकारक नसतात, पण त्यातून बाहेर पडणाऱ्या कॅडमियम, शिसे आणि निकेल या धातूंच्या वाफा संशोधकांना चिंताजनक वाटतात. साधारण सिगारेटमध्ये ही रसायने नसतात. त्यातच ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणारे कायदेकानून अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील नाहीत. भविष्यातला धोका ई-सिगारेटचाही आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा